बोलले गेले पाहिजे … पण कोणी बोलत नाही.
जे विषय घरी दडपले जातात, समाज टाळतो, आणि मिडियाला अडचणीचे वाटतात
तेच विषय आमच्या माईकवर येतात.
स्पर्धा परीक्षांमधील मानसिक गोंधळांपासून ते लैंगिक शिक्षणासारख्या टाळलेल्या गोष्टींपर्यंत,
नात्यांमधील घुसमटपासून ते करिअरमधील अनकव्हर पॅनिक्सपर्यंत
ज्याबद्दल बोलण्याचं कुणालाही धाडस होत नाही,
तेच सगळं उघडपणे, स्पष्टपणे आणि कोणताही मुखवटा न घालता मांडण्यासाठी
सुरू आहे एक मोकळा संवाद – उघड उघड.

आम्ही कोण आहोत?

आम्ही ते आहोत जे विषयांना फिल्टर करत नाहीत.
आमच्यासाठी पॉडकास्ट म्हणजे बडेजाव नाही,
तर गप्पा… ज्या तुम्ही स्वतःशी मारत होता, त्या आता मोकळ्या व्हाव्यात यासाठी.

ना आम्ही लाईक्ससाठी बोलतो,
ना स्पॉन्सरशी मांडवळीसाठी.
आम्ही बोलतो, कारण काही गोष्टी दडवून ठेवणं हा गुन्हा वाटतो.

संपर्क साधायचा आहे ?
सोपंय – आमचा एकच मेल आयडी आहे:
teamughadughad@gmail.com

काही विषय मनात असेल, बोलायचं असेल, समजुन घ्यायचा असेल
तर मोकळं बोला. आम्ही ऐकायला तयार आहोत.
कारण आमचं एकच ध्येय आहे, जे कोणी बोलत नाही, ते उघड उघड बोलायचं.