Vishal Chothe Vlogs

Hello Everyone, I m Vishal Chothe. I m Multivlogger .I Make Food,Travel,Destination, Explore, etc.Funny Vlogs.
Keep Watching n Enjoying it.
Thank You❤️


Vishal Chothe Vlogs

आमंत्रण तर दिलंच पाहिजे,
आपल्या हॉटेल तुळजाईला ३१डिसेंबरपर्यंत ४ थाळींवर १ थाळी फ्री ची ऑफर चालू आहे.त्यामुळं सगळीजण ३१ डिसेंबर साजरा कराय आपल्या हॉटेल तुळजाईला नक्की या

2 days ago | [YT] | 59

Vishal Chothe Vlogs

हॉटेल तुळजाई कराड रोड विटा, इथे 31 डिसेंबरपर्यंत ४ थाळींवर १ थाळी फ्री आहे..लवकर जेवाय या

2 days ago | [YT] | 62

Vishal Chothe Vlogs

आईबरं किचनमधे असलं कि मजाच मजा

3 days ago | [YT] | 48

Vishal Chothe Vlogs

मित्रांची सोबत,गप्पा,मनमोकळेपणा आणि त्या बरोबर हॉटेल तुळजाईचं चविष्ठ जेवण,अजुन काय‌ पाहिजे आयुष्यात...

मग तुम्हीपण या आपल्या हॉटेल तुळजाईला चवीचं जेवण तुमच्या आवडत्या माणसांबरोबर.
आणि हो ३१ डिसेंबरपर्यंत ऑफरपण चालू आहे.
कोणत्यापण ४ थाळींवर १ थाळी फ्री...

कधी येताय‌ मग.....?

6 days ago | [YT] | 40

Vishal Chothe Vlogs

हॉटेल तुळजाईला आता तुम्हाला नविन खर्डा चिकन थाळी मिळणार आहे.
त्यात तुम्हाला खर्डा चिकन,अंडा मसाला,फिश फ्राय,तांबडा रस्सा,आळणी रस्सा,राईस इ. मिळेल.
चविनं परिपूर्ण असलेल्या आपल्या हॉटेल तुळजाईला शाकाहार आणि मांसाहार कराय एकदा नक्की भेट द्या....🙏

हॉटेल तुळजाई कराड रोड विटा 9028566467

1 week ago | [YT] | 74

Vishal Chothe Vlogs

आता १५ डिसेंबरपर्यंतच आहे हि थाळी,तीपण फक्त २००₹ मधे.
तुम्हीं खाल्लीयका नाही तेवढं सांगा.
नसेल तर लगेच आपल्या विट्यात कराड रोडला फेमस असलेल्या हॉटेल तुळजाईला जेवायला या....

4 weeks ago | [YT] | 47

Vishal Chothe Vlogs

हे असं आरामात चवीचं स्पेशल स्पेशल खायाला लागतं म्हणजे सुख,समाधान,समृद्धी ताटासारखी गोल गोल आपल्या बाजूनं नांदती.
आणि त्यासाठीच विट्यात फक्त हॉटेल तुळजाईला तुम्हीं या....

हॉटेल तुळजाई कराड रोड विटा....

1 month ago | [YT] | 44

Vishal Chothe Vlogs

घरापुढं हि चिंगळी टमाटी लय येतात,पण कोण खायाचं धाडस करत नव्हतं.एकदा मीच ती टमाटी तोडली आणि भाजी कराय‌ लावली. तेंव्हापासून सगळीजण टमाटी जरा लाल होयची वाट बघत्यात.....
तुमच्याकडं दारात,बाजूला, पलिकडं आहेतका हि टमाटी.

याला चेरी टोमॅटो म्हणतात...रोजच्या टोमॅटोपेक्षा हि महाग असतात....
सांगाबरं किती रेट आहे मार्केटला या चिंगळ्या टमाट्यांचा...

आम्हांला विकत आणायची गरजच पडत नाय.कारण वर्षभर मनाने दारात पुढं येत्यात....

1 month ago | [YT] | 27

Vishal Chothe Vlogs

त्या दिवसाची शेवटची मीठी मारून झाली आणि काळजी घ्या म्हणून सगळ्यांनी आवंडा गिळून निरोप घेतला...तो विरह बघून माझ्यापण डोळ्यात पाणी आलं.


मी दुपारी साडेतीन वाजता हॉटेलवरनं घरी माझ्या गाडीवरनं आलो.आत आलेलं कळल्यावर किचनमधे बसलेल्या आईनं मला लगेच हाक मारली.पण त्या हाकेत मला तीची कायतर अपेक्षा लपलेली जाणवली.

मी लगेच तीच्याजवळ गेलो आणि "काय गं...?" म्हणून विचारलं. तर चेहर्यावर तिच्या वेगळाच‌ भाव दिसला, म्हणून परत एकदा बोलकी काय झालं...? म्हणून विचारलं.तर ती "आरं काय नाय माझ्या मैत्रीणीचा फोन आलता आणि तीनं पुण्याला बोलवलय..." असं बोलली.मी लगेच बावचळून कशाला बोलवलय विचारलं तर ती " सगळ्यांनी पुण्यात सारस बागेत भेटून ती काय म्हणत्यात बघ गेट टूगेदरका काय तसलं करायचाय" बोलली.

मीपण लगेच जा कि मग म्हणून मोकळा झालो आणि बेहरकत दाखवली.तर ती म्हणली "मी कुठं जावू एकटी तूपण चल गाडीतनं,सकाळी जावून संध्याकाळी लगेच येवू" म्हणली.पण मी सरळ सांगितलं कि मला हॉटेलमुळं नाय‌ जमणार तुम्हीं जावून या.

माझ्या या उत्तरावर आई लय नाराज झाली पण ४० वर्षानंतर सगळ्या मैत्रीणींना भेटायची तळमळ तीच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती.

मी माझं आवरलं आणि परत‌ हॉटेलवर गेलो.

दुसर्यादिवशी तिला विडीयो कॉल आला,सगळ्या मैत्रीणी जॉईन झाल्या.मी हॉटेलवरनं आलो तर आई जोराजोरात फोनवर बोलत होती,म्हणून आत किचनमधे जावून "अगं काय‌ झालय" म्हणून विचारलं तर ती एवढी खूष आणि गुंगून गेलती त्या विडियो कॉलवर कि तीनं मला मोबाईल पुढं घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं कि "ह्याला सांगा मला घेवून यायला,सगळं ह्याच्यावर आहे आता". मला लगेच सगळीजण " अरे बाळा काय‌ चाललय...? ये कि रे तूपन" असं समजवाय लागली.त्यांना पण मी हॉटेलच कारण देवून माघार घेतली..

आणि आईची शेवटची आशा संपवली.

आईच्या डोळ्यात तीनं सगळ्यांना भेटल्यावर किती आणि काय काय करायचं ठरवलेलं सरळ सरळ दिसत होतं पण त्याच डोळ्यात जावू शकणार नाही हि खंतपण दिसाय‌ लागली.ती सगळ बघून मलाच डोळं भरून आलं मला ती अवस्था बघू वाटणा.मी विचार कराय लागलो कि आयुष्यात असा गेट टूगेदरचा क्षण सगळ्यांना मिळत तरी असल का...? ह्या विचारांनी माझं मन बदललं आणि मी तीला पुण्याला घेवून जायचं पण तीला रात्री सांगून सरप्राइज देयचं असं ठरवलं.

आईला दिवसभर मैत्रीणींचं फोन,मेसेज येत होतं कि "उजा ये कि तूपण,परत भेट होईल का नाय सांगता येत नाय".

मी रात्री घरी आलो तेंव्हा आईनं शेवटचं मला तयार कराय बोलाय लागली आणि मी लगेच उद्या सकाळी ६ ला निघू आणि दुपारी ३ वाजता माघारी फिरू म्हणलं.ते ऐकल्यावर आईच्या डोळ्यात आनंदाश्रू मावणात.तीला काय‌करू नी काय‌ नको झालं.तीनं 'ती येणार आहे' हे सांगाय फोन काढला पण मी " नको करू कॉल उद्या तूच सरप्राइज दे सगळ्यांना " असं म्हणलं.

सकाळी लवकर उठून आम्ही आवरलं आणि सव्वा सहाला विट्यातनं नेवरी मार्गे निघलो. पावणे तीन तासात सुसाट बिना ट्राफिकच आम्ही कात्रजमधे मामाकडं गेलो.पहिला मामा मामीला सरप्राइज दिलं.तीथच नाष्टा केला आणि आई पप्पाला सारस बागेत सोडलं.

बागेत गेल्यावर कोणालाच कोण ओळखणा.४० वर्षानंतर सगळी अचानक समोर आलती त्यामुळं तेंव्हाची ती सगळी तोच चेहरा घेवून आपली मित्र-मैत्रीणी हुडकत होती.

हळूहळू सगळेजण एकमेकासमोर आली आणि बघून जोरजोरात हसाय लागली.

त्यावेळी सडपातळ असणारी सगळीच आता भोपळ्यासारखी दिसत होती.काय काय जण तर हसत हसत रडाय लागली.इतक्या वर्षातनं सगळ्यांना बघाय मिळतय हेच कोणाल पटत नव्हतं.काय‌ बोलाव आणि किती ऐकाव याचा मेळ लागणा.प्रत्येकजण आपापल्या त्या दिवसाच्या आठवणी ताज्या कराय लागली. त्यांचा तो कालवा बघून बागेत प्रत्येकजण त्यांच्याकडं बघत होता.पण आज त्यांना दुसर्यांकडं बघायची गरज नव्हती.जेवढं बोलता,बघता आणि बरोबर राहता येईल तेवढं रहायच होतं.

तास दोन-तीन तास कस गेलं कळलच नाहीत.शेजारीच एका हॉटेलवर जावून सगळ्यांनी जेवणं केली.जेवता जेवता आठवणी ताज्या केल्या आणि कोणा कोणाला काय काय आजार आहेत याची देवाणघेवाण झाली.आज आईच्या तीला धरून सगळ्या मैत्रीणींना शूगर, बीपी इ.आजार आहेत.

आजच्या त्यांच्या भेटीनं मला वाटतय त्यांचं आयुष्य सार्थकी लागलं.त्यांचा आनंद इतका मोठा होता कि त्या पुढं मी सुद्धा गहिवरून आलो आणि बरं झालं म्हणलं आईला मी तीच्या आयुष्यात भेटाय न मिळण्याची खंत जाणवू दिली नाही...

जेवणं झाली आणि जायची वेळपण झाली.आक्खा दिवस कसा गेला कोणालाच कळलं नाही. पण आता आयुष्यात असं परत सगळी कधी भेटाय मिळलं याची शाश्वती कोणालाच नव्हती.

भेटीचा आनंद भोगला पण शेवटी विरह समोर दाटून आला.सगळ्यांच्या डोळ्यात पाणी भरलं.त्या दिवसाची शेवटची मीठी मारून झाली आणि काळजी घ्या म्हणून सगळ्यांनी आवंडा गिळून निरोप घेतला...

तो विरह बघून माझ्यापण डोळ्यात पाणी आलं.मी आईकडं बघितलं तर आनंदाश्रू आणि विरहाच पाणी निम्मं जिरलेलं दिसलं.

गाडीत बसलो तेंव्हा मोठा श्वास घेवून मी तीला "खूष ना...?" म्हणून विचारलं.तर तिनं लाजून फक्त " हम्म" केलं आणि आम्ही विट्याला परतीला लागलो....


तुम्हीं भेटलायका तुमच्या मित्रमैत्रीणींना....? किती वर्षांनी भेटला....? कसं वाटलं भेटून....? सांगा कि....?

1 month ago | [YT] | 42

Vishal Chothe Vlogs

झणझणीत घरच्या चटणीत बनवलेली चवीची मटण प्लेट,आळणी रस्सा,खतरनाक चवीचा फेमस तांबडा रस्सा,बॉईल अंडं,चिकन ६५,रोटी/भाकरी/चपाती,राईस इ.
Unlimited👉( roti,rice,rassa )

अशी हि मटणथाळी खायला आवडेलका तुम्हाला तीपन फक्त ३०० रूपयांना...

आवडेलना....?

या मग विट्यात कराड रोडला फेमस असलेल्या "हॉटेल तुळजाईला"
लवकर या असं चवीचं मटण आणि जेवणाचा चान्स घालवू नका....🙏

1 month ago | [YT] | 69