Common man's voice

SP News Marathi

सामाजिक जाणीव असलेला
*प्रामाणिक कार्यकर्ता
आपला माणूस-नागोराव भांगे पाटील

आयुष्याची वाटचाल करताना अनेक माणसं भेटतात. त्यात काही क्षणापुरती तर काही निरंतर मनात घर करून राहतात. त्यातीलच एक म्हणजे आमचे बंधुतुल्य मित्र म्हणजे नागोराव भांगे पाटील हे आहेत. आपल्या सोज्वळ स्वभावाने सर्वांनाच आपलंस वाटतात. म्हणूनच 'आपला माणूस' त्यांची हि ओळख सर्वांच्या मनात कोरली आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीत गेल्या वीस वर्षांत आपुलकीच नातं निर्माण झालं. पत्रकारिता, सामाजिक व राजकीय कार्यक्षेत्रात वावरत असताना कधीही कुणाबद्दल कटूता न ठेवणारा हा माणूस प्रत्येकाबद्दल आपलेपणाची भावना ठेवून कार्यरत राहतो. तसा वयाने माझ्या पेक्षा खूप लहान पण जेष्ठापेक्षाही परिपक्वपणा पाहायला मिळतो. लहानापासून-मोठ्यापर्यंत सर्वांचा मानपान जपताना मी जवळून पाहिले आहे. १० नोव्हेंबर १९८३ साली पार्डी म. (ता.अर्धापूर, जि. नांदेड) या गावी वारकरी-शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या ४२ वर्षीय आमच्या मित्राने पत्रकारिता, सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्व-कृतत्वावर एक सकारात्मक व वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीधारक असून अनवधानाने नाही तर ठरवून ते पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आल्याचे सांगतात. त्यांच्यासह सर्व मित्र परिवार जिल्ह्याच्या राज्याच्या पत्रकारितेत सक्रीयपणे कार्यरत आहेत.

दै. लोकमत, लोकमत डिजीटल, ईटीव्ही भारत, डेली हंट ग्रुप, दिव्य मराठी, प्रजावाणी या अग्रगण्य मिडिया ग्रुपमध्ये काम करत असताना पत्रकारितेत सकारात्मक बाबींनाच प्रतिसाद दिला. सर्वसामान्य नागरीक व शेतकऱ्याला पुढे ठेवून पत्रकारिता 'पेशा' चे वृत्त जपले. पत्रकारिता करत असताना अनेकवेळा वेगवेगळी आमिषे दाखविण्याचाही प्रकार होतो. पण त्यांनी स्वतःच्या प्रामाणिकतेचा तोल कधीच ढासळू दिला नाही. त्यांची सर्वसामान्य माणसाबद्दलची बांधिलकी आजही कायम आहे.

केवळ उपदेशाचे डोस देऊन चालणार नाही हे जाणून स्वतःही गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. स्व.अण्णासाहेब जावळे पाटील प्रणित अखिल भारतीय छावा या लढाऊ संघटनेपासून त्यांनी २००३ ला कार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्यातला संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता कधी मरू दिला नाही. मराठा आरक्षण चळवळीतील प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रीयपणे सहभाग असायचा. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ झालेल्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी पुढाकार घेतला. पण सर्व काही करून श्रेयाच्या भानगडीत मात्र पडला नाही. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या बाबतीत ही सातत्याने प्रश्न लावून धरले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या एफआरपी न्यायालयीन लढ्यातील प्रमुख टीम मध्ये ते होते. या लढाईमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हजारो कोटींचा फायदा झाला. तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमीशन कमी करणे, इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला. तसेच चुकीच्या ठिकाणी बसवलेले हवामान मापक केंद्र योग्य ठिकाणी बसविण्यासाठी पुढाकार घेतला. पीक नुकसान भरपाई, पीक विमा मिळावा यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर त्यांचा पाठपुराव्याची लढाई सुरूच असते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी राबविण्यात आलेल्या पुण्यजागर प्रकल्पातही गेल्या आठ वर्षांपासून काम करतात. यासह अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग तर असतोच दररोज दवाखाना, तहसिल, पंचायत समिती, पोलीस स्टेशन येथे सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी झटताना मी जवळून पाहिले आहे. त्यांच्या या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य शासनाच्या जिल्हा युवा पुरस्कारासह विविध नामांकीत सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे.

खरं सांगायचं तर आजच्या राजकारणाच्या परिस्थितीत न सूट होणारे भांगे पाटील हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. पण केवळ सामाजिक करायची असतील तर राजकीय सिस्टीम मध्ये आपला सहभाग आवश्यक आहे. हे जाणून मित्रांच्या आग्रहाने ते राजकारणात सक्रीय झाले. मागच्या जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपासाठी या मतदारसंघात अडचणीची परिस्थिती असतानाही येळेगाव गटातून त्यांच्या पत्नीने निवडणूक लढविली. गेल्या आठ वर्षपासून भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश करून इथेही आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखवली. मोठा मित्र परिवार भाजपाशी जोडला. त्यांनी यापूर्वी बूथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व तालुका सरचिटणीस अशी पार्टीची पदे भूषवली आहेत. सध्या ते भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पार्टीची वाटचाल वेगाने सुरू असतानाच पुढच्या टप्प्यात अनेक मातब्बर नेते भाजपात आले. राज्याचे सक्षम नेतृत्व आदरनीय माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण साहेब यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर अख्खा नांदेड जिल्हाच भाजपामय झाला. त्यांच्याच नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व मित्रपरिवार भाजपात कार्यरत आहोत. मागच्या वेळी भांगे पाटील यांचा पत्नीच्या रूपाने जिल्हा परिषदेत होणारा प्रवेश थांबला. ते यावेळी लहान जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून इच्छूक आहेत. यावेळी तरी एका प्रामाणिक व अभ्यासू कार्यकर्त्यांला जिल्हा परिषद गाजवण्याची संधी मिळो हीच यानिमित्ताने वाढदिवसाच्या निमित्तान सदिच्छा...!
आपला माणूस
नागोराव भांगे पाटील
यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा..!

रामराव भालेराव (पत्रकार)
माजी जि.प.सदस्य.नांदेड

2 months ago | [YT] | 0

SP News Marathi

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
सामाजिक जाणीव असलेला
प्रामाणिक कार्यकर्ता
आपला माणूस-नागोराव भांगे पाटील

आयुष्याची वाटचाल करताना अनेक माणसं भेटतात. त्यात काही क्षणापुरती तर काही निरंतर मनात घर करून राहतात. त्यातीलच एक म्हणजे आमचे बंधुतुल्य मित्र म्हणजे नागोराव भांगे पाटील हे आहेत. आपल्या सोज्वळ स्वभावाने सर्वांनाच आपलंस वाटतात. म्हणूनच 'आपला माणूस' त्यांची हि ओळख सर्वांच्या मनात कोरली आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीत गेल्या वीस वर्षांत आपुलकीच नातं निर्माण झालं. पत्रकारिता, सामाजिक व राजकीय कार्यक्षेत्रात वावरत असताना कधीही कुणाबद्दल कटूता न ठेवणारा हा माणूस प्रत्येकाबद्दल आपलेपणाची भावना ठेवून कार्यरत राहतो. तसा वयाने माझ्या पेक्षा खूप लहान पण जेष्ठापेक्षाही परिपक्वपणा पाहायला मिळतो. लहानापासून-मोठ्यापर्यंत सर्वांचा मानपान जपताना मी जवळून पाहिले आहे. १० नोव्हेंबर १९८३ साली पार्डी म. (ता.अर्धापूर, जि. नांदेड) या गावी वारकरी-शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या ४२ वर्षीय आमच्या मित्राने पत्रकारिता, सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्व-कृतत्वावर एक सकारात्मक व वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीधारक असून अनवधानाने नाही तर ठरवून ते पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आल्याचे सांगतात. त्यांच्यासह सर्व मित्र परिवार जिल्ह्याच्या राज्याच्या पत्रकारितेत सक्रीयपणे कार्यरत आहेत.

दै. लोकमत, लोकमत डिजीटल, ईटीव्ही भारत, डेली हंट ग्रुप, दिव्य मराठी, प्रजावाणी या अग्रगण्य मिडिया ग्रुपमध्ये काम करत असताना पत्रकारितेत सकारात्मक बाबींनाच प्रतिसाद दिला. सर्वसामान्य नागरीक व शेतकऱ्याला पुढे ठेवून पत्रकारिता 'पेशा' चे वृत्त जपले. पत्रकारिता करत असताना अनेकवेळा वेगवेगळी आमिषे दाखविण्याचाही प्रकार होतो. पण त्यांनी स्वतःच्या प्रामाणिकतेचा तोल कधीच ढासळू दिला नाही. त्यांची सर्वसामान्य माणसाबद्दलची बांधिलकी आजही कायम आहे.

केवळ उपदेशाचे डोस देऊन चालणार नाही हे जाणून स्वतःही गेल्या वीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. स्व.अण्णासाहेब जावळे पाटील प्रणित अखिल भारतीय छावा या लढाऊ संघटनेपासून त्यांनी २००३ ला कार्याला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्यातला संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता कधी मरू दिला नाही. मराठा आरक्षण चळवळीतील प्रत्येक आंदोलनात त्यांचा सक्रीयपणे सहभाग असायचा. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ झालेल्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी पुढाकार घेतला. पण सर्व काही करून श्रेयाच्या भानगडीत मात्र पडला नाही. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या बाबतीत ही सातत्याने प्रश्न लावून धरले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या एफआरपी न्यायालयीन लढ्यातील प्रमुख टीम मध्ये ते होते. या लढाईमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हजारो कोटींचा फायदा झाला. तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कमीशन कमी करणे, इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला. तसेच चुकीच्या ठिकाणी बसवलेले हवामान मापक केंद्र योग्य ठिकाणी बसविण्यासाठी पुढाकार घेतला. पीक नुकसान भरपाई, पीक विमा मिळावा यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर त्यांचा पाठपुराव्याची लढाई सुरूच असते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी राबविण्यात आलेल्या पुण्यजागर प्रकल्पातही गेल्या आठ वर्षांपासून काम करतात. यासह अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग तर असतोच दररोज दवाखाना, तहसिल, पंचायत समिती, पोलीस स्टेशन येथे सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी झटताना मी जवळून पाहिले आहे.

खरं सांगायचं तर आजच्या राजकारणाच्या परिस्थितीत न सूट होणारे भांगे पाटील हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. पण केवळ सामाजिक करायची असतील तर राजकीय सिस्टीम मध्ये आपला सहभाग आवश्यक आहे. हे जाणून मित्रांच्या आग्रहाने ते राजकारणात सक्रीय झाले. मागच्या जिल्हा परिषद निवडणूकीत भाजपासाठी या मतदारसंघात अडचणीची परिस्थिती असतानाही येळेगाव गटातून त्यांच्या पत्नीने निवडणूक लढविली. गेल्या आठ वर्षपासून भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश करून इथेही आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखवली. मोठा मित्र परिवार भाजपाशी जोडला. त्यांनी यापूर्वी बूथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व तालुका सरचिटणीस अशी पार्टीची पदे भूषवली आहेत. सध्या ते भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पार्टीची वाटचाल वेगाने सुरू असतानाच पुढच्या टप्प्यात अनेक मातब्बर नेते भाजपात आले. राज्याचे सक्षम नेतृत्व आदरनीय माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण साहेब यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर अख्खा नांदेड जिल्हाच भाजपामय झाला. त्यांच्याच नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व मित्रपरिवार भाजपात कार्यरत आहोत. मागच्या वेळी भांगे पाटील यांचा पत्नीच्या रूपाने जिल्हा परिषदेत होणारा प्रवेश थांबला. ते यावेळी लहान जिल्हा परिषद गटातून भाजपाकडून इच्छूक आहेत. यावेळी तरी एका प्रामाणिक व अभ्यासू कार्यकर्त्यांला जिल्हा परिषद गाजवण्याची संधी मिळो हीच यानिमित्ताने वाढदिवसाच्या निमित्तान सदिच्छा...!
आपला माणूस
नागोराव भांगे पाटील
यांना वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा..!
💐💐💐💐💐💐💐

रामराव भालेराव (पत्रकार)
माजी जि.प.सदस्य.नांदेड
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

2 months ago | [YT] | 0

SP News Marathi

सोयाबीनमध्ये पाणीच पाणी...!

3 months ago | [YT] | 1