Vijay Kelgane vlogs

जगातील काही सदाहरित वनांपैकी महाबळेश्वर हे महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर एका विस्तृत १५० चौ.की.मी.सपाट पृष्ठभागाच्या सोंडेवर समुद्रसपाटीपासून ४७२१ फुट उंचीवर वसलेले आहे. ब्रिटिशांनी दिलेला हिल‌‌ स्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. महाबळेश्वर पठाराच्या चहूबाजूंनी नद्यांची खोरी, विविध उंचीच्या सुळक्याचा, डोंगरांचा विशाल प्रदेश व उभट डोंगर कड्यांचा भूप्रदेश ही या प्रदेशाची विशेषता होय. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री, गायत्री या नद्यांचा उगम येथिल डोंगरांत होतो. सन १८२४ मध्ये सातारा येथील ब्रिटीश सैन्याच्या तुकडीचे प्रमुख मेजर पीटर लाॅडविक यांना हा भाग पाहण्यास प्रथम आले. नोव्हेंबर १८२७ मध्ये सर जॉन माल्कम यांनी महाबळेश्वर विकसित केले व ज्यांनी महाबळेश्वर विकसित केले त्या ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या गौरवार्थ त्यांच्या नावानेच येथील स्थळे ओळखले जातात त्यामध्ये विल्सन पॉईंट, ऑर्थर सीट,कॅनाॅटपीक पाॅईंट,केटस्॓ पाॅईंट,एलि्फस्टन पाॅईंट,लाॅडविक पाॅईंट,इ. लिंगमळा,धोबी, चायनामन हे धबधबे, महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर, वेण्णा तलाव, प्रतापगड व मकरंदगड हे किल्ले,