Hello Everyone, I m Vishal Chothe. I m Multivlogger .I Make Food,Travel,Destination, Explore, etc.Funny Vlogs. Keep Watching n Enjoying it. Thank You❤️
त्या दिवशी अचानक ठरलं आणि आम्ही न सांगता पारे गावातल्या तलाव्यात गेलो....
भैय्या ४ दिवस विट्याच्या अष्टमीला मजा कराय आलता.दोन दिवस सगळी जत्रा फिरून वैतागल्यावर तिसऱ्या दिवशी वहिणी तिच्या माहेरी गेली. चौथ्या दिवशी मी आणि भैय्या तिला सासरी माघारी आणाय गेलो.पण माघारी आम्ही घरी जाऊ शकलोच नाही. गाडी आमच्या विट्याच्या चौकात आल्यावर सगळी एक आवाजानं "चला कुठतर फिरून येवूया" म्हणली. आता कमी काळात फिरून येण्यासारखं विट्याजवळ फक्त १२किमवर असलेलं पारे गावच आहे जिथं गार पाण्याचं शांत ठिकाण आहे. म्हणून गाडी तशीच पारे रोडला फिरवली.रस्त्याच काम चालू असल्यामुळं गाढी पाक पिठात भरल्यागत मातीनं भरली.पण काय हरकत नव्हती कारण आम्हांला हिंडायचं तर होतच.त्या नादात अनुश्री नाईट ड्रेसवर होती तेपण आम्हाला लक्षात राहिलं नाही. असो शेवटी पारेगावात तलाव्याजवळ गेलो आणि गार गच्च सावली पडलेल्या झाडाखाली गाडी लावली. गेल्या गेल्या चिलाबाई देवीचं दर्शन घेतलं आणि निवांत माघं तलाव्यात गेलो. तिथचं निवांत बसून फोटो-विडीयो काढलं.मी आणि अनुश्रीनं तर पाण्यात बुचकळ्यापण मारल्या.........
अशा तऱ्हेनं आमचं अचानक ठरलेलं नियोजन पार पडलं....
तुमचं होतंका असं अचानक नियोजन.....? कधी गेलायका असं अचानक न सांगता कुठं.....?
पाटीभरून मठ्ठा केलाय आईनं.... असल्या कडक उन्हात सारखीच लाईट जात्या म्हणून मी वरच्या बेडरूममधनं जिन्यात गोल पळत खाली डायरेक्ट किचनमधे शिरलो. बघतो तर काय....! आईचं आपलं चाललेलं कसलीतरी पावडर,कुथमीर,मिरची मिसळायच..म्हणून मी म्हणलं "कायकरत्यास". तर म्हणली " मठ्ठा करत्या दिसत नाय वी". मला दिसत होतंकि,पण मठ्ठा तर तवलीत करत्यातणा असा पाटीत करताना पहिल्यांदाच बघितला होता म्हणून मेंदुची तारांबळ उडली.... तवलीत असुदे नायतर पातेल्यात, मठ्ठा मात्र चवीला एकदम झ्याक झालता... त्यामुळं जेवायच्या आधी २ ग्लास आणि जेवताना २ ग्लास गच्चं पेला.... जरा वेळानं मला काय होयला लागलंय तेच कळना.म्हणून वर बेडरूममधे जावून नुस्तं पडलो...तर आता संध्याकाळच्या साडेसहा वाजल्यात आणि पप्पा आईला मी कुठं गेलोय म्हणून विचराय लागल्यात...🤣🤣🤣🤣
आता कसं करायचं लयमस्त झोप झाली माझी ..पण रात्रभर जागाय लागणार मला 😁😁😁😁😁
तुम्ही झोपलायका असं गच्च मठ्ठा पिउन निवांत.......?
स्पेशल मटण थाळी ज्यात तुम्हाला आळणी मटण,फ्राय मटण,फिशफ्राय,आळणी रस्सा,झणझणीत तांबडा रस्सा,अंडा मसाला इ. मिळतय. हि थाळी तुम्हाला विट्यात फक्त कराड रोडला फेमस असलेल्या हॉटेल तुळजाईला मिळेल.त्यामुळे लगेच आपल्या हॉटेल तुळजाईला जेवायला या.....🙏 #muttonthali#hoteltuljai#vita
हि थाळी विट्यात कराड रोडला फेमस असलेल्या हॉटेल तुळजाईला मिळते. याची चव म्हणचाल तर भागात टॉप. आणि विशेष म्हणजे थाळीत २ चिकन प्लेट + चिकन ६५ + unlimited ( आळणी/तांबडा रस्सा,रोटी,राईस. ) मिळतो. अशी थाळी तीपण फक्त २०० रूपयमधे तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. त्यामुळें तुम्हीं लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या...🙏🙏
Vishal Chothe Vlogs
त्या दिवशी अचानक ठरलं आणि आम्ही न सांगता पारे गावातल्या तलाव्यात गेलो....
भैय्या ४ दिवस विट्याच्या अष्टमीला मजा कराय आलता.दोन दिवस सगळी जत्रा फिरून वैतागल्यावर तिसऱ्या दिवशी वहिणी तिच्या माहेरी गेली.
चौथ्या दिवशी मी आणि भैय्या तिला सासरी माघारी आणाय गेलो.पण माघारी आम्ही घरी जाऊ शकलोच नाही. गाडी आमच्या विट्याच्या चौकात आल्यावर सगळी एक आवाजानं "चला कुठतर फिरून येवूया" म्हणली.
आता कमी काळात फिरून येण्यासारखं विट्याजवळ फक्त १२किमवर असलेलं पारे गावच आहे जिथं गार पाण्याचं शांत ठिकाण आहे. म्हणून गाडी तशीच पारे रोडला फिरवली.रस्त्याच काम चालू असल्यामुळं गाढी पाक पिठात भरल्यागत मातीनं भरली.पण काय हरकत नव्हती कारण आम्हांला हिंडायचं तर होतच.त्या नादात अनुश्री नाईट ड्रेसवर होती तेपण आम्हाला लक्षात राहिलं नाही.
असो शेवटी पारेगावात तलाव्याजवळ गेलो आणि गार गच्च सावली पडलेल्या झाडाखाली गाडी लावली.
गेल्या गेल्या चिलाबाई देवीचं दर्शन घेतलं आणि निवांत माघं तलाव्यात गेलो.
तिथचं निवांत बसून फोटो-विडीयो काढलं.मी आणि अनुश्रीनं तर पाण्यात बुचकळ्यापण मारल्या.........
अशा तऱ्हेनं आमचं अचानक ठरलेलं नियोजन पार पडलं....
तुमचं होतंका असं अचानक नियोजन.....? कधी गेलायका असं अचानक न सांगता कुठं.....?
1 day ago | [YT] | 17
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
It's Pizza time with Dominos Vita
#pizza #dominospizza #cheespizza🍕 #vishalchothevlogs #vita
3 days ago | [YT] | 14
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
मघाशी दारातला एक शेवग्याचा ढापा वढला आणि एवढ्या शेंगा लाईनमधी आल्या.आता त्यातल्या १०-१२ शेंगा आईनं फोटो काढायच्या आधीच काकूला दिल्या....
आणि आता हायत त्यात अजून वाटणी होणार आहे...
मग तुम्हाला आवडत्यातका शेवग्याच्या शेंगा....?
1 week ago | [YT] | 36
View 1 reply
Vishal Chothe Vlogs
पाटीभरून मठ्ठा केलाय आईनं....
असल्या कडक उन्हात सारखीच लाईट जात्या म्हणून मी वरच्या बेडरूममधनं जिन्यात गोल पळत खाली डायरेक्ट किचनमधे शिरलो.
बघतो तर काय....! आईचं आपलं चाललेलं कसलीतरी पावडर,कुथमीर,मिरची मिसळायच..म्हणून मी म्हणलं "कायकरत्यास". तर म्हणली " मठ्ठा करत्या दिसत नाय वी".
मला दिसत होतंकि,पण मठ्ठा तर तवलीत करत्यातणा असा पाटीत करताना पहिल्यांदाच बघितला होता म्हणून मेंदुची तारांबळ उडली....
तवलीत असुदे नायतर पातेल्यात, मठ्ठा मात्र चवीला एकदम झ्याक झालता...
त्यामुळं जेवायच्या आधी २ ग्लास आणि जेवताना २ ग्लास गच्चं पेला....
जरा वेळानं मला काय होयला लागलंय तेच कळना.म्हणून वर बेडरूममधे जावून नुस्तं पडलो...तर आता संध्याकाळच्या साडेसहा वाजल्यात आणि पप्पा आईला मी कुठं गेलोय म्हणून विचराय लागल्यात...🤣🤣🤣🤣
आता कसं करायचं लयमस्त झोप झाली माझी ..पण रात्रभर जागाय लागणार मला 😁😁😁😁😁
तुम्ही झोपलायका असं गच्च मठ्ठा पिउन निवांत.......?
2 weeks ago | [YT] | 31
View 1 reply
Vishal Chothe Vlogs
वेताळगुरू दर्शन...
1 month ago | [YT] | 38
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
तुम्हीं माझं विडियो/व्लॉग मिस करतायका......?
#selfie #vishalchothevlogs #question #nightshoot
1 month ago | [YT] | 21
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
रंगपंचमीच्या शुभेच्छा
1 month ago | [YT] | 20
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
आज काय धुलवड केली नाय लगा.पोर्णिमा संपलीकी ग्रहण आडवं आलं,आणि ग्रहण संपलंकी हॉटेलवर जायची वेळ आली 😥😥😥😥
बिनमटणाच्या धुलवडीच्या हार्दिक 😷😷शुभेच्छा
1 month ago | [YT] | 41
View 1 reply
Vishal Chothe Vlogs
स्पेशल मटण थाळी ज्यात तुम्हाला आळणी मटण,फ्राय मटण,फिशफ्राय,आळणी रस्सा,झणझणीत तांबडा रस्सा,अंडा मसाला इ. मिळतय.
हि थाळी तुम्हाला विट्यात फक्त कराड रोडला फेमस असलेल्या हॉटेल तुळजाईला मिळेल.त्यामुळे लगेच आपल्या हॉटेल तुळजाईला जेवायला या.....🙏
#muttonthali #hoteltuljai #vita
1 month ago | [YT] | 97
View 0 replies
Vishal Chothe Vlogs
हि थाळी विट्यात कराड रोडला फेमस असलेल्या हॉटेल तुळजाईला मिळते.
याची चव म्हणचाल तर भागात टॉप.
आणि विशेष म्हणजे थाळीत २ चिकन प्लेट + चिकन ६५ + unlimited ( आळणी/तांबडा रस्सा,रोटी,राईस. ) मिळतो.
अशी थाळी तीपण फक्त २०० रूपयमधे तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही.
त्यामुळें तुम्हीं लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या...🙏🙏
हॉटेल तुळजाई कराड रोड विटा 9028566467
1 month ago | [YT] | 63
View 0 replies
Load more