गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक आणि माध्यम क्षेत्रात माहिती आणि ज्ञान प्रबोधन करत, आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणारं नाव म्हणजे 'सत्यवेध'... दिनांक ९ ऑक्टोबर २०१० पासून, ज्याचा श्रीगणेशा पाक्षिकाच्या स्वरूपात झाला, ते सत्यवेध...ज्याने अयोध्या रामजन्मभूमी सारख्या ज्वलंत विषयांपासून ते विकसित भारताच्या वाटचालीवरील उद्योगविश्व, बदलते अर्थकारण, बदलता भारत, अर्थसाक्षरता ,साखर उद्योग, पर्यावरण आणि शिक्षण यासारख्या विविध विषयांवर आपल्या अंकांच्या माध्यमांतून प्रकाश टाकला आणि समाजभान जागृत केले.हाच वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्र, गोवा आणि सीमाभागांतील वाचकांच्या आग्रहामुळे आम्ही यु-ट्यूब या डिजीटल माध्यमावरही पदार्पण करत आहोत.....

माध्यम क्षेत्रातील प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक मिडियातील ,गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या आणि नवीन पिढीतील नवे कौशल्य आणि नव्या संकल्पना घेऊन सामाजिक विचार , राजकीय प्रवाह ,ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा धांडोळा घेत ,प्रभावी विषयांचा वेध घेण्यासाठी आम्ही म्हणजे 'सत्यवेध' सज्ज आहोत....