महिला संबळ वादक

Insta - mohinibhuse_sambal
Facebook - Mohini Bhuse


MohiniSambal

तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होत आहे की मी इयत्ता सातवीत असताना २०१३ साली ज्या स्पर्धेसाठी संबळ शिकले होते. त्या स्पर्धेच्या यावर्षी पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी मला प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं. हि माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. शाळेत( न्यू इंग्लिश ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, वडांगळी )असताना मी छोट्या छोट्या कार्यक्रमात संबळ वादन सादर करायचे. माझ्या शाळेतील शिक्षकांनी मला नेहमी साथ दिली ( गुरू गणेश डोकबाने सर , मुख्याध्यापक रत्नाकर सर , सांस्कृतिक विभागाचे आमचे भावसार सर माझे आई वडील ) या सर्वांचा मोलाचा वाटा आहे माझ्या प्रवासात.माझी दहावी झाली. माझी खूप इच्छा होती की मी तबला शिकावा पण त्यावेळी गावात क्लासेस नव्हते. मग विचार केला पुढे संगीतातच फुल टाईम शिकूया पण घरच्यांची इच्छा होती की मी फुल टाईम संगीतात जावू नये. मी शिकावं. घरच्यांच्या पुढे मला जाता आलं नाही. मन मारून मी ११/१२ वी सायन्स केलं आणि चांगल्या गुणांनी पासही झाले. मग मी परत इच्छा व्यक्त केली मला फुल टाईम संगीत क्षेत्रातच शिक्षण घ्यायचं आहे. पण तेव्हाही त्यांचा नकार आला. मग मी पुण्यात गेले तिथे मी BA - Psychology केले आणि एकीकडे तबल्याचे क्लासेस लावले. परंतु कोरोना आल्यामुळे काही दिवसातच माझे क्लास ही बंद झाले. हे सगळ चालू असताना मी संबळ सोलो वादनाचे छोटे मोठे कार्यक्रम करत होते. पुन्हा दोन अडीच वर्ष घरीच गेले. तेव्हा संबळची प्रॅक्टिस आणि शिक्षण सुरू राहील. माझं बॅचलर पूर्ण झालं. म्हटल आता डिप्लोमा इन फोक आर्ट करू पण तोही कोर्स तेव्हा ऑनलाईनच सुरू होता मग मी मास्टर्स इन सोशल वर्क , डिप्लोमा इन CSR भारती विद्यापीठात पूर्ण केला. पण हे सगळ सुरू असताना माझं मन मला खूप खात होत की मी माझ्या संबळासाठी काय करतेय? मला काय करायचंय ? तेव्हा आमच्या URCD विभागात मी नेहमी पहिल्या दुसऱ्या रँक वर येऊन माझं मास्टर्स पूर्ण केल्यावर म्हटल चला आता आपला पूर्ण वेळ संबळासाठी देवूया तर घरच्याच म्हणणं आता तू जॉब कर. मास्टर्स पूर्ण झाल्यावर माझी इच्छा होती मी डिप्लोमा इन फोकआर्ट करावा. मग घरच्यांना विश्वासात घेवून समजावलं मग कुठे त्यांनी परवानगी दिली आणि मी मास्टर्स इन फोकआर्ट साठी प्रवेश घेतला. तेव्हा माझ्या जीवनातला खूप आनंदाचा दिवस होता. संगीत ही अशी गोष्ट आहे जी हाफ टाइम नाही करू शकत. जिथे समर्पण आहे तिथे कला आहे. आणि या प्रदीर्घ काळानंतर मी फक्त संबळ करतेय. याचा मला खूप आनंद आहे. यापूर्वी माझं संगीतात कोणतही शिक्षण अथवा क्लासेस पूर्ण झाले नव्हते. आता १२ वर्षांनी नव्याने माझा संबळासाठीचा प्रवास सुरू झाला आहे. खूप गोष्टी शिकायच्या आहे. ही नवी सुरुवात आहे. जिथे मला ABCD पासून सुरुवात करायची आहे. जी कला मी शालेय जीवनात शिकले जिथे ना मला प्रसिद्धी कळत होती ना पैसा. फक्त मनात एकच होत मला फुल टाईम संबळ शिकायचं पण काही गोष्टीमुळे ते झालं नाही. पण जे होत ते चांगल्यासाठीच यावर माझा विश्वास आहे आणि जे होणार आहे ते ही चांगलच होणार आहे. आज हे सगळ सांगण्यामागच कारण एकच वर सांगितल्याप्रमाणे ज्या स्पर्धेसाठी मी संबळ शिकले तिथे मला जो हा मान मिळाला आणि सर्व प्रवास डोळ्यासमोर आला. मला देवाने नेहमीच भरभरून दिलेलं आहे. या सर्व प्रवासात माझ्या गुरूंनी , आई वडिलांनी , मित्र मैत्रिणी यांनी मला साथ दिली. माझे स्वामी माझ्या सोबत आहे म्हणून आत्तापर्यंतचा सर्व प्रवास छान झाला आणि होणार आहे. तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी मला वेळोवेळी शुभ आशीर्वाद दिले प्रेम दिलं मी आपल्या सर्वांची ऋणी आहे. तुमचे आशीर्वाद असेच नेहमी सोबत असूद्या

श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌷

1 year ago | [YT] | 33