SHREE SWAMI SAMARTH

श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश :माझ्या मार्गावर पाऊल ठेऊन तर बघ,
तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग.
माझ्यासाठी खर्च करून तर बघ,
कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग.
माझ्यासाठी कटु वचने ऐकून तर बघ,
तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग.
माझ्या जवळ येऊन तर बघ,
तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग.
माझी गोष्ट लोकांना सांगून बघ तर,
तुला मोटावान बनविले नाही तर सांग.
माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ,
ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले नाही तर सांग.
मला तुझा बनवून तर बघ,
तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग.
माझ्यासाठी दुःख काढून तर बघ,
तुला कीर्तीवान नाही बनविले तर सांग.
माझ्या मार्गावर चालून तर बघ,
तुला शांतिप्राप्त नाही बनविले तर सांग.
तू स्वतःला समर्थांकडे नाही दिले तर बघ,
तुला हीरा नाही बनविले नाही तर सांग.
माझे कीर्तन करून तर बघ,
जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग.
तू माझा बनून तर बघ,
प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर सांग.
सगळे रस्ते बंद होतील,
तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव,
जिथे संपते मर्यादा तुझी,
तिथूनच मी साथ देत असतो तुझी…!!!
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे॥

1 month ago | [YT] | 3