Let us grow with spiritual power, peace and smile मी भाग्यवान आहे कि कळत नकळत तुमच्यासोबत माझाही अध्यात्म वाढत आहे; चला अध्यात्म वाढवूया..🌹
अध्यात्म:- अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.
गुरु का करावा? तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी गुरु स्वतःवर घेत असतो, आयुष्यात जर तुम्हाला तुमचं नाव मोठं करायचं असेल, चांगलं जगायचं असेल तर कायम गुरूच्या सान्निध्यात रहा; गुरू परमेश्वर आणि माणूस ह्यांच्यातला दुवा आहे जो तुम्हाला परमात्म्याशी जोडतो, मोक्ष मिळतो. आयुष्यात एक गुरू नक्की करावा म्हणजे प्रपंचातून परमार्थ साधता येतो आणि मोक्षाचा प्रवास सुखमय करता येतो...!!!
कोण आहेत ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ?
स्वामी सांगतात,
- सागराच्या हृदयाला भरती आणणारं गुरुत्वाकर्षण आहे “मी”.
- जो रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तो दिवा, सूर्य, मी लावलाय.
- वीज हि निर्मिती असेल तर कुणीतरी निर्माता असणारच, तो वीज निर्माता मी आहे.
- विज्ञानाच्या अंधकारात आशेचा एक किरण घेऊन येणारा अध्यात्म आहे मी, विज्ञान हे जग कस निर्माण झालं हे सांगत असेल तर अध्यात्म हे विश्व का निर्माण झालं हे सांगतं.