श्री.ष.ब्र. १०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांचा जन्म १४ जून १९८५ रोजी कर्नाटक राज्यात खानापुर ता.आळंद जि.गुलबर्गा येथे माता सरूबाई व पिता मल्लया यांच्या पोटी झाला.प्राथमिक शिक्षण मूळगावी तर नंतर त्यांनी 'अल्लम प्रभुदेव यांचे तात्त्विक चिंतन विश्लेषणात्मक अध्ययन 'या विषयावर विद्यावाचस्पती (पी-एच.डी.) केली.२००८ ला महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेडचे मठाधिपती झाले.मठाला मागील एक हजार वर्षांपेक्षा जास्तीची परंपरा लाभलेली असून वीरशैव धर्मातील पंचपीठांपैकी उज्जेयनी शाखेसी हा मठ संलग्नीत आहे.मठा मार्फत केवळ धार्मिक कार्यक्रमाचेच आयोजन न करता अनेक समाजोपयोगी कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत.सामूहिक विवाह सोहळा, रक्तदान शिबीर, सार्वजनिक वाचनालय उभारून वाचन संस्कृतीला गती देणे, शिवयोग मंगल कार्यालयाची उभारणी, अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृहाची व्यवस्था, वृक्षारोपण,स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती प्रबोधन ,स्त्रीभ्रूणहत्या प्रबोधन, संस्कृत भाषेला प्रोत्साहन पारितोषिकासाठी आर्थिक मदत यासारखे सामाजिक कार्य करत असतात. महाराजांचा उद्देश धर्म प्रचार करणे हा असतोच.
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा महाराष्ट्रच्या राज्याध्यक्षपदी
श्री ष.ब्र. १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची एकमताने निवड
सोलापूर/कपिलधार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ :
आज बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अखिल भारतीय वीरशैव शिवाचार्य संस्थेचे उपाध्यक्ष श्री ष.ब्र. डॉ. १०८ श्रीकंठ शिवाचार्य महाराज, नागणसूर, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील शिवाचार्य महाराजांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये ‘वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा, महाराष्ट्र’ या संस्थेच्या नूतन राज्य कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली.
संस्थेच्या राज्य अध्यक्षपदी श्री ष.ब्र. १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी शिवाचार्य रत्न श्री ष.ब्र. १०८ डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज उदगीरकर यांची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे —
- राज्य अध्यक्ष : श्री ष.ब्र. १०८ तपोरत्न नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, सोनपेठकर
- कार्याध्यक्ष : शिवाचार्य रत्न श्री ष.ब्र. १०८ डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज, उदगीरकर
- उपाध्यक्ष : श्री ष.ब्र. १०८ गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज, गिरगावकर
- सचिव : श्री ष.ब्र. १०८ डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, मुखेडकर
- कोषाध्यक्ष : श्री ष.ब्र. १०८ महादेव शिवाचार्य महाराज, वाईकर
- प्रवक्ते : श्री ष.ब्र. १०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज, जिंतूरकर
प्रवक्ते : श्री ष.ब्र. १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज, वसमतकर
या सर्व महाराष्ट्रातील शिवाचार्य महाराजांच्या नियुक्त्या श्री क्षेत्र मन्मथ स्वामी देवस्थान, कपिलधार, मांजरसुंबा येथे करण्यात आल्या. यावेळी ‘वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभा, महाराष्ट्र’ या संस्थेची नूतन कार्यकारणी स्थापन करण्यात आली.
महाराष्ट्रातील वीरशैव-लिंगायत समाजाच्या धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक कार्याला अधिक संघटित व प्रभावी दिशा देण्यासाठी ही नूतन कार्यकारणी निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नूतन कार्यकारणीतील सर्व शिवाचार्य महाराजांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
॥ श्री गुरुभ्यो नमः ॥
॥ श्री वीरशैव लिंगायत धर्माचा विजय असो ॥
3 days ago | [YT] | 14
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
ॲड श्रीजया अशोकराव चव्हाण
आमदार, भोकर विधानसभा मतदारसंघ
यांची सदिच्छा भेट सोबतीला मा श्री किशोर स्वामी
माजी सभापती , वाघाला नांदेड महानगरपालिका.
श्री ष ब्र १०८ डॉ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज
गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड
📍 नांदेड
🗓️ १ ऑक्टोबर २०२६
#sreejayachavan
#drveerupakshyshivchryamaharaj
#sreejachandran
1 week ago | [YT] | 3
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
श्री गुरु शंभुलिंग शिवाचार्य संजीवन समाधी पुण्यतिथी महोत्सवा निमीत्त अखंड शिवनाम सप्ताह व शिवदिक्षा व अय्याचार कार्यक्रम
दि.३०/०९/२०२६ बुधवार
स्थळः श्री.ष.ब्र. १०८ शंभुलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान, रविवार पेठ आंबाजोगाई जि. बीड
#drveerpakashyashacharyamaharaj
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील शिराढोण येथे कै. माधवराव गोविंदराव पा. पांडागळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्याचा तसेच त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकनेता’ स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्याचा मान लाभला.
या पावन प्रसंगी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले. तसेच डॉ. शुभलिंग शिवाचार्य महाराज, डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य स्वामी, वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज, महंत नामदेव महाराज, वासुदेवांदजी भारती महाराज आणि महंत एकनाथ गुरु नामदेव महाराज यांचेही शुभाशीर्वाद लाभले.
माझ्यासमवेत यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खा. Ashok Chavan जी, खा. डॉ. Dr.Ajeet Gopchade जी, खा. प्रा. रविंद्र चव्हाणजी, खा. Ramrao Wadkute - रामराव वडकुते जी, आ. Pratap Patil Chikhalikar जी, आ. Balajirao kalyankar जी, आ. Dr Tushar Rathod - तुषार राठोड जी, आ. Mla Kisanrao Wankhede जी यांच्यासह माजी आमदार, भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
CMOMaharashtra Revenue Department, Government of Maharashtra Maharashtra DGIPR NWCMC
#Maharashtra #Nanded #RevenueMinister #ChandrashekharBawankule
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
2 weeks ago | [YT] | 0
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
1896 वर्षी स्थापन झालेल्या व 130 वर्षाची परंपरा असलेल्या मोहनावती मुखेड मानाच्या श्रींची पूजा,आरती शुभ हस्ते गुरुवर्य
श्री ष ब्र १०८ डॉ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान .
अनंत चतुर्दशी - पालखी मिरवणूक
शुक्रवार - दिं 25/09/2026
स्थळ - गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड
#ganpatibappa #ganpatibappamorya❤️ #instgrampost❤️ #drshivanandswami #drvirupakshshivacharyamahaswamiji
2 weeks ago | [YT] | 0
View 1 reply
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
ಧರ್ಮಸಭೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ
ದಿನಾಂಕ : 21-09-2026, ರಂದು ದೇವರ ಹಿಪ್ಷರಗಿ ತಾಲೂಕಿನ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಕೋರವಾರ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ಮಹಾಂತೇಶ್ವರ ಸಂಸ್ಥಾನ ಹಿರೇಮಠದಲ್ಲಿ ಕಲಬುರಗಿ ಶ್ರೀ ಶರಣಬಸವೇಶ್ವರರ ಪುರಾಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ "ಧರ್ಮಸಭೆಯ ದಿವ್ಯ ಸಾನಿಧ್ಯ : ಶ್ರೀಮದ್ ವೀರಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಶ್ರೀ 1008 ಜಗದ್ಗುರು ವೀರಸೋಮೇಶ್ವರ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ಭಗವತ್ಪಾದರು ರಂಭಾಪುರಿಮಹಾಪೀಠ, ಬಾಳೆಹೊನ್ನೂರ ಶ್ರೀಗಳು ವಹಿಸುವರು,
ನೇತೃತ್ವ : ಶ್ರೀ ಷ. ಬ್ರ. ರುದ್ರಮುನಿ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಹಿರೇಮಠ, ಗಿರಿಸಾಗರ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಷ. ಬ್ರ. ಸಿದ್ದಲಿಂಗ ಶಿವಾಚಾರ್ಯರು, ಹಿರೇಮಠ ಬಿಲ್ ಕೆರೂರ, ಸಮ್ಮುಖ : ಶ್ರೀ ಷ. ಬ್ರ. ವೀರುಪಾಕ್ಷ ಶಿವಾಚಾರ್ಯರು, ಸಂಸ್ಥಾನ ಹಿರೇಮಠ ಮುಖೇಡ, ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಷ. ಬ್ರ. ಚನ್ನಬಸವ ಶಿವಾಚಾರ್ಯರು, ದರ್ದಾಪೂರ ( ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ) ತಪೋರತ್ನ : ಶ್ರೀ ಷ. ಬ್ರ. ಬಸವಲಿಂಗ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಶ್ರೀ ಗುರು ಮಹಾಂತೇಶ್ವರಮಠ ಕೋರವಾರ, ಉಪದೇಶಾಮೖತ : ಶ್ರೀ ಷ. ಬ್ರ. ಚಂದ್ರಶೇಖರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ರು ಶ್ರೀ ಗುರು ಸಂಸ್ಥಾನ ಮಠ ಆಲಮೇಲ, ಶ್ರೀ ಷ. ಬ್ರ. ಮರುಳಮಹಾಂತ ಶಿವಾಚಾರ್ಯರು, ಒಕ್ಕಲಗೇರಮಠ, ಸಗರ. ಶ್ರೀ ಷ. ಬ್ರ. ಅಭಿನವ ರುದ್ರಮುನಿ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಕುಂಟೋಜಿಮಠ, ಯಂಕಂಚಿ, ಹಾಗೂ ಗ್ರಾಮದ ಶ್ರೀ ಗುರು ಮಠದ ಭಕ್ತಾದಿಗಳು ರಾಜಕೀಯ ದುರೀಣರು, ನುರಾರು ಜನ ತಾಯಂದಿರು, ಯುವಕರು, ಮತ್ತಿತರರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.
अड्डपालखी व धर्मसभा कार्यक्रम दिनांक २१-०९-२०२६ रोजी देव हिप्परगी तालुक्यातील सुक्षेत्र कोरवार गावातील श्री महांतेश्वर संस्थान हिरेमठ येथे कलबुर्गीच्या श्री शरणबसवेश्वरांच्या पुराण कार्यक्रमाचे "धर्मसभेचे दिव्य सान्निध्य" या विषयावर आयोजन करण्यात आले.
श्रीमद् वीरसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री १००८ जगद्गुरू वीरसोमेश्वर शिवाचार्य भगवत्पादरू, रंभापुरी महापीठ, बाळेहोन्नूर यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
नेतृत्व: श्री ष. ब्र. रुद्रमुनी शिवाचार्य, हिरेमठ, गिरीसागर, आणि श्री ष. ब्र. सिद्दलिंग शिवाचार्य, हिरेमठ बिल केरूर.
समक्ष उपस्थिती: श्री ष ब्र. डॉ वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज, गणाचार्य मठ संस्थान मुखेड जि नांदेड (महाराष्ट्र) आणि श्री ष. ब्र. चन्नबसव शिवाचार्य,दर्दापूर (महाराष्ट्र).
तपोरत्न: श्री ष. ब्र. बसलिंग शिवाचार्य, श्री गुरु महांतेश्वर मठ,कोरवार.
उपदेशामृत: श्री ष. ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य, श्री गुरु संस्थान मठ, आळमेल; श्री ष. ब्र. मरुळमहांत शिवाचार्य, ओक्कलगेर मठ, सागर; आणि श्री ष. ब्र. अभिनव रुद्रमुनी शिवाचार्य, कुंटोजी मठ, यंकंची.
गावातील श्री गुरु मठाचे भक्तगण, राजकीय पुढारी, अनेक माता-भगिनी, युवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#drvirupakshshivacharyamahaswamiji #rambahpuri #jadgaru
2 weeks ago | [YT] | 14
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
बाळेहोन्नूर धर्म पीठाच्या क्षेत्रनाथ श्री वीरभद्र स्वामी तसेच श्री जगद्गुरु रेणुकाचार्य मंदिरात पूजा केल्यानंतर, श्री जगद्गुरु रंभापुरी वीर सिंहासन मूळ पीठाच्या शिळा इमारतीसाठी भूमिपूजन व शिलान्यास पार पाडणारे मुख्यमंत्री श्री डी. के. शिवकुमार यांना श्रीरंभापुरी जगद्गुरूंनी गुरु रक्षा आशीर्वाद प्रदान केल्याची छायाचित्रे.
ಬಾಳೆಹೊನ್ನೂರು ಧರ್ಮ ಪೀಠದ ಕ್ಷೇತ್ರನಾಥ ಶ್ರೀ ವೀರಭದ್ರ ಸ್ವಾಮಿ ಹಾಗೂ ಶ್ರೀ ಜಗದ್ಗುರು ರೇಣುಕಾಚಾರ್ಯ ಮಂದಿರದಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಶ್ರೀ ಜಗದ್ಗುರು ರಂಭಾಪುರಿ ವೀರ ಸಿಂಹಾಸನ ಮೂಲ ಪೀಠದ ಶಿಲಾ ಕಟ್ಟಡಕ್ಕೆ ಭೂಮಿ ಪೂಜೆ ಶಿಲಾನ್ಯಾಸ ನೆರವೇರಿಸಿದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಶ್ರೀ ಡಿ. ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರಿಗೆ ಶ್ರೀರಂಭಾಪುರಿ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಗುರು ರಕ್ಷೆ ಆಶೀರ್ವಾದ ಅನುಗ್ರಹಿಸಿದ ಅಪೂರ್ವ ಚಿತ್ರಗಳು.
21 September 20226
#drveerpakashyashacharyamaharaj
#karantaka
#dkshivkumar
#chiefminestar
3 weeks ago | [YT] | 11
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
#drveerpakashyashacharyamaharaj #gaurai #ganpatibappamorya
3 weeks ago | [YT] | 7
View 0 replies
Dr Virupaksh Shivacharya Maharaj
देश 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र झाला.पण मराठवाड्याला स्वतंत्र होण्यासाठी निजामाच्या राजवटी विरुद्ध स्वातंत्र्यानंतर संघर्ष करून अनेक हुतात्म्यांना जुलमी रझाकारांच्या विरुद्ध बलिदान देऊन 17 सप्टेंबर 1948 ला स्वातंत्र्य मिळाले.मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी त्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी नमन,आणि सर्व मराठवाडा वाशियांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मनस्वी शुभेच्छा...!!
#IndiaIndependenceDay
#drveerpakashyashacharyamaharaj
3 weeks ago | [YT] | 12
View 0 replies
Load more