The Uday Nirgudkar Show

The Uday Nirgudkar Show हा एक मराठी विचारमंच आहे. या माध्यमातून आम्ही भारताच्या दृष्टीकोनातून जग आणि जगातील महत्वाच्या घडामोडी उलगड़ून दाखवायचा प्रयत्न करतो.

विविध देशातील व्यापारयुध्दे, राजकीय डावपेच, साहित्य, पर्यावरण, समाजजीवन, कुटुंबव्यवस्था, बदलते तंत्रज्ञान असा विलक्षण पट आम्ही उलगडून दाखवत आहोत.

आम्ही जगातील बदलत्या राजकारणाचा, भू-राजनैतिक आणि भू-सांस्कृतिक घडामोडींचा भारतावर आणि आपल्या राज्यावर पडणारा प्रभाव अशा प्रकारच्या विविध विषयांचे तर्कशुद्ध मराठी विश्लेषण करणे आणि समजून घेणे, हाच आपला हेतू आहे.

यात भारतातील आणि महाराष्ट्रामधील महत्वाच्या घटनांवर भाष्य आहे. ते तुम्हाला विचार करण्याची एक निश्चित दिशा देईल.

The Uday Nirgudkar Showच्या माध्यमातून विचार करा, चर्चा करा आणि भारताच्या भविष्याचा विचारशील भाग व्हा.