(सोनेरी पान ) Soneri_Paan24 या युट्युब चॅनलवर सर्वांचे स्वागत!!!
या चॅनलवर तुम्हाला ऐकायला मिळतील विविध प्रकारच्या कथा जसे, कौटुंबिक कथा, बोधकथा, प्रेमकथा,विनोदी कथा, रहस्य कथा , बालकथा तसेच अलक ( अति लघुकथा ), अध्यात्मिक कथा, मंत्रोच्चार
त्याचप्रमाणे धार्मिक ग्रंथांचे वाचन ही तुम्ही ऐकू शकाल.
मनोरंजन, ज्ञान, अध्यात्म सर्व काही "सोनेरी पान"या एकाच चॅनलवर.
सोनेरी पान चॅनलच्या प्रत्येक पानावर निखळ मनोरंजन आणि आनंद मिळवा.
आजच चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद!!!😊🙏
Soneri__Paan24
मराठी हृदयस्पर्शी कथा माझा अभिमान
https://youtu.be/vrQsZQi1xSg?si=L6Zs4...
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
Soneri__Paan24
एक हृदयस्पर्शी कथा आईच्या आणि मुलीच्या नात्याची
आईची शिकवण: www.youtube.com/playlist?list...
11 months ago | [YT] | 0
View 0 replies
Soneri__Paan24
मधुमालती - हृदयस्पर्शी कथा
ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
youtube.com/playlist?list=PLz...
11 months ago | [YT] | 0
View 0 replies
Soneri__Paan24
अलक -
ती आणि तो दोघंही सॉफ्टवेअर इंजिनिअर .दोघांनाही गलेलठ्ठ पगार त्याचबरोबर दोघांच्या घरची परिस्थितीही अतिउत्तम.दोघांचे लग्न जमले तसे दोन्हीकडे ही आनंदाला उधाण आले. डेस्टिनेशन वेडिंग ठरले, प्रिवेडिंग फोटोशूट झाले.संगीताच्या कार्यक्रमात तर नवरा - नवरी बेभान होऊन नाचले.दोघांचेही आई - वडील हा सोहळा पाहून भरून पावले पण हा त्यांचा आनंद सहा महिन्यातच संपला.दोघेही लग्नानंतर ऍडजस्ट करायला तयार नव्हते; शेवटी दोघांनीही डिव्होर्स पेपर वर सह्या करुन एकमेकांपासून वेगळे झाले.
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Soneri__Paan24
"अजिबात अक्ला नाहीत या आजकालच्या मुलांना आणि माणुसकी तर त्याहूनही नाही. आईवडिलांनीच काही शिकवले नाही यांना,तर काय."
विलास रावांच्या कपाळावर भल्या मोठ्या आठ्या पडल्या होत्या.तन तन करतच ते घरात आले.जानकीताईंनी ओळखले की नक्की बाहेर मुलं खेळत होते तिथे काही तरी घडले असणार. त्यांनी पटकन त्यांची सून सरिताला चहा करायला सांगितला आणि पाण्याचा ग्लास घेऊन त्या बाहेर हॉल मध्ये आल्या.विलासराव सोफ्यावर बसले होते पण त्यांची बडबड काही थांबली नव्हती. त्यांच्या समोर पाण्याचा ग्लास धरत त्या म्हणाल्या ,
"आज काय झाले?"
"काय झाले काय विचारते.... डोकं फोडलं असतं आज माझं त्या कार्ट्यांनी. कितीदा सांगितलं त्यांना इथे खेळू नका तरी ऐकत नाही. मोठे माणसं काही सांगताय ते काही नाही त्यांच्याच नादात.
https://youtu.be/Xlnnuu_RiRQ?si=qkuEF...
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Soneri__Paan24
अलक
मंडप सजला होता,पाहुण्या रावळ्यांनी गजबजून गेला होता. लाडक्या मुलीचे लग्न जमल्यावर वरमाई झालेले आई हिरवी साडी नेसून इकडून तिकडून मटकत होती. वरबाप झाल्याने वडिलांच्या फेट्यातील तुरा आनंदाने आणि ताट मानेने डौलत होता. मुहूर्ताची वेळ झाली; मामा भाचीला आणायला गेला पण पडलेल्या चेहऱ्याने परत आला. फेट्यातील तुराच नाही तर वडिलांची मान ही आज शरमेनं खाली गेली होती. अवघ्या पाच ते दहा मिनिटात भरलेला मंडप मुली बरोबरच आई-वडिलांना नावं ठेवत रिकामा झाला.😔🥺
1 year ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Soneri__Paan24
एरवी हवाहवासा वाटणारा सूर्यास्त आज तिला नकोसा वाटत होता. का कोण जाणे पण आज अवनी चे मन खूप अधीर झाले होते. घरातल्या कामांमध्ये लक्ष लागत नव्हते. ती सतत दरवाजा ते किचनकडे येर झाऱ्या घालत होती. मावळणाऱ्या सूर्याला पाहून मनामध्ये उदासी दाटून येत होती.
'काय झालं मला? का असे होते आहे? का कोण जाणे पण आज करमतच नाहीये. काय करू आईला फोन लावू की समीरलाच विचारू फोन करून किती वेळ लागणार आहे ते.'
अवनी मनाशीच बोलत होती.
विचार करता करता तिने मोबाईल हातात घेतला आणि परत फोन न लावता टेबलवर ठेवून दिला
'नको आत्ता नको फोन लावायला, समीर गाडीवर असेल ना, उगाच गाडी चालवताना उचलेल फोन'.
हा विचार मनात आला आणि तिने फोन ठेवला.
परत ती किचन कडे वळली,चहा ठेवण्यासाठी गॅस चालू
केला तेवढ्यात दारावरची बेल वाजली. समीर असेल
पूर्ण कथा ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
https://youtu.be/32W01OLw6Ns?si=N3AxV...
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Soneri__Paan24
सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!😊
#रक्षाबंधनशुभेच्छा#Happyrakhi
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Soneri__Paan24
Happy friendship day!!!
#friendshipday#friends
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Soneri__Paan24
गुरुपर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!
गुरू - शिष्याची कथा शिष्याने दिली गुरूला अनमोल भेट !!!
https://youtu.be/q9LN2JhIGKM?si=6b9Z6...
1 year ago (edited) | [YT] | 1
View 0 replies
Load more