Madankumar Jadhav

foodie, food explorer, traveller, foodblogger,

instagram link -instagram.com/madankumar.jadhav?igshid=ZDdkNTZiNTM…

facebook link
www.facebook.com/madankumar.jadhav?mibextid=ZbWKwL

Level 7 local guide
maps.app.goo.gl/X2tP6xDeVN5M7SmM8

follow my food journey on Zomato
zoma.to/u/15754023


khadad_bhava

शिव पार्वती 🕉️🙏

2 months ago | [YT] | 48

khadad_bhava

#customerreview

श्रावण संपला आणि खादाडी करायला कुठे जायचं हे बघत असताना मासाहारी किचन ची नव्या FC रोड वरील ठिकाणची ऑफर ची रील दिसली. कोणत्याही 2 फिश थाळ्या फक्त 777 मध्ये आणि सोबत एक मोकटेल फ्री.

एकावर एक फ्री, 99, 499, 555 आणि हे 777 अशे आकडे बघितलं की माझ्यासारखा कॉमन मॅन लगेच मनात आकडेमोड करून भुलतो. मासाहारी किचन तसं माझ्या आवडीच्या रेस्टॉरंट मधील एक आहे, जुलै मध्येच त्यांच्या पाषाण रोड वरील शाखेत गेलो होतो. आता तीच शाखा इकडं शिफ्ट झाली आहे, ऑफर मूळे इथे भेट द्यायचं ठरवलं.

हे नवीन ठिकाण अवध च्या जागेवर सुरू झालं आहे,भरपूर प्रशस्थ बैठक व्यवस्था आहे. वॅलेट पार्किंग आहे. पोचल्यावर वेळ न लावता ऑर्डर दिली. ऑर्डर येई पर्यंत तिवळ आलं होतं. मस्त चव एकदम फॅन आहे मी इथल्या तिवळ चा.

#खेकडा मसाला: रिधीला खेकडा खायचा होता म्हणून मागवला, एक मध्यम आकाराचा समुद्री खेकडा, ड्राय मसाल्यात फ्राय करून आणला होता. रिधीला खेकडा फोडून द्यायचा काम माझं असते. नांग्या ती खाते न पेंद्या मी खातो. खेकडा मस्त लागत होता, त्याची ओरिजिनल गोडसर चव न त्यात हा हलका तिखट मसाला एकदम मस्त कॉम्बिनेशन.

#तिसऱ्या मसाला: थाळी येई पर्यंत काय खायचं हे ठरवत असताना मालकांनी ही डिश सुचवली होती. तिसऱ्या खाऊन बरेच महिने झाले होते. मग येऊदे म्हणलं डिश पाडू फडशा. डिश आल्या आल्या तिच्या मसाल्याचा घमघमाट असा सुटला होता, की फोटो पटापट काढुन कधी एकदा खातोय असं झालं. एक घास घेताच ब्रह्मनंदी टाळी का काय म्हणत्यात तसं झालं. एकदम जबऱ्या चव. नुसता विषय. सुक्या मसाल्यात फ्राय केला असल्यानं स्टार्टर म्हणून खायला एकदम भारी डिश. फुल्ल रेकेमण्ड.

#पापलेट थाळी: हिच्यासाठी घेतली होती. एक मोठा मध्यम आकाराचा पापलेट फ्राय, कोळंबी करी त्यात एक कोळंबी. सोलकढी, तिवळ आणि कोळंबी लोणचं. पापलेट फ्राय नेहमी सारखा उत्तम. सोलकढी मस्तच. फिश करी चे आम्हा दोघांना जास्त अशी आवडत नाही मात्र इथली कोळंबी करी मस्तच, भातासोबत तर एकदम भन्नाट लागली. थाळी मधील खास पदार्थ म्हणजे कोळंबी लोणचं. एक बार खायेगा तो बार बार खायेगा.

सुरमई थाळी : वरील सारखीच थाळी फक्त यात सुरमई चा पीस.

एवढं सगळं खाऊन भरपेट जेवण झालं होतं. श्रावण संपल्याची सांगता जोरात झाली होती. हॉटेल चे मालक राहुल दादा उपस्थित होतेच त्यांना फीडबॅक आणि नवीन जागेबद्दल शुभेच्छा देऊन निरोप घेतला.

खादाड भावा : मदनकुमार जाधव

पत्ता : मासाहारी किचन

Unit no: 2,Survey No, Elite Colossal, Opp Police Ground, 3rd Floor, 1142, Fergusson College Rd, above Yana Sizzlers, Shivajinagar, Pune, Maharashtra 411005

maps.app.goo.gl/PagPUSvR9SZShFpc8

#khadad_bhava #madankumarreview #masaharikitchen #seafood #positivereview

3 months ago | [YT] | 3

khadad_bhava

ह्या विकएंड ला कराडच्या मित्रांसोबत फिरायला जायचा प्लॅन झाला. सांगलीचे ऐतिहासिक गणपती मंदिर आणि त्या नंतर नरसोबाची वाडी (नृसिंहवाडी). दोन्ही ठिकाणी मस्त दर्शन झाले.

दर्शन होई पर्यंत 1 वाजला होता. एका मित्राने वाडी मधील सोमण खानावळला जाऊया हे ठरवलं.
ह्या नावाच्या इथे बऱ्याच खानावळी आहेत, त्यातील जुनी खानावळ त्यानं शोधून काढली होती.

तिथं पोचलो तर आधीच 25-30 जण वेटिंग मध्ये होते. जवळपास पाऊण तासाने नंबर आला. लोखंडी टेबल्स ची बैठक व्यवस्था आहे. पंगत बसवल्या सारखं करूनच जेवण वाढायला सुरुवात करतात. ताट वाट्या एकदम स्वच्छ होत्या. एक एक करत पदार्थ यायला सुरुवात झाली. गरमागरम भात न त्यावर वरण आणि तूप. कोशिंबीर, डाळीची चटणी,गाजर लोणचे, मिरची लोणचं, अक्खा मसूर, मिक्स भाजी आणि वांगे भाजी. भात एकदम गरमागरम होता, अगदी वाफा निघणारा. भात खाऊन होतोय तो पर्यंत चपाती आणि पुऱ्या यायला सुरुवात झाली. तेवढ्यात बासुंदी आणि ताक पण आले. पुऱ्या , चपात्या वाढताना सगळे अगदी आग्रह करून वाढत होते. बासुंदी देखील 2 वेळेला मिळाली.

मालक देखील स्वतः 3/4 वेळा पुऱ्या आणि चपाती वाढून गेले. सगळं गरमागरम येत असल्याने नेहमीपेक्षा 4/5 पुऱ्या जास्तीच्या गेल्या. आता जेवण संपलं असेल असं वाटत असताना मसाले भात आला, तो पण गरमागरम, तो खायला सुरुवात केली तो पर्यंत पुन्हा एकदा पांढरा भात आणि वरण. काय खरंच नाही.

जास्तकरून बाहेर जेवायला गेल्यावर माझं मांसाहारी जेवण भरपेट असतं, शाकाहारी कधीतरीच भरपेट खाल्लं जातं. आज मात्र शाकाहारी जेवण असून देखील अगदी पोटभर जेवलो. जेवण झाल्यावर पानाचा विडा पण देतात. तो देखील चवीला मस्त आहे.

जेवणाची चव एकदम भारी अशी नाही मात्र इथं असलेली स्वच्छता, गरमागरम पदार्थ, आग्रहाचं वाढणं यामुळे खरंतर जेवण चविष्ट लागलं,आणि किंमत फक्त 170 रुपये. पुन्हा कधी असं सात्विक खाऊ वाटलं तर येणार येथे.

खादाड भावा : मदनकुमार जाधव

पत्ता:सचिन सोमण भोजनालय

maps.app.goo.gl/fKxJ6EpPFqcMCGKY6

#khadad_bhava #madankumarreview #wadi #somanbhojanalay #veg #positivereview

3 months ago | [YT] | 1

khadad_bhava

#customerreview

जुन्या कंपनीच्या मित्रांचे प्रमोशन झाले होते त्याचं सेलिब्रेशन करायला आम्ही कर्जतला एका रिसॉर्ट ला गेलो होतो.

रिसॉर्ट जवळ चा 300-400 मीटर रस्ता सोडला तर बाकी रस्ता व्यवस्थित आहे. गेट मधून आत शिरताच दिसला तो भला मोठा स्विमिंग पूल. लहनांसाठी बेबी पूल पण आहे. बॅगा ठेवायला रुम मध्ये गेलो तर इथल्या रूम्स प्रशस्त आणि स्वच्छ होत्या. बेडशीट , रजई या अजिबात डागाळलेल्या न्हवत्या. एकंदरीत फर्स्ट इम्प्रेशन तर चांगले पडलं होतं. दुपार चे जेवण पॅकेज मध्ये असल्यानं त्या अगोदर स्विमिंग पूल मध्ये मस्त मज्जा केली आणि मग जेवायला गेलो. व्हेज, नॉनव्हेज दोन्ही अमर्याद आहेत. एक व्हेज भाजी, डाळ, एक चिकन सुक्का, रस्सा आणि चपाती , खीर असा बेत.

जेवून झाल्यावर थोडे पत्ते वगैरे खेळून झाले की पुन्हा एकदा स्विमिंग पूल मध्ये डुंबायला मोकळे झालो. स्विमिंग पूल चे पाणी स्वच्छ ठेवलं आहे. स्विमिंग पूल मधून समोर असलेल्या डोंगररांगा आणि त्यावर असलेले धुकं, असा मस्त नजरा दिसतो. म्युझिक साठी चांगल्या क्वालिटीचा स्पीकर आहे , स्विमिंग पूल शेजारी लावून मस्त गाणी ऐकत एन्जॉय केला.

संध्याकाळी अमर्याद कांदा भजी, एक वडापाव आणि चहा असा नाष्टा करून पुन्हा रम मध्ये आमचा टीपी सुरू झाला. संध्याकाळी दुपार सारखा मेनू ह्यावेळी व्हेज मध्ये पनीर ची भाजी होती आणि तांदळाच्या भाकऱ्या.

सकाळी नाश्त्याला पोहे, मिसळ आणि अंड्याची भुर्जी असा बेत होता. नाश्ता करून केअर टेकर ला फीडबॅक देऊन निघालो.

रुम्सची आणि स्वीमिंग पूल ची स्वछता चांगली आहे. महत्वाचे म्हणजे इथे लाईट गेल्यावर जनरेटर ची सोय आहे. फॅमिली फ्रेंडली रिसॉर्ट आहे. आम्ही असताना आम्हीच बॅचलर होतो, बाकी 5/6 फॅमिली होत्या आणि एक बॅचलर मुलींचा ग्रुप. ह्यावरूनच कळतेय की फॅमिली साठी योग्य आहे. मोबाईल ला नेटवर्क देखील आहे. रिसॉर्ट पासून 1 किमीच्या जवळ असलेल्या छोट्या गावात, चिप्स,बिस्किटे , कोल्डड्रिंक्स मिळतात. खंडेराव (समजदार को इशारा काफी हे) चे पण दुकान तिथं जवळच आहे.

ह्या आगोदर कर्जत मध्ये 3-4 वेगवेगळ्या रिसॉर्ट ला राहिलो होतो पण इथला अनुभव चांगला आहे.

काही सुधारणा करण्या सारख्या गोष्टी ज्या मला वाटल्या त्या म्हणजे जेवणा मध्ये अजून थोडे मेनू ऍड केले तर चांगलं होईल. इथं तुम्हाला वेगळा मेनू हवा असेल तर बनवून देतात पण त्याचे चार्जेस लागतात. ह्या ऐवजी एक दोन स्टार्टर सारखे मेनू ऍड केले तर बरं होईल.
स्विमिंग पूल मध्ये लहान मुलांना खेळायला बॉल्स, किंवा त्यांच्या सेफटी साठी स्विमिंग ट्युब कुठे दिसल्या नाहीत आणि पोहायला न येणाऱ्या गेस्ट साठी जर काही लाइफ जॅकट असले तर त्यांना देखील पोहायाचा आनंद घेता येईल.

आशा करतो की मालक ह्यांवर विचार करतील.

मला रिसॉर्ट आवडला असल्याने नुकतंच 10 दिवासातच पुन्हा एकदा इथे जाऊन आलो.

खादाड भावा : मदनकुमार जाधव

पत्ता : Hideout resort

Tata Power Road, Karjat, Vaijanath, Maharashtra 412106
g.co/kgs/WkvpHv1

Contact 8767646073

#khadad_bhava #madankumarreview #resort #hideout #karjat

3 months ago | [YT] | 1

khadad_bhava

बाणेर च्या तुकाई टेकडीवर मागील वर्षी पर्यावरण दिनानिमित्त काही रोपं लावली होती, ती बघायला आणि नवीन रोपे लावायला आत्ता पुन्हा गेलो होतो. सोबत ही आणि रिधी होती. इथला श्रमपरिहार झाल्यावर दोघींनी आता आम्हाला मोबदला म्हणून जेवायला बाहेर न्या हा आदेश दिला.

बाणेर च्या आसपास ठिकाण शोधत असताना, मासाहारी किचन ची नवी शाखा जायच्या रस्त्यापासून जवळ आहे आणि अजून तिथं भेट दिली नाही हे लक्षात आल्यावर मोर्चा तिकडे वळवला.

8/10 मिनिटात पोचलो. मासाहारी किचन चा तसा मी जुना ग्राहक, त्यांच्या मोजक्या ग्राहकांच्या पैकी मी एक आहे ज्याने त्यांचं क्लाउड किचन असताना जेवण खाल्लं आहे, त्यांनतर आंबेगाव ला 4 टेबल्स चे छोटे रेस्टॉरंट टाकले होते तिथे त्यांनतर कात्रजला थोडं अजून मोठे रेस्टॉरंट असताना आणि त्या नंतर आता ही नवीन शाखा. ही नवीन शाखा एकदम प्रशस्त आहे, टिपिकल फाइन डाइन रेस्टॉरंट चा फील देणारी. 35/40 टेबल्स असतील. मागील 4/5 वर्षात आंबूर्ले कुटुंबाने घेतलेलं कष्ट, त्यांची जिद्द आणि चिकाटी ह्याच फळ म्हणजे त्यांची होत असलेली ही प्रगती.

वेळ न दवडता इथली आम्हा तिघांना देखील आवडणारी डिश मागवली ती म्हणजे बोंबील लेमन पेपर, त्या नंतर टुडे'ज स्पेशल मधील काही डिशेस मागवल्या.

#बोंबील लेमन पेपर: ताजा ताजा बोंबील आणि क्रिस्पी कोटिंग. सोबत मेयो, एक नंबर विषय. बोंबील अक्षरशः तोंडात विरघळत होता. रिधीची तर ही फार फेवरेट डिश आहे. त्यामुळे आम्हाला एक एक पीस च्या वर काय दिलं नाही, म्हणून आमच्या साठी बोंबील रवा फ्राय मागवला.

#बोंबील फ्राय: पारंपरिक बोंबील रवा फ्राय. हा तर एकदम कुरकुरीत असा लागत होता. बोंबील अजिबात तेल पिलेलं न्हवते. नाहीतर काही ठिकाणी तेलाने डबडबले असतात.

#मखमली पापलेट: टुडे स्पेशल लिस्ट मधील ही डिश ट्राय करू म्हणलं. घरगुती मसाल्यात मॅरीनेट करून मस्त असा तंदूर केलेला पापलेट. खरपूस झालेल्या कडा आणि मऊ मऊ खोबर्या सारखा पापलेट म्हणजे जिभेची चंगळच.

#चणक् हिरा पन्ना: हा मासा तर माझ्या गोव्याच्या ट्रिप मधील फिक्स डिश. हिने आत्ता पर्यन्त चणक् खाल्ला न्हवता म्हणून मागवला. रेड आणि ग्रीन अश्या दोन वेगवेगळ्या मॅरीनेट मध्ये असलेले आणि ग्रील केलेले बोनलेस फिश क्यूब्स. काटे नसल्याने ही तर जाम खुश. दोन्ही मॅरीनेट ची चव मस्तच होती.

नुसत्या स्टार्टरनेच पोट भरले त्यामुळं मेन कोर्सला डकचू. जेवण पचवायला मला आवडणारी पाचक सोलकढी आणि हिला आवडणारं तिवळ घेतलं. सोलकढी ताजी आणि मला हवीतशी तिखटचा झनका देणारी होती. तिवळ पण एक घोट घेतलं हे देखील मस्त.

ही नवीन शाखा मला फार आवडली, ऐसपैस बैठक व्यवस्था, काचेतून दिसणारी समोरील टेकडीवरील हिरवाई, एकदम छान.

मी यांच्याकडे येत राहिलो आहे आणि पुन्हा पुन्हा येत राहणार.

खादाड भावा: मदनकुमार जाधव.

पत्ता : मासाहारी किचन,

Shop no 28, Ground Floor, link road bridge, Platinum 9 business Park, Pashan - Sus Rd, near Pizza Hut, Baner, Pune, Maharashtra 411045

maps.app.goo.gl/R148U6pXsoSoqiCN9

4 months ago | [YT] | 1

khadad_bhava

#support local Business

कर्वेनगर च्या कॅफे "रुमानियत" ला 11 च्या आसपास पोचलो असेन. मेनू चाळला तर त्यात महाराष्ट्रीयन नाष्ट्याचे चे पदार्थ तसेच सँडविच, बर्गर, मॅगी, पास्ता, अंड्याच्या डिशेस दिसून आल्या. वेगवेगळा मेनू ट्राय करायचा ठरवून ऑर्डर दिली.
आम्ही खालील पदार्थ खाल्ले.

#भाजनीचे थालीपीठ: आम्ही इथे खाल्लेल्या पदार्थामधील सगळ्यात बेस्ट. बेस्ट म्हणजे एक नंबर विषय. गरमागरम थालीपीठ दह्या सोबत असलं भारी लागलं ना की मन तृप्त. घरी देखील आम्ही थालीपीठ बनवतो पण इथली चव मात्र युनिक वाटली.

#बॉम्बे मसाला सँडविच: हा रिधीने निवडला होता. यातील 1 पीस मी देखील खाल्ला. ह्यात ब्रेड मध्ये स्टफ केलेला मसाला भारी होता, नुसता बटाटा न जाणवता त्यात मसाल्यांची पण चव येत होती.

#व्हाइट सॉस मॅगी: ही देखील रिधीची फर्माईश, ह्यात क्रिमी व्हाईट सॉस आणि वरून खिसलेले चीझ. मॅगी एकतर ऑल टाइम फेवरेट डिश आहे आणि त्यात क्रिमी चीझ मूळे चांगली लागली.

#पॉकेट ऑम्लेट: नवीन नाव दिसलं म्हणून हे मागवलं होतं. ब्रेड च्या स्लाइस मधेच पॉकेट बनवून त्यात ऑम्लेट बनवलं होतं. ऑम्लेट सेपरेट न्हवतं त्यातच बनवलं होतं. ही नवीन आयडिया आणि डिश दोन्ही पण आवडल्या. घरी नक्कीच बनवायचा प्रयत्न करणार.

#साबुदाणा थालीपीठ: थोडी भूक अजून असल्याने हे मागवलं. ह्याची पण चव चांगली होती. माझा उपवास हा नेहमी फक्त साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडे ह्याच्यावर जायचा आता मात्र थालीपीठ पण वर्णी लागणार.

#कोल्ड कॉफी : शेजारच्या टेबलावर ही आलेली बघून रिधीने याचा हट्ट धरला. तिच्यासाठी मागवली मग. आवडीचे ड्रिंक असल्यानं तिने एकटीनेच फस्त केलं.
हा एक गोष्ट आहे, ऑर्डर दिली की तुम्हाला वाट बघावी लागेल कारण ऑर्डर आल्यावर गरमागरम डिश बनवली जाते. वाट बघितल्याचे समाधान डिश खाल्ल्यावरच कळेल.

इथं बैठक व्यवस्था 7/8 टेबल्स ची आहे पण एकदम कोझी आहे. शेजारी असलेल्या मोठ्या झाडांच्या सवलीमुळे एक आल्हाददायक गारवा वाटत होता.

खाऊन झाल्यावर कॅफे च्या ओनर आनंदिता मॅडम ना अभिप्राय देताना त्यांच्याशी गप्पा झाल्या. रुमानियत चा मेनू हा त्यांनी स्वतः डिझाईन केला आहे, लहानापासून वयस्कर ग्राहकांना आवडेल असा मेनू ठेवला आहे. स्वतः एक खवय्या असल्याने दुसऱ्यांना देखील चांगले आणि चवीचे खायला घालण्यासाठी एक वर्षांपूर्वी हा घाट घातला आहे. जवळपास सगळे पदार्थ त्या स्वतः बनवतात. सगळे पदार्थ अगदी घरी जसे बनवले जातात तसेच इथे देखील बनवले जातात. तुम्हाला इथे अगदी रात्री 7/8 वजता देखील ताजे पोहे मिळतील कारण ते ऑर्डर आल्यावरच बनवले जातात.

मला तर हे ठिकाण फार आवडलं, मी तर पुन्हा नक्कीच भेट देणार.

खादाड भावा : मदनकुमार जाधव


पत्ता:
Cafe Roomaniyat
GR4F+33F, Warje Malwadi Rd, Sheela Vihar Colony, Pune, Maharashtra 411038

maps.app.goo.gl/1wMj3fjNe9Fzz6GX9

#khadad_bhava #madankumarreview #caferoomaniyat #roomaniyat #breakfast #positivereview

5 months ago | [YT] | 3

khadad_bhava

साधारण तीन महिन्यांपूर्वी आनंदिता मॅडम चा मेसेज आला होता की त्यांच्या कॅफे "रुमानियत" ला भेट द्या म्हणून. घरगुती कारणांमुळे काय जाणं झालं न्हवतं. काल योग आला.

11 च्या आसपास पोचलो असेन. मेनू चाळला तर त्यात महाराष्ट्रीयन नाष्ट्याचे चे पदार्थ तसेच सँडविच, बर्गर, मॅगी, पास्ता, अंड्याच्या डिशेस दिसून आल्या. वेगवेगळा मेनू ट्राय करायचा ठरवून ऑर्डर दिली.
आम्ही खालील पदार्थ खाल्ले.

#भाजनीचे थालीपीठ: आम्ही इथे खाल्लेल्या पदार्थामधील सगळ्यात बेस्ट. बेस्ट म्हणजे एक नंबर विषय. गरमागरम थालीपीठ दह्या सोबत असलं भारी लागलं ना की मन तृप्त. घरी देखील आम्ही थालीपीठ बनवतो पण इथली चव मात्र युनिक वाटली.

#बॉम्बे मसाला सँडविच: हा रिधीने निवडला होता. यातील 1 पीस मी देखील खाल्ला. ह्यात ब्रेड मध्ये स्टफ केलेला मसाला भारी होता, नुसता बटाटा न जाणवता त्यात मसाल्यांची पण चव येत होती.

#व्हाइट सॉस मॅगी: ही देखील रिधीची फर्माईश, ह्यात क्रिमी व्हाईट सॉस आणि वरून खिसलेले चीझ. मॅगी एकतर ऑल टाइम फेवरेट डिश आहे आणि त्यात क्रिमी चीझ मूळे चांगली लागली.

#पॉकेट ऑम्लेट: नवीन नाव दिसलं म्हणून हे मागवलं होतं. ब्रेड च्या स्लाइस मधेच पॉकेट बनवून त्यात ऑम्लेट बनवलं होतं. ऑम्लेट सेपरेट न्हवतं त्यातच बनवलं होतं. ही नवीन आयडिया आणि डिश दोन्ही पण आवडल्या. घरी नक्कीच बनवायचा प्रयत्न करणार.

#साबुदाणा थालीपीठ: थोडी भूक अजून असल्याने हे मागवलं. ह्याची पण चव चांगली होती. माझा उपवास हा नेहमी फक्त साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडे ह्याच्यावर जायचा आता मात्र थालीपीठ पण वर्णी लागणार.

#कोल्ड कॉफी : शेजारच्या टेबलावर ही आलेली बघून रिधीने याचा हट्ट धरला. तिच्यासाठी मागवली मग. आवडीचे ड्रिंक असल्यानं तिने एकटीनेच फस्त केलं.

आमंत्रण आहे म्हणून सगळं चांगले, भारी म्हणतोय असे बिलकुल ही नाही चव खरंच छान आहे. हा एक गोष्ट आहे, ऑर्डर दिली की तुम्हाला वाट बघावी लागेल कारण ऑर्डर आल्यावर गरमागरम डिश बनवली जाते. वाट बघितल्याचे समाधान डिश खाल्ल्यावरच कळेल.

इथं बैठक व्यवस्था 7/8 टेबल्स ची आहे पण एकदम कोझी आहे. शेजारी असलेल्या मोठ्या झाडांच्या सवलीमुळे एक आल्हाददायक गारवा वाटत होता.

खाऊन झाल्यावर आनंदिता मॅडम ना अभिप्राय देताना त्यांच्याशी गप्पा झाल्या. रुमानियत चा मेनू हा त्यांनी स्वतः डिझाईन केला आहे, लहानापासून वयस्कर ग्राहकांना आवडेल असा मेनू ठेवला आहे. स्वतः एक खवय्या असल्याने दुसऱ्यांना देखील चांगले आणि चवीचे खायला घालण्यासाठी एक वर्षांपूर्वी हा घाट घातला आहे. जवळपास सगळे पदार्थ त्या स्वतः बनवतात. सगळे पदार्थ अगदी घरी जसे बनवले जातात तसेच इथे देखील बनवले जातात. तुम्हाला इथे अगदी रात्री 7/8 वजता देखील ताजे पोहे मिळतील कारण ते ऑर्डर आल्यावरच बनवले जातात.

मला तर हे ठिकाण फार आवडलं, मी तर पुन्हा नक्कीच भेट देणार.

खादाड भावा : मदनकुमार जाधव


पत्ता:
Cafe Roomaniyat
GR4F+33F, Warje Malwadi Rd, Sheela Vihar Colony, Pune, Maharashtra 411038

maps.app.goo.gl/1wMj3fjNe9Fzz6GX9

#khadad_bhava #madankumarreview #caferoomaniyat #roomaniyat #breakfast #positivereview

5 months ago | [YT] | 3

khadad_bhava

जवळपास 3 वर्षांनंतर KSB चौक चिंचवड इकडं जाण्याचा योग आला. काम अवरल्यानन्तर उदभरण करण्यासाठी मित्र एके ठिकाणी चंपारण् हंडी खायला देतो म्हणून ल शाहूनगर मध्ये घेऊन गेला पण हाय रे दुर्दैव ते ठिकाण बंद होतं. आता काय करावं यात जास्त वेळ न दवडता थरमॅक्स चौकाकडे गाडी वळवली. जात जाता जयेश मच्छी खानावळ चा बोर्ड दिसल्यावर तिथे थांबलो. संध्याकाळी चिकन चा दुसऱ्या मित्रांसोबत बेत होणार होता, त्यामुळे आत्ता मासे खावं म्हणून इथं आलो.

पूर्वीच्या जागेवरून नव्या प्रशस्त जागेत स्थलांतर झालेले दिसले. विकडे असून आणि दुपार चे 2 वाजले असताना देखील 25-30 पैकी 70-80% टेबल्स भरलेलं दिसली.

मेनू कार्ड चाळून वेळ न दवडता स्पेशल चिलापी थाळ्या (₹300/थाळी) सांगितल्या.

थाळीला 2 आळणी पीसेस, 2 तिखट रस्सा पिसेस आणि 2 पिसेस कडक फ्राय. 1 वाटी आळणी रस्सा (मर्यादित) ,तिखट रस्सा (अमर्याद), चपाती, भाकरी, इंद्रायणी चिकट भात.

ऑर्डर दिल्यानंतर 8/9 मिनिटानंतर थाळ्या आल्या. आळणी रस्सा मस्त होता. तांबडा रस्सा देखील भारी. त्याला तर एक भली मोठी वाटी दिली होतं. तांबड्या रस्याची एक छोटी बादलीच आणून दिली. 3 फुल्ल भरून वाट्या रस्सा पिला.

तिन्ही पद्धतीचे पिसेस भारीच होते. आकार देखील मोठा होता. ह्या तिन्ही मध्ये सगळ्यात भारी होता तो म्हणजे कडक फ्राय. एकदम योग्य प्रमाणात फ्राय केलेला होता. मासा नुसता खोबरं लागत होता. एवढा आवडला होता त्यामुळे एक जास्तीची प्लेट (150) कडक फ्राय ची घेतली, ज्यात 4 पिसेस येतात. अगदी तुडुंब जेवण केलं. मित्र पहिल्यांदाच इथे आला होता त्याला देखील फार आवडलं. मी PCMC ला राहत असताना 2/3 महिन्यातून एखादी चक्कर आसायचीच, त्यामुळे बऱ्याच दिवसांनी इथं खाऊन समाधान वाटलं.

नवीन ठिकाण प्रशस्थ आहे पण फॅमिली साठी वेगळा सेपरेट सेक्शन दिसला नाही. तो असायला पाहिजे होता. नेहमी मालक असायचे आता त्यांचा मुलगा काऊंटर वर दिसला, त्याना फीडबॅक दिला.

पुन्हा आलो तर जाणं होईलच.


खादाड भावा: मदनकुमार जाधव

पत्ता: Jayesh Special Macchi Khanaval.
MQ5W+X6W, Sambhajinagar, Chinchwad, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411019

maps.app.goo.gl/fRV3CpSQgy2coM4Z8

#khadad_bhava #madankumarreview #jayeshmacchikhanaval #pcmc #bhigwan #fish

5 months ago | [YT] | 4

khadad_bhava

पाऊस चहा आणि मी

5 months ago | [YT] | 6

khadad_bhava

Foodie maddy

5 months ago | [YT] | 5