कोकणातील बंद घरे पुन्हा माणसांनी भरावी, येथील जमिन कायम हिरवीगार रहावी , मुलांना किंवा नविन पिढीला गावची ओढ लागावी हा प्रामाणिक उद्देश आहे. 🙏
कोकणातील निसर्ग, खाद्यसंस्कृती त्या शिवाय येथील जीवनशैली तसेच चाकरमानी जीवनशैली, पर्यावरण या वर आधारित ❤️
माझे लग्नापूर्विचे आयुष्य मुंबईत गेले.. माझे माहेर मसुरे ( अतिशय सुंदर गाव) … सासर असरोंडी तेही सुंदर उंच डोंगरावर वसलेले … लग्नानंतर पूर्णपणे कोकणवासी झाले … ❤️ सासर आणि माहेर दोन्ही मालवण तालुक्यातील गावे आहेत.
कोकणच्या कुशीत 🌴 सौ.विद्या संजय सावंत (असरोंडी)
चुलीवरचे वडे ❤️👍
1 week ago | [YT] | 5
View 0 replies
कोकणच्या कुशीत 🌴 सौ.विद्या संजय सावंत (असरोंडी)
खेड्यामधले घर कोलारु
कणकवली तालुक्याला जवळ असलेले पण मालवण तालुक्यातील आमचे असरोंडी गाव. कणकवलीहून निघालो की वाटेत वागदे, सातरल, कासरल ही गावे लागतात. कासरल आणी असरोंडीच्या सीमेवर महाकाय वटवृक्ष वर्षानुवर्षे उभा आहे . या वटवृक्षापाशी उभे राहून सभोवार पाहिले तर पुर्ण कणकवली दृष्टीस पडते . पावसाळ्यात येथून सभोवार पाहिले की आंबोली किंवा महाबळेश्वर सारख्या हिलस्टेशनची आठवण येते.
अशा या निसर्गसौंदर्याने नटलेल्या असरोंडी गावात आमचे वडीलोपार्जीत माडीचे चिरेबंदी घर आहे . १९७७ साली आमचे काका….. जे सरकारी नोकरीत उच्च पदावर कार्यरत होते आणि सेवानिवृत्ती नंतर नवी मुंबई त बेलापूर येथे वास्तव्यात होतेआता ते हयात नाहीत त्यांनी बांधलेले हे घर …. जे आम्ही सर्वजण मोठ्या दिमाखात आज आमचे घर, आमचे घर म्हणून मिरवितो ती सर्व कृपा या आमच्या काकांची… यांनी कुटुंबातील सर्वांना सढळ हस्ते खुप मदत केली… मुंबईत कोणाला घर घ्यायचे असो कोणाचे आजारपण, लग्नकार्य, शिक्षण सर्व गोष्टीत खूपच मदत केली…. त्या वेळी हे घर माणसांनी गजबजलेले होते … गोठ्यात भरपूर गुरे वासरे , घराच्या मागच्या पडवीत कोंबडी झाकायला जागा अपूरी पडे. मोठ्या प्रमाणात शेतीवाडी, बागायती असल्यामुळे घरच्या माणसांसोबत चारपाच गडीमाणसे ही कामाला असत.
माझे मोठे दिर श्री. विजय सावंत ( बाबी सावंत ) यांना जिल्ह्यातील बरीच नामवंत मंडळी ओळखतात त्यामुळे आता हे विजय सावंत किंवा बाबी सावंत यांचे घर किंवा नर्सरी वाले सावंत यांचे घर अशी या घराची ओळख आहे.
कालानुरूप नोकरी व्यवसाय आणी मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला कणकवली सारख्या शहराच्या ठिकाणी वास्तव्य करावे लागले . आता सणावाराला तसेच मे महिन्यात, सुट्टीच्या दिवसांत सर्वांचे येणे होते .
सौ. विद्या संजय सावंत
कणकवली (असरोंडी)
2 months ago (edited) | [YT] | 7
View 2 replies
कोकणच्या कुशीत 🌴 सौ.विद्या संजय सावंत (असरोंडी)
आठ ॲाक्टोबर, माझे पती श्री संजय सावंत यांचा वाढदिवस… या वर्षी चा वाढदिवस हा विशेष होता आणि त्याला कारणही तसेच होते… या दिवशी काही कारणास्तव मला मुंबईला यावे लागले आणि इच्छा असूनही वाढदिवसाच्या दिवशी कणकवलीला थांबता आले नाही…. पण माझ्या नसण्याने फारसा फरक पडला नाही कारण त्यांच्या सोबत मित्र होते… वर्कशॅाप, गावातील मंडळी आणि घरची मंडळी , कामाच्या ठिकाणी अशा सर्वांसोबत वाढदिवस साजरा केला वाढदिवस दर वर्षी येतो पण हा असा वर्कशॅाप मध्ये निळ्या कपड्यात मित्रांसोबत चा वाढदिवस आठवणीत राहणार… श्री. संजय कालीदास सांवत या ३१ ॲाक्टोबरला एस् टी वर्कशॅाप कणकवली येथून सेवानिवृत्त होतायत…. जे काम आपल्याला मनापासून आवडतं ते करताना कितीही त्रास झाला तरी कायम उत्साह… सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्कशॅाप मध्ये कुशल कारागीर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच … त्यात या माणसाला गणले जाते याचा मला सार्थ अभिमान वाटतो… एखादी व्यक्ती सेवानिवृत्त होते म्हणजे त्यांच्या आयुष्यात किती बदल होतात हा विचार आपण कधी करतच नाही. सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत ची जी दिनचर्या ठरलेली असते त्यात लगेचच होणारा बदल, मित्रांची रोजची सोबत, त्यांच्यासोबत मारलेल्या मनमोकळ्या गप्पा, थट्टा मस्करी, त्यांच्या सोबत दुपारचे जेवण आणि बरचं काही… कितीही म्हटलं तरी माणुस जेवढा मित्रांसोबत मनमोकळेपणाने बोलतो, वागतो तेवढा तो दुसरीकडे कुठेही नसतो… व्यस्त राहण्यासाठी बरीच कारणे आहेत… त्यामुळे वेळ कसा जाईल हा मुद्दा नाही तर जाणारा वेळ हा मित्रांसोबत नसेल हे महत्वाचे … असो 🙏
3 months ago | [YT] | 7
View 0 replies
कोकणच्या कुशीत 🌴 सौ.विद्या संजय सावंत (असरोंडी)
अशीही एक वटपौर्णिमा…
येत्या दहा जून ला वटपौर्णिमा येतेय… प्रत्येक पतिव्रता आपल्या पतिच्या दिर्घायुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा म्हणून वडाची पूजा आणि उपवास करतील… हे व्रत गावखेड्यातून करणाऱ्या स्त्रिया एखाद्या वटवृक्षापाशी एकत्र जमून पूजाआर्चा करतील. पण मोठमोठ्या शहरांच्या ठिकाणी वडाची झाडे नसल्यामुळे जवळपासच्या परिसरात एखादे वडाचे झाड असल्यास त्याच्या फांद्या तोडून त्या पूजेसाठी वापरल्या जातात. दुसऱ्या दिवशी त्याचा निर्माल्याच्या नावाखाली अक्षरशः कचरा होतो.
आपल्या कड़े आंबा काजू अननसा च्या बागा तयार करताना मोठमोठी जंगली झाडे तोडली जातात, फ़ार मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जाते. आंबा काजू किंवा इतर व्यावसायिक पिके जरूर घेतली जावीत पण जिथे तुम्ही शंभर झाडे व्यावसायिक पिकांची लावलीत तर त्या सोबत पाच तरी जंगली झाडे लावावीत… निसर्गाचा समतोल राखण्यासाठी हे करणे गरजेचे आहे… डोंगरकपारीत मोठमोठाले वृक्षच राहिले नाहीत तर उद्या पाऊस कसा पडणार? आणि या व्यावसायिक पिकांना पाणी कुठून मिळणार… जमिनीतील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी वड, पिंपळ सारख्या भरपूर प्रमाणात ॲाक्सीजन देणाऱ्या आणि जमिनीत पाण्याचा साठा टिकवून ठेवण्यासाठी अशा वृक्षांची लागवड करणे काळाची गरज आहे.
फक्त पतिच्या दिर्घायुष्याकरीता नव्हे तर संपूर्ण कुटुंब, मित्रपरिवार, नातेवाईक, शेजारी, या सर्वांच्याच दिर्घायुष्यासाठी या वटपौर्णिमेला एक तरी जंगली झाड लावण्याचा संकल्प नक्की करुया… एक वटपौर्णिमा अशीही साजरी करुया..
चिरे काढून रिकाम्या झालेल्या तळात दरवर्षी पावसाळ्यात आम्ही विविध प्रकारच्या झाडांची लागवड करतो.
१४ जून २०२२ रोजी वटपौर्णिमेचे औचित्य साधून लावलेले वडाचे झाड आज एवढे मोठे झाले आहे. आजूबाजूचा परिसर ही हिरवागार झाला आहे . सोबतचा फोटो पाहून याची खात्री पटेल. 🙏
सौ. विद्या संजय सावंत
मु. पो. असरोंडी ( कणकवली)
7 months ago (edited) | [YT] | 3
View 0 replies
कोकणच्या कुशीत 🌴 सौ.विद्या संजय सावंत (असरोंडी)
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
कोकणच्या कुशीत 🌴 सौ.विद्या संजय सावंत (असरोंडी)
गौरी पूजन
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
कोकणच्या कुशीत 🌴 सौ.विद्या संजय सावंत (असरोंडी)
नव्वदी पार केलेले आमचे बाबा…. सेवानिवृतीनंतर जवळपास सतरा वर्ष भाजीविक्रीचा व्यवसाय केला….. कालांतराने घरातील मंडळींच्या सांगण्यावरून वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी व्यवसाय थांबविला…. पण काबाडकष्ट केलेला त्यांचा देह आराम तो काय करणार …..त्यानंतर दरवर्षी सहा ते आठ महिने गावी राहून काजू नारळाची लागवड केली… सतत काम काम आणि फक्त काम …..आयुष्यभर कष्ट केले…. गेले वर्षभराहून अधीक काळ बाबा आजारी आहेत….. ज्या गावात आपला जन्म झाला…. जेथे आपण लहानाचे मोठे झालो….. उतार वयातील काही काळ जेथे झाडापेडात आपला जीव रमविला त्या त्यांच्या मसुरे गावी जाण्याची त्यांची फार इच्छा होती….. डॅाक्टरांचा सल्ला घेऊन गणपतीच्या निमित्ताने आई आणि आमचा भाऊ प्रसाद त्यांना गावी घेऊन आले…. दोन दिवस गावी राहून पुन्हा परतीच्या प्रवासाला मुंबईला निघाले तेव्हा विमानाच्या विंडोमधून ( खिडकितून) बाहेर पाहतांना ……. आपली जन्म भूमी सोडताना त्यांच्या मनात कोणते बरे विचार येत असतील??….त्यांचा हा फोटो पाहताना मला मात्र गहिवरून येते….
1 year ago | [YT] | 4
View 0 replies