शाळा एके शाळा

नमस्ते,
मी गोपाळराव होनमाने {रा.पु.प्राप्त शिक्षक,लेखक, स्काऊट मेडल ऑफ मेरीट प्राप्त आणि प्रगतशील शेतकरी }
"करील रंजन जो मुलांचे,जडेल नाते प्रभूशी तयाचे" या उक्तीप्रमाणे विद्यार्थी माझे दैवत आणि शाळा हेच माझे मंदिर.'- शाळा एके शाळा' या आमच्या युट्युब चॅनेल वर आपणास अंगणवाडी पासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी, पालक, शेतकरी यांना उपयोगी असतील असे व्हिडीओ पाहायला मिळतील.ज्ञान व मनोरंजन हाच खरा धर्म मानून खेळ,गाणी, गोष्टी,शेती विषयक अभ्यासपूर्ण असे स्पर्धा परीक्षा -MTS,TSE,NTS,NMMS,नवोदय, शिष्यवृत्ती या परीक्षा पासून पोलीस,सैन्य,पोस्ट,बँक,रेल्वे ,स्काऊट नोकर भरती ते एम.पी.एस.सी व यु.पी.एस.सी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे शेकडो व्हिडीओ आपणास आमच्या चॅनेलवर पाहायला मिळतील याचा सर्वांनाच फायदा होईल.तसेच विविध प्रकारचे व्हिडीओ आमच्या चॅनेलवर पाहायला मिळतील व त्यातून सर्वांना निश्चितपणे फायदा होईल असा मला विश्वास वाटतो .
आपला विश्वासू
गोपाळराव तानाजी होनमाने मु.पो.देवराष्ट्रे ता.कडेगाव जि.सांगली ९८२२५३३९२१ ९४०४२४२६५६