Ayurvedshastra

पिंपल साठी डायट आणि लाइफस्टाइल

मुले वयात यायला लागल्यानंतर साधारणपणे मुखदूषिका पिंपल्स किशोरवयीन मुलांना यायला लागतात. आपल्या दिसण्यावर फरक पडत असल्यामुळे अशावेळी मुलांना मुरमांची फारच चिंता लागून राहिलेली असते. वेगवेगळी मलम फेस वॉश अशा प्रकारची औषध मेडिकल स्टोअर मधून घेतली जातात. वयात येताना पिंपल्स येणे ही एक स्वाभाविक क्रिया आहे. परंतु काही मुलांना त्याचा अधिक त्रास होतो मोठे मोठे पिंपल्स येत राहतात, त्यात पू होत राहतो, तसेच डागही राहायला लागतात. अशावेळी योग्य आहार विहार, आयुर्वेदिक औषध, पंचकर्म, चेहऱ्याला लावण्यासाठी वेगवेगळे लेप यांचा वापर चांगल्या पद्धतीने होतो. पिंपल्स जास्त येत असतील तर आहार विहार कसा असावा यासंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी खाली नमूद करत आहोत.


झोप वेळेवर घेणे. लवकर झोपणे लवकर उठणे. सात ते आठ तास रोज झोप घेणे. 


पिंपल्स त्रास शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे होतो. या आजारामध्ये पित्त वाढलेले असते आणि शरीरात रक्तदृष्टी झालेली असते. यासाठी हिरव्या पालेभाज्या आणि फळ यांचे सेवन अधिकाधिक करावे . 


जेवण पचेल एवढंच सेवन करावं. अधिक पण जेवणे आणि कमी सुद्धा जेवणे. जेवण वेळेवर जेवावे. 


मुरमांमध्ये शरीरात उष्णता वाढणार नाही असा आहार ठेवावा. तिखट मसालेदार पदार्थ बाहेरचे पदार्थ जंक फूड फास्ट फूड खाणे सर्वतोपरी टाळावे . खारट पदार्थ जसे की वेफर्स बिस्किट बेकरी प्रॉडक्ट्स अधिक खाणे टाळावे. टोमॅटो दही, चिंच अशा प्रकारचे आंबट पदार्थ अधिक असलेले पदार्थ कमी खावे. 


सकाळी उठल्यानंतर चपाती भाजी, भाकरी आणि भाजी, शिरा उपमा अशा प्रकारचा नाश्ता करावा. सोबत एक चमचा गाईचे तूप ठेवावे. एखादा फळ सुद्धा सकाळची नाश्ता बरोबर घेऊ शकता. 


दुपारी वेळेवर जेवण करावे . चपाती भाजी वरण-भात या स्वरूपामध्ये आहात असावा. मांसाहार अंडी आठवड्यातून एकदाच घ्यावे. जेवताना एक ते दोन ग्लास पाणी प्यावे. कोशिंबीर जेवताना खाऊ शकता. 


दुपारी झोपू नये. संध्याकाळी एखादे फळ खावे . रात्रीचे भोजन संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत करावे. रात्री सुद्धा भोजनामध्ये वरण-भात भाजी चपाती अशा प्रकारचा आहार ठेवावा. दोन दिवस आड करून रात्री झोपताना गाईचे दूध पिले तर चालेल. 


मुरूम पिंपल यासाठी आयुर्वेदामध्ये उत्तम चिकित्सा उपलब्ध आहे. शरीरात वाढलेली उष्णता शरीरात वाढलेलं पित्त गर्मी तसेच बऱ्याच वेळा शरीरात कफ पण वाढलेला असतो त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असणे हार्मोनल इम्बॅलन्स होणे ही सुद्धा कारणे पिंपल्स देण्यामध्ये कारणीभूत ठरतात. अशावेळी योग्य आहार विहार आणि आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्यास पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होते आणि चेहऱ्याची कांती सुधारते.


डॉक्टर रावराणे 

आयुर्वेदाचार्य मुंबई जवळ मिरा रोड

अपॉइंटमेंट साठी संपर्क 9820301922

6 months ago | [YT] | 9