Shakti News Marathi

"शक्ती जनसामान्यांसाठी, शक्ती जनसामान्यांची, शक्ती न्यूज मराठी" #Shakti_News_Marathi

पत्रकार प्रतिक मोरे यांनी मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम या विषयात पदवी प्राप्त केली आहे. तसेच कायद्याचे अभ्यासक आहेत. २०१४ पासून ग्रामीण पत्रकारितेत सक्रिय आहेत. त्
यांनी newsmarathi.in हे पोर्टल सुरू करून २०१६ मध्ये News Marathi नावाने स्वतःचा यूट्यूब चॅनल सुरू केला. २४ तास महाराष्ट्र फास्ट या चॅनलवर उपसंपादक, आणि Vista News Marathi या चॅनलवर संस्थापक सदस्य व कार्यकारी संपादक म्हणून काम (जानेवारी २०२५ पर्यंत)
रायगड जिल्ह्यातील विविध प्रिंट मीडियाला स्वतंत्र पत्रकार म्हणून बातम्या पुरवल्या आणि आजही विविध माध्यमांतील पत्रकारांसोबत काम करत आहेत.
स्थानिक जिल्ह्यांमधील सुरू असलेल्या घडामोडींवर वक्तव्य आणि वस्तुनिष्ठ मांडणी करण्याचा प्रयत्न असतो.

प्रमुख मीडियामध्ये मुद्दे दुर्लक्षित राहतात. त्यामुळेच Shakti News Marathi हे व्यासपीठ पुन्हा २०२५ च्या जानेवारी महिन्यात सक्रिय केलं – जेणेकरून सामान्य माणसाचा आवाज समाजात पोहोचेल.

प्रारंभ: २०१६ (News Marathi)
पुनःसक्रिय: जानेवारी २०२५ (Shakti News Marathi)