Sant Swami Maza Sangati

नमस्कार. माणसाच्या आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. सुख दु:ख यांच्या हिंदोळ्यावर झुलत माणसाची जीवन यात्रा चाललेली असते. पण कोणताही सत्संग, किंवा मार्गदर्शक गुरु माणसाला तटस्थपणे, त्रयस्थपणे किंवा स्थित प्रज्ञ होवून विचार करायला लावू शकतात किंवा फसव्या मोहापासून , विकार वाढविणार्‍या वृत्तींपासून लांब ठेवू शकतात. "संत स्वामी माझा सांगाती" हे त्याचेच एक प्रतीक म्हणायला हवे. मी योगसाधना करायला लागल्यापासून मला अनेक चमत्कारिक अनुभव यायला लागले, चांगली माणसे भेटू लागली आणि योगसाधना केवळ शारीरिक व्याधींसाठी न राहता आध्यात्मिक उन्नती साठी झाली असेच म्हणावे लागेल. मग प्रश्न असा निर्माण झाला की मी फक्त एकटाच नाही तर माझ्यासारखे असे अनेक असतील त्यांना सुद्धा वाटत असेल की आपण आपल्या गुरूंविषयी किंवा घडविणार्‍या संतांविषयी मोकळेपणाने व्यक्त व्हावे पण व्यक्त होताना अडचणी येतात मग अशा सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी हा उपक्रम केलेला आहे. कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदविण्यासाठी किंवा प्रमोशन साठी ईमेल करावा - santswami4@gmail.com Whatsapp 9867985898. धन्यवाद.