Dr Virupaksh Shivacharya Maharaj

श्री.ष.ब्र. १०८ विरुपाक्ष शिवाचार्य महाराजांचा जन्म १४ जून १९८५ रोजी कर्नाटक राज्यात खानापुर ता.आळंद जि.गुलबर्गा येथे माता सरूबाई व पिता मल्लया यांच्या पोटी झाला.प्राथमिक शिक्षण मूळगावी तर नंतर त्यांनी 'अल्लम प्रभुदेव यांचे तात्त्विक चिंतन विश्लेषणात्मक अध्ययन 'या विषयावर विद्यावाचस्पती (पी-एच.डी.) केली.२००८ ला महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेडचे मठाधिपती झाले.मठाला मागील एक हजार वर्षांपेक्षा जास्तीची परंपरा लाभलेली असून वीरशैव धर्मातील पंचपीठांपैकी उज्जेयनी शाखेसी हा मठ संलग्नीत आहे.मठा मार्फत केवळ धार्मिक कार्यक्रमाचेच आयोजन न करता अनेक समाजोपयोगी कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत.सामूहिक विवाह सोहळा, रक्तदान शिबीर, सार्वजनिक वाचनालय उभारून वाचन संस्कृतीला गती देणे, शिवयोग मंगल कार्यालयाची उभारणी, अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृहाची व्यवस्था, वृक्षारोपण,स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती प्रबोधन ,स्त्रीभ्रूणहत्या प्रबोधन, संस्कृत भाषेला प्रोत्साहन पारितोषिकासाठी आर्थिक मदत यासारखे सामाजिक कार्य करत असतात. महाराजांचा उद्देश धर्म प्रचार करणे हा असतोच.