Daily City News (DCN)

पुणे : सध्या देशात जी-२० परिषदेची धामधूम सुरू आहे. या परिषदेसाठी पुण्यात १६ आणि १७ जानेवारीला होणाऱ्या परिषदेस २०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. परिषदेतील सदस्य पुण्यातील जे डब्लु मेरियट हॉटेल सेनापती बापट रोड पुणे येथे रहाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व इतर स्थळाना भेटी देणार आहेत. या ठिकाणांच्या दोन किलोमीटरच्या परिसरात ड्रोन कॅमेरे वापरण्यास पुणे शहर पोलिसानी सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली आहे. विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

2 years ago | [YT] | 0