नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मी सौ रेशमा पांडव
लग्नाआधी कोणताही खाद्यपदार्थ तयार न करता येणारी मी. पण लग्न झाल्यावर मात्र आमच्या आईंनी ( सासूबाई) प्रत्येक गोष्ट शिकवायचा प्रयत्न केला आणि मीही प्रामाणिक प्रयत्न केला.आज प्रत्येक खाद्यपदार्थ करायला आणि तो इतरांना खाऊ घालायला खूप छान वाटतं. आईंच्या हातचं केलेलं अस्सल महाराष्ट्रीयन जेवण तर मी शिकलेच पण गुजराती, पंजाबी व साउथ इंडियन असे बरेच पदार्थ मी शिकत गेले . आमच्या आईंच्या हातच्या पदार्थांची चव माझे पतीदेव व माझा मुलगा घेत आहेतच, पण त्याचबरोबर अख्या महाराष्ट्रात ही चव पोहोचावी हीच इच्छा.
आज आई हयात नसल्या तरी त्यांच्या हातचे पदार्थ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.
आपण सर्वांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन आम्हाला पुढे जाण्यास मदत करणार आहे. तर वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला subscribe करा.