कृष्णगजल- जयेश पवार

नमस्कार
रसिक मायबाप😊💐

माझ्याबद्दल सांगण्यासारखं असं काहीच नाही... जितकं तुम्हाला गजलेतून मला वेचता येईल तितका मी..
पारिजातकाच्या सड्याप्रमाणे..

विसरत गेलोय धून जी पाठांतर होती ,
वाऱ्यावर फिरवून बासरी काय लिहावे ?

एवढे लिहून झाल्यावरी काय लिहावे ?
पाऊस, वादळ, वारा, सरी.. काय लिहावे ?..

~~~~~~~
बासरी आहे तुझ्यासोबत तुझी केवळ ,
पण दिसत नाही इथे राधा ...कुठे गेली ?..

जी मला भेटायच्या आधी तुला होती ,
ती तुझी उत्सूकता आता कुठे गेली !..

★★★★

फारसे नव्हते कुणी माझ्याबरोबर
कृष्ण होता भोवताली फक्त माझ्या..

© जयेश पवार

Poet& performer/video editing - जयेश पवार
All promotion poster credit - सचिन चौरे
Google meeting credit - अनिरुद्ध वासमकर
ALL social media advertising - "team कृष्णगजल via गजलेबद्दल "

चॅनल नक्की subscribe करून बेल आयकॉनवर क्लिक करा👍👍😊म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील😊💐