Krishnaji Production

एकदाच जीवन असं जगावं ,
कि साऱ्या जगण्याला अर्थ आला पाहिजे ,
मनातल्या आवाजाला प्रतिसाद ,देता आला पाहिजे ,
कुणासाठी तरी अश्रू ढाळता येतील एवढ प्रेम करता आलं पाहिजे ,,
माणूस म्हणून एकदा तरी जगता आलं पाहिजे ,
मंदिरातल्या दगडातही कधी ,
देव पाहता आला पाहिजे ,
श्रद्धा आणि सबुरीचा जीवनात ,
अनुभव घेता आला पाहिजे ,
छेडलेल्या वीणेचा सूर हृदयाला भेदला पाहिजे ,
सृजनतेने कलेकडे एकदा ,
उघड्या डोळ्यांनी बघता आलं पाहिजे ,
शेकडो मरण मारण्यापेक्षा ,
एकदाच धाडसानं मरता आलं पाहिजे ,
पृथ्वीवर माणूस म्हणून जन्माला येवून ,
जगण्याला एकदा अर्थ आला पाहिजे ,
माणूसपण जपण्यासाठी हा देह झिजला पाहिजे ,
वेदना आणि करुणा पाहून ,
पाणी उभं राहण्याची जाण डोळ्यांना आली पाहिजे ,
एकदाच जीवन असं जगावं ,
कि साऱ्या जगण्याला अर्थ आला पाहिजे .
-कृष्णाजी माणिक बिरादार
Hello all, I am writer . I am sharing with you the videos of creative work like audiobooks, Poems and short films, films under krishnaji Production, and more.
You can find Motivational Videos too.

For business inquiry Contact : krishnabiradar2008@gmail.com