mi ani maharashtra 🚩/ मी आणि महाराष्ट्र 🚩

लाखो वर्षापासून मनुष्य आपल्या बुद्धीच्या जीवावर स्वतःची प्रगती साधत आला.वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळया संस्कृती उदयास येत गेल्या,त्याच जोरावर मनुष्य आपले जीवन सरस बनवत आला.काळानुसार बदल हा अटळ आहे मात्र ज्या मातीतील संस्कारातून आपण विकास साधला त्या मातीचा आपल्याला विसर होत चालला.ज्या त्या प्रदेशातील लोकांनी आप आपल्या संस्कृतीचा वारसा जपायला हवा.म्हणजेच आपल्या वैभवशाली महाराष्ट्राचा इतिहास,संस्कृती आणि वारसा जपण्याचा आणि पुढच्या पिढीला दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न.
मी आणि महाराष्ट्र या चॅनेल मधुन आपल्या महाराष्ट्राचा इतिहास,संस्कृती,कला,मंदिरे,निसर्ग,यात्रा,खाद्यपदार्थ मी प्रत्यक्ष अनुभवून आपल्याला दाखविले जाईल.
यामधून चुकीची माहिती न देण्याची आणि निसर्गाचे नुकसान न होण्याची काळजी घेतली जाईल.
जय महाराष्ट्र