इतिहासापासून ते भविष्यापर्यंत व्हाया वर्तमानतील सर्व राजकीय,सामाजिक ,चालू घडामोडी, कायद्यातील गोष्टी , आणि विविध विषयावर माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न . त्यासाठी मुलाखती, डॉक्युमेंट्री, ग्राउंड स्टोरीज आणि अशा अनेक अस्सल गोष्टी भन्नाट पद्धतीने आम्ही यु ट्यूबच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोहोचवतोय.
आमची शाखा कुठेही नाही, तरी आमच्या सोबत संपर्क करायचा असल्यास खालील माध्यमांच्या माध्यमातून करू शकता.
Talk Today
Child marriage part-1: बालविवाह विरूध्द तक्रार कशी आणि कुठे करावी ? बालविवाह आणि लैंगिक शोषण आणि कायदे .
बालविवाहाचे प्रमाण परभणी जिल्ह्यात ४८ टक्के असून, हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. बालविवाह बेकायदेशीर असला तरी अनेक पालक आपल्या मुला-मुलींचे बालविवाह करू पाहात आहेत. या संदर्भातल्या कारवाईचे वृत्त आपण अनेकदा वर्तमानपत्रांमधून वाचतच असतो. पण कारवाई होत असूनही बालविवाह मात्र थांबलेले नाहीत, ही शोकांतिका आहे. अशा विवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य, खेळण्याचं वय हिरावून घेतलं जातं. बालविवाहाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, बेहरामजी मलबारी, लाला गिरधारीलाल यांनी बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत जागे केले. त्यानंतर कायद्यांमध्ये सुधारणा होत होत बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६च्या कलम ९ व १०नुसार बालविवाह लावणाऱ्याला दोन वर्षांपर्यंत कठोर कैद व १ लाख रुपये दंड सुनिश्चित केला गेला आहे.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणी (२००९)च्या अहवालानुसार देशात ४७.४% मुलींचे विवाह १८ वर्षे वयापेक्षा कमी वयात होतात. या अहवालातून आणखी एक गोष्ट लक्षात आली आहे की, गेल्या १० वर्षांपासून बिहार बालविवाहाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. इथल्या ६९% मुलींचे विवाह १८ वर्षे वयापेक्षा कमी वयात झालेले आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान (६५%), नंतर झारखंड (६३%), उत्तर प्रदेश (६०%) आणि मध्य प्रदेश (५९%) अशी आकडेवारी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी मुलींची लग्न १८ वर्षं पूर्ण होण्यापूर्वीच होतात. कमी वयात लावलेल्या विवाहामुळे त्यांना जबाबदाऱ्या झेपवत नाहीत.
लहान वयात लादलेल्या गरोदरपणामुळे व प्रसूतीमुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते. तसेच गर्भपात, कमी वजनाचे अर्भक, अकाली प्रसूती, अर्भकमृत्यू व उपजत मृत्यूची शक्यता वाढते. मातामृत्यूचे प्रमाण वाढते. अपरिपक्व वयातल्या विवाहात वधू-वरांची निवड माय-बाप करतात. मुला-मुलींच्या पसंती-नापसंतीचा विचार केला जात नाही. त्यामुळे रूप, बुद्धिमत्ता, पात्रता, वय इत्यादीतील विषमतेमुळे हे विवाह विजोड ठरतात. अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता आणि परंपरा या कारणांनी बालविवाह घडून येतात. ग्रामीण भागात विवाह असला की तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व शिक्षकांना निमंत्रण दिले जाते. या लोकांनी होणार असलेल्या विवाहाबाबत अर्थात मुला-मुलींच्या वयाबाबत माहिती घेऊन कमी वयात होणारे विवाह थांबवायला हवेत.
या संदर्भात child line परभणी जिल्हा समन्वयक श्री. संदीप बेंडसुरे यांच्याशी चर्चा aaplya @talktodaymarathi या यूट्यूब channel वर.
https://youtu.be/QIvfYqPRN-E?si=zq_9-...
1 year ago (edited) | [YT] | 8
View 0 replies
Talk Today
आपण आतापर्यंत जो काही प्रतिसाद दिलात त्याबद्दल मंडळ आभारी आहे..
खूप खूप धन्यवाद...🙏
आणि आपल्या नविन channel ला subscribe करून टाका तेवढं .
youtube.com/@talktodaymarathishorts
1 year ago | [YT] | 11
View 0 replies
Talk Today
सावनेर-कळमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यासोबत महाराष्ट्र सध्याचं राजकारण या विषयावर मुलखात आपल्या @talktoday या वर.
https://youtu.be/3pe0XnrKndQ
#aashishdeshmuk #सावनेर #talktodaymarathi #politics #politicalpodcast #nagpur #beed #विदर्भ #parbhani #santoshdeshmukh
1 year ago (edited) | [YT] | 9
View 0 replies
Talk Today
झी न्यूज च्या "श्रेष्ठ भारत कोन्क्लेव्ह" या कार्यक्रमांमध्ये भाजपाचे सुधांशू त्रिवेदी आणि काँग्रेसचे सुप्रिया श्रीनेत यांच्या दरम्यान झालेल्या विवादात पत्रकाराने सुधांशू त्रिवेदी यांना प्रश्न विचारला की भाजपा सरकार जातिगत जनगणनेचे आकडे कधी जाहीर करेल? यावर सुधांशू त्रिवेदी उत्तर देताना म्हटले की 'देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं की,आम्ही जाती जनगणनेच्या विरोधात नाहीत योग्य वेळ आणि परिस्थिती पाहून आम्ही लवकरात लवकर जातिगत जनगणनेचे आकडे जाहीर करू. त्याच वेळेस राहुल गांधीचा हवाला देऊन ते म्हणत होते की राहुल गांधी म्हणतात, मी नीतीश कुमारला म्हटलो होतो की जातिगत जनगणना करावी लागेल. मात्र मी सांगू इच्छितो की, बिहार मधील जातिगत जनगणनेच सर्वेक्षण जून 2022 मध्ये भाजपा आणि जे डी यु च्या सरकारने संमत केला होता. मात्र ऑगस्ट मध्ये सरकार पडली आणि जेव्हा 7 ऑगस्टला जेडीयू आणि नितीश कुमारच्या आर.जे.डी ची आघाडी सरकार बनली तेव्हा जातिगत जनगणना लागू करण्यात आली. आणि हीच गोष्ट जे डी यु चे कार्यकारी अध्यक्ष संजय झा आणि लल्लन सिंग यांनी सुद्धा म्हटलं होतं.
1 year ago | [YT] | 13
View 0 replies