मराठी आरक्षण आणि अधिकारांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा चॅनल तयार केला आहे. मराठी लोकांनी, विशेषत: मुंबई आणि संपुर्ण महाराष्ट्र प्रदेशात, आपल्याला हक्काने सोई-सुविधा मिळाल्या पाहिजेत. आपल्या संस्कृतीचा सन्मान राखत, आपले हक्क आणि अधिकार जपणे अत्यंत गरजेचे आहे. आज जर मराठी लोक जपले गेले नाहीत, तर पुढील 10 वर्षांमध्ये आपण कोण आहोत, आपली ओळख काय आहे, हेच आपल्याला समजणार नाही.
या चॅनलचा उद्देश कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाशी संघर्ष करणे नाही, तर आपल्याच माणसांशी संवाद साधून, शांततेने आपल्या समस्या सोडवणे आहे. एकत्र येऊन, आपले हक्क आणि अधिकारांची जाणीव करून देणे, हा आपल्या चळवळीचा मुख्य हेतू आहे. महत्वाचे म्हणजे, हा चॅनल कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत नाही; केवळ मराठी माणसांच्या हितासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी समर्पित आहे.
Shared 2 years ago
17 views
Shared 2 years ago
21 views