This channel is for farmer.i will try to make way easy of farming in agriculture field...


माझं शिवार

*० ते ५००० सबस्क्राईबस...*
माझं शिवार हा चॅनेल सुरू करण्यामागचा हेतू हा नेहमी शेतकरी हिताचाच होता.. आज तीन वर्षांच्या मेहनतीनंतर आपल्या चॅनलला 5000 सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत. जेवढा मोठा चॅनेल होईल तेवढी माझी जबाबदारी वाढत जाईल याची पूर्ण जाणीव मला आहे आणि त्यासाठी अजून परिश्रम मेहनत आणि अभ्यास घेऊन आपल्यासमोर असंच सातत्याने माहिती देत राहील हेच या निमित्ताने सांगू इच्छितो.. आजपर्यंत केलेल्या कामाची पोचपावती आपण दिली त्याबद्दल माझं शिवार चॅनेलच्या सर्व शेतकरी बंधू जे आपला चॅनेल बघतात त्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार...✨✨✨

1 week ago | [YT] | 9

माझं शिवार

*माझं शिवार*
*यू ट्यूब वरची माणस*
आज सकाळी कराड तालुक्यामधील केसे गावचे श्री शिवाजी शिंदे नाना श्री प्रदीप शिंदे सरपंच श्री सुरेश अप्पा श्री अनिल पाटील श्री अशोक पाटील श्री दीपक आप्पा श्री बाबासो शिंदे आप्पा यांनी माझ्या युट्युब वरचा व्हिडिओ बघून एवढ्या लांबून माझ्या शेतात भेट देण्यासाठी चार चाकी गाडी करून आले. खरंतर youtube वरून जोडलेली ही माणसं त्यांचा सहवास आज लाभला आणि नक्कीच काम करण्यासाठी खूप उत्साह आणि प्रेरणा मिळाली. त्यांच्याशी झालेली आजची चर्चा नक्कीच खूप अनुभवी होते त्यांच्याकडून बऱ्याच प्रश्नावर बोलता आले आणि आजचा तरुण शेतीमध्ये नवीन क्रांती कशी घडवू शकतो यावर खूप छान चर्चा झाली त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि इथपर्यंत माझी भेट घेण्यासाठी आली त्यासाठी मी आयुष्यभर त्यांचा ऋणी राहील आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जे त्यांना खूप चांगली माहिती उपलब्ध करून देतील असे टाकत राहील आणि शेतकऱ्यांची सेवा अशीच अविरत आयुष्यभर चालू ठेवीन एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार..

10 months ago | [YT] | 7

माझं शिवार

*माझं शिवार*

*3000 सबस्क्राईब पूर्ण*

नमस्कार मित्रांनो माझं शिवार चॅनलला आज तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले खरंतर हा टप्पा पूर्ण करणं माझ्यासाठी खूप अवघड आणि खूप महत्त्वाचे होतं. 

खरंतर हा चॅनेल सुरू करताना कधी असं वाटलं नव्हतं की हा चॅनेल होईल पण जसा तसा वेळ जात गेला तसं तसं समजून आले की आपण खूप काही करू शकतो आणि अजून खूप मोठ्या गोष्टी काही आपण करू शकतो आणि तेवढा आत्मविश्वास या निमित्ताने माझ्यामध्ये निर्माण झाला.

Youtube हे आता माझ्यासाठी एक कुटुंबासारखं तयार झालेला आहे आणि त्यासाठी मला वेळोवेळी ज्यांनी ज्यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं आत्मविश्वास दिला काही गोष्टी सांगितल्या की हे करते कर हे करू नकोस ते करू नकोस त्या सर्वांचा मी मनापासून नेहमी ऋणी राहील.

खूप मोठा टप्पा पार करायचा आहे आणि जेवढे पण होईल तेवढे शेतकऱ्यांचे सेवा करायचे आहे त्यासाठी आपल्या आशीर्वाद असेच नेहमी सोबत राहो हीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद..!!!

10 months ago | [YT] | 16

माझं शिवार

आज आजोबांनी सुरू केलेल्या आपल्या दुकानाला 49 वे वर्ष चालू झाले...आज योगायोग बघितला तर आपल्या सर्वांच्याच सहकार्याने चॅनल monetize पण झालं..
एक जबाबदारी घराची अणि एक जबाबदारी आपल्या चॅनल चि ...नक्कीच खूप कष्ट करून आपल्याला नविन नविन माहीती देत राहीन...

10 months ago | [YT] | 6

माझं शिवार

नवीन वर्षाच्या सर्व शेतकरी बंधूंना हार्दिक शुभेच्छा..
हे वर्ष आपल्याला भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

11 months ago | [YT] | 5

माझं शिवार

शेतकरी बंधू आणि मित्र परिवार आज आपल्या सहकार्यामुळे आणि प्रेमामुळे आपल्या माझं शिवार चॅनलला २५०० subscribers आणि सुमारे आत्तापर्यंत 1M म्हणजे 10 लाख व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत.
हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे आणि प्रौत्सहन देणारा आहे. यापुढेही आपल्यासाठी मी अशीच माहिती देत राहीन.भरपूर काही करायचे आहे ही तर फक्त सुरवात आहे.
......सर्वांचे खूप खूप आभार.....
*आपला शुभम पवार*

1 year ago | [YT] | 7

माझं शिवार

बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💥💥💥

1 year ago | [YT] | 0

माझं शिवार

*माझा वाढदिवस माझं झाड*
खर तर आज हा उपक्रम शुभ फाउंडेशन,आसद आणि नातं रक्ताच परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये चालू करत आहोत आणि या उपक्रमअंतर्गत कु.सुजल अंगवणे आणि कु.अशपाक शिकलगार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपलं शेत असेल किंवा परसबाग असेल या ठिकाणी वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला.या उपक्रमा मागचा उद्देश हा पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाविषयी पुढच्या पिढीमध्ये आवड निर्माण व्हावी हाच आहे.गावातील तरुण पिढी असो किंवा लहान मुलांचे वाढदिवस असो प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त एक तरी झाड लावावे आणि असच हे कार्य आपल्या गावात चालू राहावे ही प्रामाणिक अपेक्षा.
*आसद:एक वेगळं गाव वेगळे उपक्रम*

1 year ago | [YT] | 12

माझं शिवार

*वटपौर्णिमा*
आज खर तर वटपौर्णिमा..
वटपौर्णिमा म्हंटला की महिला वर्ग मस्त तयार होत असतात आणि आपल्या आयुष्यात पुन्हा हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाला ७ फेरे मारतात.पण असं असताना आज वडाचं झाड कुठे बघायलाच नाही मिळत.गावात एखाद झाड असतं आणि तिथेच सर्व महिला येत असतात.माझ्या डोक्यात विचार आला की आज आपण एक तरी वडाचं झाड लावावं आणि मी माझी कल्पना माझी बायको पूजा ला सांगितली.मग आम्ही ठरवलं की आज वडाचं झाड लावायचच.आम्ही नर्सरी मध्ये जाऊन झाड घेऊन आलो व ते लावले.आज खर तर बाब एका झाडाची नाही तर पर्यावरणाची आहे.झाडे राहिलीच कुठे ना?
आपल्याला गरज लागली की आपण झाडे शोधत असतो पण लावयच कधी धाडस करत नाही.निसर्गाला काही फरक पडत नाही पण फरक हा आपल्यालाच पडणार आहे आणि तो पडत आहे.झाडे लावायची आहेत ती निसर्ग वाचवण्यासाठी नाही तर माणसाचं अस्तित्व वाचवण्यासाठी!!
*झाडे लावा झाडे जगवा*
*आपलाच शुभम पवार आणि पूजा पवार*

1 year ago | [YT] | 15

माझं शिवार

Clean rivers...

1 year ago | [YT] | 6