The Bioscope - Marathi

नमस्कार! 'बायोस्कोप-मराठी'वर आपलं स्वागत.

'बायोस्कोप' हे आजच्या OTTचं आद्य रुप! या 'बायोस्कोप'ला आम्ही आजच्या तंत्रज्ञानाची जोड देऊन तुमच्यापर्यंत आणतोय.

'बायोस्कोप-मराठी' ही यु-ट्यूब वाहिनी माहिती-रंजनासाठी म्हणजे आपल्या साध्या भाषेत 'इन्फोटेन्मेंट'साठीचा मंच आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि जीवनाच्या विविध आयामांना स्पर्श करण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी, वृत्त, वार्तांकन, विश्लेषण, मुलाखत-संवाद, चर्चा, मतमतांतरे, उपयुक्त माहिती, प्रेरणादायी तसेच वास्तवदर्शी, नाविन्यपूर्ण असे कार्यक्रम हे विविध आशय-चौकटीतून (फॉर्मॅट्स) इथे सादर होतील. कंटेंट हवाच, मात्र कॉन्टेक्स्ट अधिक महत्वाचा, असं आम्ही मानतो. तेव्हा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत! 'बायोस्कोप-मराठी'तील विविध कार्यक्रम पाहा, लाईक-शेअर करा, मुख्य म्हणजे 'बायोस्कोप-मराठी'ला सबस्क्राईब करा आणि पाहात राहा 'बायोस्कोप-मराठी'!