कृष्णगजल- जयेश पवार

नमस्कार
रसिक मायबाप😊💐

माझ्याबद्दल सांगण्यासारखं असं काहीच नाही... जितकं तुम्हाला गजलेतून मला वेचता येईल तितका मी..
पारिजातकाच्या सड्याप्रमाणे..

विसरत गेलोय धून जी पाठांतर होती ,
वाऱ्यावर फिरवून बासरी काय लिहावे ?

एवढे लिहून झाल्यावरी काय लिहावे ?
पाऊस, वादळ, वारा, सरी.. काय लिहावे ?..

~~~~~~~
बासरी आहे तुझ्यासोबत तुझी केवळ ,
पण दिसत नाही इथे राधा ...कुठे गेली ?..

जी मला भेटायच्या आधी तुला होती ,
ती तुझी उत्सूकता आता कुठे गेली !..

★★★★

फारसे नव्हते कुणी माझ्याबरोबर
कृष्ण होता भोवताली फक्त माझ्या..

© जयेश पवार

Poet& performer/video editing - जयेश पवार
All promotion poster credit - सचिन चौरे
Google meeting credit - अनिरुद्ध वासमकर
ALL social media advertising - "team कृष्णगजल via गजलेबद्दल "

चॅनल नक्की subscribe करून बेल आयकॉनवर क्लिक करा👍👍😊म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील😊💐



कृष्णगजल- जयेश पवार

मराठी विभाग,
मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ
यांच्या संयुक्त विद्यमाने

🌸 *मराठी भाषा संवर्धन पंधरवडा* 🌸
(दि. १४ ते २८ जानेवारी २०२६)
निमित्त आयोजित
विशेष कार्यक्रम

*🎶 तुझ्यासोबत*
मराठी कविता, गझल आणि बरंच काही…

🎤 प्रमुख अतिथी :
मा. जयेश पवार
(लेखक, कवी व गझलकार)

🗓️ दिनांक : २३ जानेवारी २०२६
⏰ वेळ : दुपारी १२.३० वाजता
📍 स्थळ : पहिला मजला, सभागृह

सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व मराठी साहित्यप्रेमींनी कविता, गझल व संवादाच्या या अनोख्या साहित्यिक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. 🙏🏻


मराठी विभाग
मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ

1 week ago | [YT] | 4

कृष्णगजल- जयेश पवार

प्रत्येक महाविद्यालयात आणि शाळेत मराठी विद्यार्थ्यांसाठी होणारी हक्काची मराठी काव्याची मेजवानी मैफल पुन्हा आलीय 2026 मध्ये..
यंदाचे ठिकाण आहे मुलुंड @vaze.studentscouncil ❤️
तर, विद्यार्थी मित्रांनो भेटताय ना मला या मैफलीत.. मराठी भाषेची हिंमत आणि किंमत समजून घ्यायला...
भेटू..

पुढील कॉलेज आणि स्थळ लवकरच...

Digital Partner @marathikavita02
@shivshabd

#collageevent #marathilove #मराठीसंस्कृती #वाङ्मयमंडळ #कॉलेज #festival #jayeshpawargazal #MarathiKavita #MarathiGhazal

1 week ago | [YT] | 4

कृष्णगजल- जयेश पवार

भेटूया कवितेच्या सहलीत- वृतांच्या गावी जायला..

1 week ago | [YT] | 12

कृष्णगजल- जयेश पवार

प्रत्येक महाविद्यालयात आणि शाळेत मराठी विद्यार्थ्यांसाठी होणारी हक्काची मराठी काव्याची मेजवानी मैफल पुन्हा आलीय 2026 मध्ये..
यंदाचे ठिकाण आहे मुंबईत❤️
तर, विद्यार्थी मित्रांनो भेटताय ना मला या मैफलीत.. मराठी भाषेची हिंमत आणि किंमत समजून घ्यायला...
भेटू..

पुढील कॉलेज आणि स्थळ लवकरच...

Digital Partner @marathikavita02
@shivshabd

#collageevent #marathilove #मराठीसंस्कृती #वाङ्मयमंडळ #कॉलेज #festival #jayeshpawargazal #MarathiKavita #MarathiGhazal

1 week ago | [YT] | 9

कृष्णगजल- जयेश पवार

या कार्यशाळेत सहभागी होण्याआधी माझ्या प्रोफाइलवर असलेली 'गजलेबद्दल फीडबॅक' ही highlight जरूर check करा☺️👍

प्रत्येक शनिवारी रविवारी ही काव्यपिकनिक मी घेत असतो-
2018 पासून सुरू असलेला या उपक्रमात हल्लीचे बरेच नवोदित, कवी सहभागी होऊन गजल लिहू लागलेत, कार्यक्रम करू लागलेत..

मराठी भाषेतील एखादा काव्यप्रकार नव्याने जाणून घेण्यासाठी आपणही नक्की सहभागी व्हा❤️❤️

एखाद्या इच्छुकापर्यंत ही पोस्ट शेअर करून नक्की पोहचवा..

"हिंदीत लिहून रीच मिळेल, पण मराठीत लिहून आईला सांभाळण्याचे समाधान लाभेल"

ठिकाण- ऑनलाइन गूगल मीट ❤️
वेळ आणि वार - शनिवारी रविवारी - 4 ते रात्री 10
प्रवेश मूल्य- ऐच्छिक / As per your choice

Happy new year 26 ❤️

#jayeshpawargazal #गजलेबद्दल_feedback #गझलेबद्दल #marathilove #MarathiGhazal #MarathiKavita #मराठीसंस्कृती #मराठीगझल #कविता #workshop

[ jayeshpawargazal, गजलेबद्दल_feedback, गझलेबद्दल , marathilove , MarathiGhazal , MarathiKavita , मराठीसंस्कृती , मराठीगझल, कविता, workshop ]

2 weeks ago | [YT] | 11

कृष्णगजल- जयेश पवार

वर्षभर ज्यांना काहीच करता आलेलं नाही आपल्या छंदासाठी, अर्थात कविता,गजल, वगैरे अशांना योग्य टाईमपास आणि पिकनिक असते हे संमेलन वगैरे

तुम्ही तरी आता संमेलन तोंडावर आले तेव्हा विरोध करताय, मी गेले अनेक वर्षे मारतोय 'या' गजलकारांना 'फाट्यावर' आणि त्यांच्या कंपूला..

बाकी एका कोपऱ्यात बाजूला कट्ट्यावर बसूनही, 7-6 जणांचे विविध कंपू एकाच गटात असूनही- वेगवेगळ्या style ने पोस्टर बनवून, यांच्यापेक्षा आमचे पोस्टर किती सुंदर हे दाखवण्यात व्यस्त आहेत🤣🤣 जे हास्यास्पद आहे..

एकतर तुम्हाला कोपऱ्यात जागा देऊन- वर्षोनुवर्षे तुमची तीच टीम आयोजन करतेय आणि तुम्हाला फुकटात बोलावतेय- फेसबुकवर मिरवण्याची वर्षातून एकदाच संधी असते तुम्हाला त्यामुळे त्यांना नकार देण्याचा प्रश्नच नाही

प्रश्न आहे तो स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून
कवितेच्या/ गजलेच्या आधाराने तुम्ही शिकार झालात या संमेलनाच्या प्रॉपगंडाच्या-...

बाकी तुमच्या कंपूतले शिकाऊ आणि वर्षातून एकदा सादर करणारे कवी/गजलकार तुम्हाला अभिनंदन देतीलच

चार बुटक्यांनी एका बुटक्याला खांद्यावर घेऊन तो किती उंच आहे दे दाखवण्यासाठी किंवा वासरात लंगडी गाय शहाणी या हिशोबाने अनेक अध्यक्ष पद आणि सूत्रसंचालन अशी गोड गाजर तुम्हाला दिलेली आहेतच
तर शुभेच्छा

but आम्ही सर्वच रसिक वाचक हसतोय तुमच्या या प्रसिद्धीसाठी हापापलेल्या स्वभावावर..

साताऱ्याच्या संमेलनाची लालसा सुटत नाही, आणि चाललेत अमरावतीत नवीन एल्गार फोडायला, मिरवायला..🤣🤣🤣

#अखिलभारतीयमराठीसाहित्यसंमेलनसातारा
#अभामसासंसा #एल्गार #फाट्यावरमारलागजलकट्टा

3 weeks ago (edited) | [YT] | 6

कृष्णगजल- जयेश पवार

या कार्यशाळेत सहभागी होण्याआधी माझ्या प्रोफाइलवर असलेली 'गजलेबद्दल फीडबॅक' ही highlight जरूर check करा☺️👍

प्रत्येक शनिवारी रविवारी ही काव्यपिकनिक मी घेत असतो-
2018 पासून सुरू असलेला या उपक्रमात हल्लीचे बरेच नवोदित, कवी सहभागी होऊन गजल लिहू लागलेत, कार्यक्रम करू लागलेत..

मराठी भाषेतील एखादा काव्यप्रकार नव्याने जाणून घेण्यासाठी आपणही नक्की सहभागी व्हा❤️❤️

एखाद्या इच्छुकापर्यंत ही पोस्ट शेअर करून नक्की पोहचवा..

"हिंदीत लिहून रीच मिळेल, पण मराठीत लिहून आईला सांभाळण्याचे समाधान लाभेल"

ठिकाण- ऑनलाइन गूगल मीट ❤️
वेळ आणि वार - शनिवारी रविवारी - 4 ते रात्री 10
प्रवेश मूल्य- ऐच्छिक / As per your choice

Happy new year 26 ❤️

#jayeshpawargazal #गजलेबद्दल_feedback #गझलेबद्दल #marathilove #MarathiGhazal #MarathiKavita #मराठीसंस्कृती #मराठीगझल #कविता #workshop

[ jayeshpawargazal, गजलेबद्दल_feedback, गझलेबद्दल , marathilove , MarathiGhazal , MarathiKavita , मराठीसंस्कृती , मराठीगझल, कविता, workshop ]

3 weeks ago | [YT] | 18

कृष्णगजल- जयेश पवार

मराठी गजल आणि काव्यलेखन कार्यशाळा दररोज online सुरू असतात- नाव नोंदणीसाठी 8010014473 वर व्हाट्सअप करा- फी आणि वेळ तुमच्यासोयीने🥰 अजून काय हवंय?

#jayeshpawargazal #marathigazal #workshop #marathiviralpost #marathikavita #गजलेबद्दल #गझलेबद्दल

1 month ago | [YT] | 3

कृष्णगजल- जयेश पवार

उद्या आणि परवा सुद्धा आहे आपल्या कार्यशाळा-

नोंदणी करण्यासाठी 080100 14473 आणि नेहमीप्रमाणे Entry fees - ऐच्छिक आहे❤️

आपणही या आणि इतरांनाही कळवा-
भेटू दोस्तहो..

#jayeshpawargazal #marathigazal #गजलेबद्दल #highlightseveryone

1 month ago | [YT] | 7

कृष्णगजल- जयेश पवार

कुठल्याही #प्रस्थापित गजलकारांच्या #गेट #टू #गेदरला माझा विरोध नाही-

माझं मत एवढं साधं आहे की- जर लोकाश्रय घेऊन कार्यक्रम करताय तर आपली नावे त्या आधारे मोठी करू नका-
हे आम्ही सुरू केलं (मग ठराविक नावे), यात अमुक एकाचा सिंहाचा वाटा वगैरे वगैरे, मराठी भाषेचे सिंपती कार्ड तुमचे खिसे भरायला आणि स्वतःची नावे आणि लॉबी मोठी करायला करू नका..

आज महाराष्ट्र मध्ये अनेक कवितांचे, गजलांचे प्रयोग होत आहेत- housefull तिकीट लावून, 1400+ प्रेक्षक तो सोहळा बघतात.. कारण की, हे सोहळे करणाऱ्यांची मॅनेजमेंट छान आहे, तांत्रिक बाबी प्रगल्भ आहेत, रसिकांचा अभ्यास आहे त्यामुळेच असले कार्यक्रम यशस्वी होतात- जाहिरात असते

मुळात कवी असणं वेगळं आणि कवी आहे हे दाखवणे वेगळे

तुम्हाला स्वतःच्या जीवावर कार्यक्रम घेता येत नसेल तर नका करू हे उद्योग स्वतःच्या नावाचा गाजावाजा
ज्यांना सादर करायची इच्छा असते त्यांच्या इच्छेचा असा फायदा नका घेऊ-
अर्थात तुम्हाला मिळणारी देणगी ही 80% तुमच्या कंपूत असलेल्या सादरकर्त्यांची आहे हे सर्वांना माहीत असतेच- कारण नंतर त्यांनाच fb ला पोस्ट प्रपंच सुरू करायचा असतो- (गजल निवड झाली, सादरीकरण विडिओ, मग त्या विशेष मंडळीचे आभार ज्यांनी मंच उपलब्ध करून दिला)

आभार मानायचे तर लोकांचे/ रसिकांचे माना ज्यांनी हे गेट टू गेदर व्हायला पाठिंबा दिला आणि स्वतः पडद्याआड राहिले त्याचा फायदा यांनी आपली नावे मोठी करण्यासाठी घेतला-

व्यवहार क्लिअर दाखवा ना
नेमका खर्च यांचा होतो कुठे?
हॉल, साऊंड, लाईट, कॅमेरा (यांच्याकडे असेलच तर, गजलकरांचे स्वतःचे मोबाईल वगळता🤣) मंडप- खाणे पिणे

की हे सगळं सुद्धा देणगीतून देत असेल, कुणी तिथले भावनिक स्थानिक? कारण यामुळे मराठी भाषा मोठी होणार, गजल प्रकार 'टिकेल'.. या भोळसट समजुतिने?

कशावर किती खर्च झाला, होतो? आणि होणार आहे यापुढे?
त्याची बिले, पावत्या,

यांच्या मीटिंग झाल्या असतीलच तर त्याचे मिनिट्स वगैरे जर यांच्याकडून कुणी मागीतलेच तर धावपळ सुरू होईल या मंडळींची

यांचं एकच आहे- "सादरीकरण करायला घेतोय ना आम्ही तुम्हाला मंचावर- मग आम्हाला जास्त प्रश्न विचारू नका- आधीच कार्यक्रम होत नाही मराठीत''

अरे पण कोण म्हटलं कार्यक्रम होत नाहीत?? कंपू सोडून बाजूला बघा आणि त्यांचाही मोठ्या मनाने कौतुक करा-

----वैभव जोशी- सोबतीचा करार- सौरभ भोसले, सारंग नैनेश अपूर्व अविनाश यांचं अक्षर अक्षर तुझेच आहे हा कार्यक्रम, कोल्हापूर चे काव्यसंध्या, संभाजी नगर चे काव्यधारा यांनी घेतला का लोकाश्रय
त्यांनी स्वबळावर आपली नावे मोठी केली... असे अनेक कार्यक्रम होत आहेत आजूबाजूला तिकीट लावून
सर्वांची नावे नाही घेता येणार कारण नावासाठी चाललंच नाहीये माझं हे काही..
ही सगळी मंडळी स्वबळावर कार्यक्रम करून आपले नाव कमावत आहेत आणि
तुम्ही तुमची नावे आहेत की नाही अजून मोठी हे पाहण्यासाठी कार्यक्रम करत आहात राजेहो🤣🤣✅

माझ्या मागच्या पोस्ट ने एक समाधान मला मिळालं की या सर्व कंपूने (Groupism) आता कबुल केलं आहे की, अशी गेट टू गेदर रसिकांच्या पैशांवर उभी आहेत

त्यामुळे त्या सर्वांचे मनापासून आभार ज्यांनी याना मदत करून अशी 'संमेलन' यशस्वी केली बदल्यात कुठल्याही क्रेडीटची अपेक्षा न ठेवता- बाकी पोस्टवर झळकणारी नावे वेगळीच असतील ही खात्री आहेच..

मुळात,
तुम्हाला आमची भाषा सध्या नाही कळणार-
विजा कोसळतील तशा कळत जातील गोष्टी--

नवीन पिढी तुमच्या या मंचापासून लांबच आहे हे एज बरंय म्हणून ते स्वतःचे कार्यक्रम स्वबळावर House full करत आहेत त्यांना नाही लोकाश्रय✅❤️👍 त्यांच स्किल आहे ते

त्यामुळे कार्यक्रम व्हावेत- मराठी भाषा, गजलकारांची एकी वगैरे हे सिंपती कार्ड खेळू नये- आम्ही आम्ही करू नये- श्रेय लोटायला अनेकजण येतात, अपयशाला सामोरे जायला नाही☺️

मी पुन्हा कबूल करतोय मित्रहो..

कुठल्याही प्रस्थापित गजलकारांच्या #गेट #टू #गेदरला माझा विरोध नाही-

#jayeshpawargazal #marathimotivational #MarathiNews #marathigazal

1 month ago | [YT] | 4