नमस्कार मी जयश्री, माझ्या आहारबोली या यू ट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे...!
आहारामार्फत आपल्याशी संवाद साधू इच्छिते, मला खाण्याची आणि खाऊ घालण्याची मनापासून आवड आहे. साहित्य कमी पण चवीची हमी , ही माझी टॅगलाइन आहे, त्यामुळे कमी आणि सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून, चांगल्या चवीचा पण नाविन्यपूर्ण पदार्थ बनविणे, हा माझा मुख्य हेतू राहील. आपण जे काही करतो ते सगळ्यांपर्यंत पोचवणे हा एक विचार. मला 3 वेगवेगळ्या प्रांताची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे तिथले पारंपरिक पदार्थ आणि त्यात थोडे बदल करून नवीन पदार्थ केले आहेत..!
तसच आरोग्याचा विचार करून पदार्थ बनविले आहेत, तर असा हा स्वादपरंपरेचा वारसा सगळ्यापर्यंत पोचला पाहिजे ही तळमळ. त्याकरिता माझा हा छोटासा प्रयत्न, त्यात तुमचा सहभाग सगळ्यात महत्वाचा.!
माझ्या चॅनल ला लाईक आणि subscribe करा ही नम्र विनंती..!