Satya Sargam Music World

नमस्कार संगीत प्रेमी,

आजकालच्या आधुनिक धावपळीच्या युगात संगीत आवडत नाही, संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असे म्हणणारा मनुष्य क्वचितच सापडेल. नैराश्य, तणावसारख्या आजारांना सामोरे जातो, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी विशेष करून भारतीय शास्त्रीय संगीत आणि महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक शास्त्रीय भजन मुख्य भूमिका पार पाडत असते. मानवाला मिळालेली उत्तम देणगी म्हणजे संगीत भजन. जन्मापासून ते अगदी मृत्यूपर्यंत मानवासोबत संगीत असतेच. जीवनातला खरा सोबती संगीत आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.

म्हणूनच आपला सत्य सरगम म्युझिक वर्ल्ड हा Youtube Channel सुप्रसिद्ध, नामवंत, संगीत भजन प्रेमी कलाकारांचे व्हिडिओ अपलोड करत असतो. जेणे करून महाराष्ट्रातील संगीत भजनाचा व भजनी कलाकारांचा प्रचार व्हावा आणि आपल्यासारखे संगीत रसिक तणाव मुक्त होऊन त्यांच्या या कार्याला लाईक, शेयर आणि कमेंट्स करून त्यांना दाद द्यावी ही विनंती...
हे संगीताचे कार्य आपल्या सर्वांना मिळून संपन्न करायचे आहे . आपल्या सारख्या संगीत प्रेमींच्या 🤝साथी मुळेच हे शक्य आहे.
तुमच हे ❤️प्रेम असच माझ्या पाठीशी असुद्या.
धन्यवाद🙏