Sajjangad Sansthan

श्रीसमर्थ रामदास स्वामीनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्व प्रतिपादन प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्रीसमर्थांना जाणवली. श्रीसमर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाजकार्यासाठी सतत झटणारा असा होता. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती निर्माण करेल असा श्रीसमर्थांचा विश्वास होता. त्यांनी इ. स. १६४४ मध्ये शहापूर जि. सातारा येथे पहिला मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. इ. स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले. अशा रीतीने रामदासी संप्रदायासाठी संस्थानची स्थापना इ. स. १६४८ मध्ये श्रीरामदास स्वामींनीच केली. हेच संस्थान श्रीरामदास स्वामी संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.


Sajjangad Sansthan

*श्रीराम व श्रीसमर्थ समाधी मंदिर जीर्णोद्धार*

नाना रचना जीर्ण जर्जर। तयांचे करावें जीर्णोद्धार।
पडिले कार्य ते सत्वर। चालवित जावें।।

मातृक्षेत्र श्रीसज्जनगडावरील श्रीराम व श्रीसमर्थ समाधी मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. 'देवाल्ये बांधेन अनंत हस्ते' या श्रीसमर्थोक्तीच्या प्रेरणेतून सर्व भाविक-भक्तांनी या जीर्णोद्धार कार्यात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.

।।जय जय रघुवीर समर्थ।।

2 years ago | [YT] | 136

Sajjangad Sansthan

जय जय रघुवीर समर्थ
‪@sajjangadsansthan‬

2 years ago | [YT] | 83

Sajjangad Sansthan

जय जय रघुवीर समर्थ....

2 years ago | [YT] | 52

Sajjangad Sansthan

त्वरे शिघ्र उठोनी वेगीं चलावे।
समर्थप्रभू लागीं भेटीसी यावें।
तरी सर्वही सौख्य पावाल वेगीं।
तुम्हां सूचना रे चला लागवेगीं।।

श्रीसमर्थांच्या वास्तव्याने पुनीतपावन झालेल्या सज्जनगडावर श्रीसमर्थांचा ३४२वा पुण्यस्मरण उत्सव अर्थात दासनवमी महोत्सव माघ पौर्णिमा ते माघ वद्य दशमी, शके १९४५, शनिवार, दिनांक २४ फेब्रुवारी ते बुधवार, दिनांक ६ मार्च २०२४ या दरम्यान संपन्न होत आहे. आपण सर्व समर्थभक्तांनी उत्सवकाळात श्रीसमर्थांच्या पावन सानिध्यात श्रीक्षेत्र सज्जनगडावर उपस्थित राहून श्रीसमर्थसेवेचे व दर्शनाचे भाग्य संपादन करावे.

सर्व श्रीसमर्थभक्तांना श्रीसज्जनगड संस्थान मातृसंस्थेच्या वतीने दासनवमी महोत्सवाचे सादर निमंत्रण.

जय जय रघुवीर समर्थ!
#sajjangad #ram #ramdasswami
#das #navmi #utsav

2 years ago | [YT] | 73

Sajjangad Sansthan

श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी मठ, धनकवडी,पुणे येथे
सज्जनगडच्या श्री समर्थ रामदासस्वामी महाराजांच्या मूळ पादुकांच्या दर्शन सोहळा
सोमवार दि.२४ जुलै २०२३

2 years ago (edited) | [YT] | 31

Sajjangad Sansthan

**** !!दासनवमी महोत्सव !! दि. 0६.०२.२०२३ ते १५.०२.२०२३

किती भक्त लोकांसि ते प्रार्थना हो।
तुम्ही दासनवमीसि ठाकूनि या हो।
अरे तुमचे हातीचा लाभजातो।
पुढे प्राप्त काळांतरी होय ना तो।।

त्वरे शीघ्र उठोनि वेगीं चलावे।
समर्था प्रभू लागीं भेटीसि यावे।
तरी सर्वही सौख्य पावाल वेगीं।
तुम्हां सूचना रे चला लागवेगीं।।

3 years ago | [YT] | 59

Sajjangad Sansthan

श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड आयोजित श्री समर्थ चरण पादुका प्रचार व प्रसार दौरा चिंचवड येथे मुक्कामी असताना आज श्री समर्थ चरण पादुका श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिरात माऊलींच्या भेटी साठी गेल्या होत्या , त्यावेळी येथील विश्वस्तांनी श्री समर्थ चरण पादुकांचे स्वागत केले , त्यावेळी श्री समर्थ वंशज भूषण स्वामी महाराज व सर्व रामदासी मंडळी उपस्थीत होते, श्री समर्थ रामदास स्वामी यांनी माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचलेली आरती म्हणण्यात आली , दोन संताच्या भेटीचा योग जुळून आला , श्री समर्थ म्हणतात _ साधू दिसती वेगळाले । परी ते स्वरुपी मिळाले । अवघे मिळूनी एकचि झाले । देहातीत वस्तू।। जय जय रघुवीर समर्थ। माउली ज्ञानेश्वर महाराज की जय।। ‪@jogMaharajsanstha1917‬ ‪@दुर्गनादप्रतिष्ठानकिल्लेसज्जनग‬ ‪@Devachiaalndi‬

3 years ago | [YT] | 61

Sajjangad Sansthan

जय जय रघुवीर समर्थ

3 years ago | [YT] | 31