Trishool RDS by Kedar
चिरंजीव बलिदान(छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीला, २७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ही कविता सुचली होती)सह्याद्रीचा निधडा छावामर्द रांगडा हा संभाजी |राजा ऐसा भासे की जणुअवतरला हो प्रतिशिवाजी ||ह्या छाव्याला धरण्यासाठीफास लाविला गनिमाने |संगमेश्वरी धरिला अवचितशंभूराजा मुकर्रबाने ||हलकट सैतानांच्या हृदयीमावेना हो उत्साह |शिवपुत्राचा मुघलांनी कैसाकेला हो तख्ताकुलाह ||कालपावेतो मस्तकी होतीछत्रचामरे ढळली ज्यांच्या |आज चढविला साज विदूषकीशत्रूने हो देही त्यांच्या ||उंटावरती बांधून त्यांचीनिघाली जेव्हा होती धिंड |तरी अंतरी ज्वालाग्राहीरुद्र जणु राजांचा पिंड ||बहादुरगडी बसला होताभेकड फौजेचा आलमगीर |त्याचे समक्ष आणला बांधूनखरा बहादुर हिंदु वीर ||सात लक्ष फौजेचा अधिपतीछाव्याला हो निरखून पाही |प्रतिकुलतेतही आमुच्या राजांचीमान मराठी झुकली नाही ||आभार मानिले अल्लाचेपातशहाने गुडघे टेकून |कलश म्हणे हे राजन् तुजलाऔरंग देतो ताजिम वाकून ||मुघलांतील फितुरांची नावेजल्द अज् जल्द तू हमें बता |कुल खजिना अन् सगळे गडकोटआम्हा देऊन टाक आता ||असे म्हणोनी लालुच दावतीसोड बगावत धरी चाकरी |ठामपणे नृप नकार देईसार्वभौम तो असे करारी ||सह्याद्रीच्या डरकाळीनेमोडून पडला मुघली दंभ |एकेक नख उपटून जाहलासुरु छळाला प्रारंभ ||जान तुझी बक्षतो परंतुधर्म तुझा तू दे टाकून |संतापाने संभाजीच्याजणु ज्वाळा येती नेत्रांतून ||नराधमांनी डोळ्यांत खुपसल्यालोहाच्या त्या तप्त सळया |तीव्र वेदना असूनहीमुखी जगदंबेचा जप लीलया ||औरंग्यावर राजांनी इरसालशिव्यांची सरबत्ती केली |चिमटा लावुनी मुघलांनी मगजबान खेचून काढिली ||पुनःपुनः हो नमाज पढण्यारायांवरती दबाव आणिला |तेजस्वी तो वीर परंतुअधमांपुढती नाही बधला ||खाल खींचलो काफीर कीबादशहाने आज्ञा केली |सालणीने मग सावकाश तीकातडी सोलून काढिली ||जास्वंदासम फुलला देहहिंदुत्वाचा अंगार जणू |तिखटमिठाच्या तडक्यानेतर पेटून उठला अणुरेणू ||टप्प्याटप्प्याने तुकडा तुकडाहातपाय हो छाटीत गेले |हाल असे राजांचे पाहूनयमदूतही शरमिंदे झाले ||बहु छळिले मुघलांनी त्याराजियांसवे छंदोगामात्या ||वढु गावी हो तुकडे करुनीअखेर केली निर्घृण हत्या ||हिंदुत्वाची वज्रमूठ अन्सह्याद्री ही त्याची ढाल |आमुच्या राजाचे केले ऐसेचंद्रकोरीने हाल हलाल ||विकृत भीषण दृश्य पाहुनीप्रजाही थिजली मुकी बिचारी |अंत्यविधी रयतेने केलेकष्टी मनाने तुळापुरी ||राजबिंड संभाजीराजाउणापुरा हो वर्षे बत्तीस |मूकपणे लोकांनी देखिलेऔरंग्याचे रूप हिडीस ||छत्रपतींच्या हौतात्म्यानेअसंतोष तो धुमसत गेला |हृदयामधुनी सह्याद्रीच्याज्वालामुखी उद्रेक जाहला ||इथेच मेला औरंग्या पापीकुढत कुढत खंगून खंगून |नक्ष उतरविला मुघलांचाबाजीने हिंदुस्थानातून ||ऐसी भयंकर कथा कशालाबारकाईने आठवायाची |चिरंजीव त्या बलिदानातूनआम्हा प्रेरणा घ्यायाची ||- केदार केसकर ©️दिनांक २७ फेब्रुवारी २०२३
7 months ago | [YT] | 6
Trishool RDS by Kedar
चिरंजीव बलिदान
(छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीला, २७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी ही कविता सुचली होती)
सह्याद्रीचा निधडा छावा
मर्द रांगडा हा संभाजी |
राजा ऐसा भासे की जणु
अवतरला हो प्रतिशिवाजी ||
ह्या छाव्याला धरण्यासाठी
फास लाविला गनिमाने |
संगमेश्वरी धरिला अवचित
शंभूराजा मुकर्रबाने ||
हलकट सैतानांच्या हृदयी
मावेना हो उत्साह |
शिवपुत्राचा मुघलांनी कैसा
केला हो तख्ताकुलाह ||
कालपावेतो मस्तकी होती
छत्रचामरे ढळली ज्यांच्या |
आज चढविला साज विदूषकी
शत्रूने हो देही त्यांच्या ||
उंटावरती बांधून त्यांची
निघाली जेव्हा होती धिंड |
तरी अंतरी ज्वालाग्राही
रुद्र जणु राजांचा पिंड ||
बहादुरगडी बसला होता
भेकड फौजेचा आलमगीर |
त्याचे समक्ष आणला बांधून
खरा बहादुर हिंदु वीर ||
सात लक्ष फौजेचा अधिपती
छाव्याला हो निरखून पाही |
प्रतिकुलतेतही आमुच्या राजांची
मान मराठी झुकली नाही ||
आभार मानिले अल्लाचे
पातशहाने गुडघे टेकून |
कलश म्हणे हे राजन् तुजला
औरंग देतो ताजिम वाकून ||
मुघलांतील फितुरांची नावे
जल्द अज् जल्द तू हमें बता |
कुल खजिना अन् सगळे गडकोट
आम्हा देऊन टाक आता ||
असे म्हणोनी लालुच दावती
सोड बगावत धरी चाकरी |
ठामपणे नृप नकार देई
सार्वभौम तो असे करारी ||
सह्याद्रीच्या डरकाळीने
मोडून पडला मुघली दंभ |
एकेक नख उपटून जाहला
सुरु छळाला प्रारंभ ||
जान तुझी बक्षतो परंतु
धर्म तुझा तू दे टाकून |
संतापाने संभाजीच्या
जणु ज्वाळा येती नेत्रांतून ||
नराधमांनी डोळ्यांत खुपसल्या
लोहाच्या त्या तप्त सळया |
तीव्र वेदना असूनही
मुखी जगदंबेचा जप लीलया ||
औरंग्यावर राजांनी इरसाल
शिव्यांची सरबत्ती केली |
चिमटा लावुनी मुघलांनी मग
जबान खेचून काढिली ||
पुनःपुनः हो नमाज पढण्या
रायांवरती दबाव आणिला |
तेजस्वी तो वीर परंतु
अधमांपुढती नाही बधला ||
खाल खींचलो काफीर की
बादशहाने आज्ञा केली |
सालणीने मग सावकाश ती
कातडी सोलून काढिली ||
जास्वंदासम फुलला देह
हिंदुत्वाचा अंगार जणू |
तिखटमिठाच्या तडक्याने
तर पेटून उठला अणुरेणू ||
टप्प्याटप्प्याने तुकडा तुकडा
हातपाय हो छाटीत गेले |
हाल असे राजांचे पाहून
यमदूतही शरमिंदे झाले ||
बहु छळिले मुघलांनी त्या
राजियांसवे छंदोगामात्या ||
वढु गावी हो तुकडे करुनी
अखेर केली निर्घृण हत्या ||
हिंदुत्वाची वज्रमूठ अन्
सह्याद्री ही त्याची ढाल |
आमुच्या राजाचे केले ऐसे
चंद्रकोरीने हाल हलाल ||
विकृत भीषण दृश्य पाहुनी
प्रजाही थिजली मुकी बिचारी |
अंत्यविधी रयतेने केले
कष्टी मनाने तुळापुरी ||
राजबिंड संभाजीराजा
उणापुरा हो वर्षे बत्तीस |
मूकपणे लोकांनी देखिले
औरंग्याचे रूप हिडीस ||
छत्रपतींच्या हौतात्म्याने
असंतोष तो धुमसत गेला |
हृदयामधुनी सह्याद्रीच्या
ज्वालामुखी उद्रेक जाहला ||
इथेच मेला औरंग्या पापी
कुढत कुढत खंगून खंगून |
नक्ष उतरविला मुघलांचा
बाजीने हिंदुस्थानातून ||
ऐसी भयंकर कथा कशाला
बारकाईने आठवायाची |
चिरंजीव त्या बलिदानातून
आम्हा प्रेरणा घ्यायाची ||
- केदार केसकर ©️
दिनांक २७ फेब्रुवारी २०२३
7 months ago | [YT] | 6