महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली निर्भीड वृत्तवाहिनी शबनम न्यूज महाराष्ट्रातील जनतेला दैनंदिन घडामोडी ची बित्तंबातमी देण्याचे कार्य प्रामाणिकपणे करत आहे या वृत्तवाहिनीवर प्रसारित होणाऱ्या बातम्या या आपल्या परिसरातील घटनांवर आधारित असतात व प्रत्येक बातमी ही सोप्या भाषेत संपूर्ण सत्य समाजासमोर आणण्याचे कार्य करीत आहे.

अधिक बातम्यांसाठी आमच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
www.shabnamnewsonline.in

SHABNAM NEWS


SHABNAM NEWS

2 days ago | [YT] | 3

SHABNAM NEWS

2 days ago | [YT] | 3

SHABNAM NEWS

मोठ्या इमारतींनी नव्हे तर
कला-संस्कृतीच्या जतनाने शहराचा विकास : उपराष्ट्रपती राधाकृष्णन
३८ व्या पुणे फेस्टिव्हलचे दिमाखदार उद्घाटन
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार


केवळ मोठ्या आणि देखण्या इमारती उभ्या राहिल्याने शहराचा सर्वांगीण विकास होत नाही. शहराच्या विकासाबरोबरच कला, संस्कृती आणि परंपरांचे जतन करणेही आवश्यक आहे. आपल्या संस्कृतीचे मूळ सोडून विकास साधता येणार नाही. परदेशी संस्कृती आणि वेशभूषेचे अनुकरण करण्यापेक्षा भारतीय संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

३८ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पुणे फेस्टिव्हलच्या संरक्षक अभिनेत्री, नृत्यांगना खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षा मीरा कलमाडी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते.

5 days ago | [YT] | 3

SHABNAM NEWS

कलाकारांच्या प्रोत्साहनासाठी मान्यवरांनी
सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहावे
-खासदार हेमा मालिनी

देशभरात विविध उत्सवांच्या माध्यमातून कला, नाटक, नृत्य आणि संगीत सादर करण्याची संधी कलाकारांना मिळते. मात्र, या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील नामांकित व्यक्तींनी सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहणे आवश्यक आहे. कलाकारांचा सन्मान आणि त्यांच्या कलेला मिळणारी दाद त्यांचा आत्मविश्वास वाढवते. पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी विविध क्षेत्रांतील कलाकारांचा गौरव केला जातो, ही त्याची विशेष परंपरा आहे, असे मत मथुराच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी व्यक्त केले.

5 days ago (edited) | [YT] | 3

SHABNAM NEWS

पुणे फेस्टिव्हलमध्ये
उद्घाटन सोहळ्यातील सांस्कृतिक कर्यक्रम

उद्घाटन सोहळा – दरवर्षी प्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळादेखील नेत्रदीपक झाला. सुरुवातीला ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर व त्यांचे सहकारी यांच्या सुमधुर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. दीपप्रज्वलन व श्री गणेश आरती झाली.

या उद्घाटन सोहळ्यात नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रमाची झलक बघायला मिळेल.

गणेश वंदना - उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ ज्येष्ठ नृत्यगुरु शर्वरी जेमिनीस यांच्या कथक नृत्यशैलीतून साकारला गेला. त्यांच्या शर्वरी जेमिनीस डान्स कंपनीच्या १० शिष्या सहकलावंत होत्या. 'शेंदूर लाल चढायो' या ज्येष्ठ गायक महेश काळे यांनी गायलेल्या प्रसिद्ध आरतीवर ही गणेशवंदना सादर झाली.

5 days ago (edited) | [YT] | 3

SHABNAM NEWS

1 week ago | [YT] | 5

SHABNAM NEWS

1 week ago | [YT] | 2

SHABNAM NEWS

2 weeks ago | [YT] | 3

SHABNAM NEWS

2 weeks ago | [YT] | 3

SHABNAM NEWS

2 weeks ago | [YT] | 5