महाराष्ट्रातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातले निपक्ष वार्तांकन करणारे एकमेव आधुनिक केसरी माध्यम समूह.


Adhunik Kesari

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीतून आता चक्रीवादळ तयार झालं असून, त्याला 'मोंथा' या नावानं ओळखलं जाईल.

महाराष्ट्रावर या वादळाचा कसा परिणाम होईल? हेही आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

तर मोंथा हे थायलंडनं सुचवलेलं नाव असून, त्याचा अर्थ होतो 'सुंदर आणि सुवासिक फुल'.

पुढच्या 24 तासांत मोंथा चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, 27 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

28 ऑक्टोबरला भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेशात काकीनाडाजवळ मछलीपट्टणम-आणि कलिंगपट्टणमदरम्यान हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे, पण त्याचा परिणाम महाराष्ट्रात विदर्भाच्या काही भागांतही जाणवू शकतो.

किनाऱ्यावर धडकल्यानतंर हे चक्रीवादळ विदर्भालगत छत्तीसगडच्या दिशेनं वर सरकू शकतं. विशेषतः विदर्भाच्या पूर्वेकडील भागांत यामुळे वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात 28 ऑक्टोबरसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मोंथा चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकताना ताशी 90-100 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि काही वेळा वाऱ्याच्या झोतांचा वेग ताशी 110 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.

एखाद्या चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग ताशी 88-117 किमीपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याला सीव्हियर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजे अतीतीव्र चक्रीवादळ म्हटलं जातं.
मोंथा चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग पाहता, पुढचे 5 दिवस बंगालच्या उपसागरात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटींना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

उत्तर हिंद महासागर क्षेत्रात म्हणजे भारतीय उपखंडाच्या आसपासच्या परिसरात साधारणपणे नैऋत्य मान्सून येण्याआधीच्या काळात आणि नैऋत्य मान्सूननं माघार घेतल्यानंतरच्या काही आठवड्यांत चक्रीवादळं तयार होतात.

मोंथा चक्रीवादळ हे यंदाच्या मोसमातलं आणि यंदाच्या वर्षातलं दुसरं चक्रीवादळ आहे. याआधी ऑक्टोबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ तयार झालं होतं.

बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रात आलेल्या कमी दाबाच्या प्रणालीनं 29 सप्टेंबरनंतर पुन्हा अरबी समुद्रात प्रवेश केला होता आणि त्यातूनच शक्ती चक्रीवादळाची निर्मिती झाली होती.

2 months ago | [YT] | 1

Adhunik Kesari

गोरेगाव येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा गंभीर आरोप केला आहे. दिवाळीतच त्यांनी आरोपांचे फटाके फोडले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मोठी गडबड होण्याचे संकेत त्यांनी दिले. मतदार याद्यांमध्ये 96 लाख खोटे मतदार घुसवल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी मनसेने सुरू केली आहे. त्याअनुषंगाने मतदारयादी प्रमुखांचा एक भव्य मेळावा पार पडत आहे. मुंबईतील गोरेगाव(पूर्व) येथील नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी मुंबईतील पदाधिकारी, मतदार यादी प्रमुख, गट प्रमुख आणि उपशाखाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी राज ठाकरे मतदान यादीविषयी काय आरोप करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी एकामागून एक बॉम्ब टाकले.

3 months ago | [YT] | 4

Adhunik Kesari

रशियन तेल खरेदी थांबवण्याच्या धमक्या देत भारताला दबावात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत जुमानत नसल्याचे पुन्हा सिद्ध झालं आहे. भारताची ऑक्टोबरमधील रशियन तेल आयात पुन्हा वाढली असून, इतर देशांच्या तुलनेत रशियातून होणारी तेल खरेदी आजही सर्वाधिक असल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. भारतीय रिफायनऱ्यांनीही सांगितलं की सरकारनं अद्याप रशियन तेल आयात थांबवण्याचे निर्देश दिलेले नाहीत....

3 months ago | [YT] | 3

Adhunik Kesari

महाराष्ट्र :- राज्यातून मान्सून परतला असला तरी, मान्सूनोत्तर पावसाचा जोर कायम आहे. आज, १७ऑक्टोबर रोजी, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे, जळगाव, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.....

3 months ago | [YT] | 4

Adhunik Kesari

पीएम मिलोनी: इजिप्तमध्ये पार पडलेल्या गाझा शांतता शिखर परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करत चापलुसीची हद्द गाठल्याचं दिसून आलं. 

3 months ago | [YT] | 3

Adhunik Kesari

भारतातला सर्वात मोठे धरण कोणते ?

3 months ago | [YT] | 2

Adhunik Kesari

मेहकर विधानसभेत कोण बाजी मारणार..?
पहा सविस्तर विश्लेषण :
https://youtu.be/I7yR3If30Mo

1 year ago | [YT] | 11

Adhunik Kesari

विनेश फोगट सोबत राजकारण झालंय असं तुम्हाला वाटतंय का? #vineshphogat

1 year ago (edited) | [YT] | 30

Adhunik Kesari

रिसोड मालेगाव मतदारसंघात आमदार कोण होईल..?

विडिओ पहा आणि मत नोंदवा 👇 https://youtu.be/927cLFBn3mY

1 year ago | [YT] | 109

Adhunik Kesari

राज ठाकरे यांच्या किती जागा निवडून येतील..?
#rajthackeray #mns

1 year ago | [YT] | 7