नमस्कार,
मी मनोज ललितकुमार जाधव, MJ motovlogger या आपल्या YouTube Channel वर तुमच स्वागत करतो. नावावरून एकंदरित तुमच्या लक्षात आल असेलच कि हे channel Travel & Explore च्या उद्देशाने बनवले आहे.

माझ्याबददल थोडक्यात सांगायच झाल तर अस्सल मुंबईकर, चहा आणि वडापावशिवाय दिवसच जात नाही. तसा मी कोकणी असल्यामुळे निसर्गावरचं प्रेम हे रक्तातच आहे. तिथूनच भटकंती करायची आवड निर्माण झाली. भटकंतीकरून झाल्यावर त्या सर्व गमती जमती आणी माझा travelling चा अनुभव मित्रांसोबत share करत असतानाच मनात विचार आला की हाच अनुभव मला शब्दात सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष cameraमध्ये टिपून जर मला दाखवता आला तर तो अधिक जास्त पोहोचू शकेल . त्यांना अस वाटेल जणू काही ते प्रत्यक्ष अनुभवत आहेत.

आयुष्यात आधी शिक्षण नंतर नोकरीच्याशर्यतीमध्ये स्वत:साठी जगायच राहून गेलं आणि आता फक्त स्वतःसाठी जगायचय.

तुमच प्रेम आणि तुमची साथ नेहमी माझ्यासोबत राहुद्या हि नम्र विनंती .
तुम्हा सर्वांचे मनापासुन खुप खुप आभार

आपला,
मनोज ललितकुमार जाधव.


4:33

Shared 1 year ago

208 views