विनायकदादागुजर

आज माघ शु.४ विनायक चतृर्थी गुरुवार दिनांक २२/०१/२०२६ रोजी
श्री गणेश जन्मोत्सवाचे औचित्य साधून माझ्या नवीन YouTube चॅनलचा शुभारंभ केला आहे. 🙏✨

या चॅनलच्या माध्यमातून मी
सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय, पत्रकारिता, कृषी, शैक्षणिक, आध्यात्मिक, क्रीडा, सांस्कृतिक, पर्यटन, भ्रमंती, खाद्यसंस्कृती
अशा विविध व चौफेर विषयांवर माहितीपूर्ण व उपयुक्त कंटेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे.

आपण सर्वांनी माझ्या
👉 YouTube चॅनल – विनायकदादा गुजर
ला Subscribe, Like, Comment व Share करून मला प्रोत्साहित करावे धन्यवाद!🙏

आपल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी मनापासून धन्यवाद! 🙏🌸

आपला ✍️
विनायक पांडुरंग गुजर
मा.सरपंच पौड,
संपादक मुळशीरत्न


विनायकदादागुजर

आज इंटरनॅशनल बटाटा डे आहे म्हणे...
ज्यांना दर्शन झाले त्यांनी लिहा
श्री स्वामी समर्थ

2 months ago | [YT] | 1

विनायकदादागुजर

गेल्या दोन तीन दिवसात दिसलेल्या, खटकलेल्या काही प्रमुख घटनांबद्दल बोलायलाच हवं.

तुम्ही परदेशात जाऊ नका, प्रवास करु नका, खर्च करु नका वगैरे अटी आणि शर्ती सर्वसामान्य नागरिकांना घालून आपले विश्वगुरु महाशय स्वतः जगभर फिरतायेत.

त्यात अर्थातच काही आश्चर्य नाही.

पण जगभर जाऊन ते जे गुण उधळतायेत त्याला तोड नाही.

आधी त्या नॉर्वेमध्ये जाऊन आपण विश्वगुरु नसून आपल्या बाष्कळ बडबडीने तोंडाची वाफ दवडण्यासाठीसुद्धा आपण स्वतःच्या अकलेवर कमी आणि टेलीप्रॉम्प्टरवरच जास्त अवलंबून असल्याचं दाखवून देऊन महाशयांनी स्वतःबरोबरच समस्त देशाची शोभा करुन घेतली आहे. येत्या काही वर्षांत जेव्हा हे टेलीप्रॉम्प्टर महाशय समोरुन विचारण्यात आलेला प्रश्न ऐकून, त्यावरचं उत्तर रेडी टू इट वाचायला देतील तोपर्यंत आमचे विश्वगुरु प्रेस कॉन्फरन्स वगैरे काही घेणार नाहीत…तोपर्यंत आहेच, running away from press just the way he did at Norway!

आज त्या इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ‘मेलडी’ चॉकलेट देऊन त्याची केलेली प्रसिद्धी हे शुद्ध बालीशपणा, आचरटपणा, उथळपणा, म्हातारचळ किंवा याहून बोगस अशा सर्व कॅटॅगरीजमध्ये मोडणारं आहे. ‘मेलोनी + मोदी =. मेलडी’ असल्या कोट्यांनी हवेत उडायला आणि त्याबरहुकुम त्या मेलोनीबरोबर उघडउघड फ्लर्ट करायला माणूस खरोखर किती कोडगा असायला हवा…

कल्पना करा, हेच एखाद्या विरोधी पक्षातल्या तिशी-पस्तिशीतल्या नेत्याने केलं असतं तर काय रान पेटवलं असतं या लोकांनी? याच लोकांना भारत जोडो यात्रेतले राहुल गांधीचे देशभरातल्या सर्वसामान्य महिलांबरोबरचे फोटो पाहून त्यात गैर दिसत होतं.

या दोन दिवसात पहाण्यात आलेली आणि अत्यंत डोक्यात गेलेली आणखी एक गोष्ट म्हणजे Journalism Of Courage असं म्हणणाऱ्या लोकसत्ताच्या डिजिटल प्लॅटफॉर्मने भोंदू/गुन्हेगारी विषयक बातमीसाठी वापरलेला एक ‘एआय’ जनरेटेड फोटो. त्या फोटोत सदर भोंदू/गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याच्या जागी राहुल गांधीचा फोटो वापरण्यात आला आहे. RG हा या देशाचा विरोधी पक्षनेता आहे. ‘एआय’ फोटो कसे जनरेट करतं हे किमान बेसिक सोशल मीडिया वापरणाऱ्या तरी कुणाला सांगायची गरज नाही. आपण दिलेल्या प्रॉम्प्ट बरहुकुम फोटो ‘एआय’ जनरेट करुन देतं. आपण काढलेला भेळपुरीचा फोटो एडिट करुन दे म्हटलं तर ‘प्लेट कुठल्या
रंगाची घे’ तेही सांगायला लागतं, तर भोंदूबाबाच्या जागी RG चा फोटो स्वतःच्या डोक्याने वापरला म्हणजे ‘एआय’ ही लहानपणापासून कुठल्या ‘संस्कार वर्गात’ जात असेल ते सांगायला नकोच!

तो फोटो आपण नजरचुकीने वापरला असं म्हणत लोकसत्ताने दिलगिरी व्यक्त केली आहे. हल्ली त्यांनी दिलगिरीच्या चार ओळी खरडूनच ठेवल्या असाव्यात, सारख्याच छापून येतात कारण! असो.

त्यांनी तो फोटो प्रसिद्ध केला, मग डिलीट केला आणि दिलगिरी व्यक्त केली याचं आश्चर्य वाटावं असं काही नाही… पण यानिमित्ताने कॉंग्रेस काय झोपा काढते त्याचा प्रत्यय आला. असा फोटो वापरुन आपल्या नेत्याची बदनामी झाली म्हणून महाराष्ट्र किंवा राष्ट्रीय कॉंग्रेसपैकी कुणी साधा निषेधही नोंदवल्याचं कानावर नाही. पाहाण्यात नाही. आंदोलनं, अब्रुनुकसानीचा दावा वगैरे तर फारच लांब…

वर म्हटलं तेच परत म्हणतो, राहुल गांधीच्या जागी एखाद्या सत्ताधारी नगरसेवक किंवा आमदाराचा असा ‘एआय’ फोटो कुठे ‘नजरचुकीने’ वापरला गेला असता तर सत्ताधाऱ्यांनी काय रान पेटवलं असतं आत्तापर्यंत… कल्पना करा.

यापूर्वी अनेकदा हे लिहिलंय. आजही तेच लिहितो.

समोरचा प्रतिस्पर्धी फक्त उनाडक्या करून, एका मेलडी चॉकलेटच्या पाकिटावर दिवसभर चर्चेत राहात असेल, त्याला आंबा कापून खायला आवडतो की चोखून याच्या हेडलाईन्स होत असतील आणि त्यात त्याचे, त्याच्या मित्र-मंडळींचे सगळे कारनामे लिलया झाकले जात असतील तर झोपी गेलेल्या कॉंग्रेसने आता खडबडून जागं व्हायची गरज आहे… नाहीतर काळ कठीण आहे!
*Vनायक* 🎭

2 months ago | [YT] | 2

विनायकदादागुजर

आज मोहिनी एकादशी.महाविष्णुंनी मोहीनीचे रूप घेऊन सर्व देवांना अमृत चाखले. आज पृथ्वीतलावरही
अमृताचा वर्षाव होणार आहे.आज विष्णुंना तुळशीची पाने वहावी.
*ॐ नमो भगवती मोहिनी एकादश्यै नम:*
🙏
*Vनायक* 🎭

3 months ago | [YT] | 1

विनायकदादागुजर

नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे व मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळ पुणे आयोजित स्वर्गीय मामासाहेब मोहोळ आणि स्वर्गीय सदानंद मोहोळ यांच्या पुतळा अनावरण समारंभ तसेच स्वर्गीय सदानंद मोहोळ सभागृह चे उद्घाटन अनुक्रमे वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष माजी आमदार उल्हास दादा पवार व माझी क्रिकेट कसोटीपटू व निवड समितीचे अध्यक्ष चंदू बोर्डे च्या शुभहस्ते करण्यात आले. या शुभप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार माजी आमदार अशोक आण्णा मोहोळ संस्थेचे कार्याध्यक्ष संग्राम दादा मोहोळ सहकारी मित्र राम गायकवाड वैभव पवळे यांच्याबरोबर मी स्वतः उपस्थित राहिलो.🙏🙏🙏

3 months ago | [YT] | 2

विनायकदादागुजर

अग ये प्राजु ... सबंध महाराष्ट्रात महिलांच्या लैंगिक शोषणावर ब्र काढलं नाही ग तु , आता मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतीय? हास्यजत्रेपेक्षा हास्यास्पद की ग हे तुझ बोलण.. !
*Vनायक* 🎭
#प्राजक्तामाळी
#everyone

3 months ago (edited) | [YT] | 3

विनायकदादागुजर

नुतन अभिनंदन 💐🌷🌸🌹🌺

3 months ago | [YT] | 0