*माध्यमांच्या प्रवाहात वाहून जाण्यासाठी नाही, तर माध्यमविश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा आमचा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे.*

मुख्य प्रवाहात जी माहिती दिसत नाही, ती येथे नक्कीच समोर येईल, याची आम्ही आपल्याला खात्री देतो.
*"छापून यावी अथवा दाखवावी वाटते ती जाहिरात असते, आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते."*
आमचा प्रयत्न आहे अशा प्रत्येक बातमीचा समग्र आणि प्रामाणिक आढावा घेण्याचा.

येथे ना कोणी सुपारी घेतो, ना कोणी सुपारी देतो.
ही ‘पानटपरी’ नाही, हे कृपया लक्षात ठेवा.

*आम्ही वचन देतो — प्रत्येक विषयातील सत्य, निष्पक्षपणे आणि निःसंकोचपणे आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न सतत करत राहू.*

🙏 आपण या सत्याच्या प्रवासात आमच्यासोबत रहा.
*Like करा, Share करा आणि Subscribe करा @panaahnews ला.*

#news #chiranjeevibirthday #markandeya #automobile #trendingsongs #war2 #coolie #somwar_special_shiv_bhajan #rahulgandhi #putin #putin_zelensky #trumpnews #modi


panaahnews

हैद्रा दर्ग्यासाठी अन्नछत्र मंडळाची
२० किलोवॅट सौरऊर्जा भेट

वीजबिलाचा मोठा खर्च वाचणार, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण


अक्कलकोट, दि.११ : लाखो भाविकांचे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा पीर सैफुलमुलक चिस्ती दर्गा हैद्रा देवस्थानासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे २० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १८ ते २० लाख रुपये खर्च येणार असून अन्नछत्र मंडळाने सामाजिक बांधिलकीतून हा संपूर्ण खर्च उचलला आहे. प्रकल्पाचे काम
सुरू झाले असून येत्या आठ दिवसांत ते पूर्ण होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती हैद्रा देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष रफिक मुजावर यांनी दिली.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी दर्गा व्यवस्थापनाच्या विनंतीची तत्काळ दखल घेत या सौरऊर्जा प्रकल्पास मंजुरी दिली आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली. हैद्रा देवस्थान येथे दरमहा सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे वीजबिल येत असल्याने देवस्थानच्या व्यवस्थापनावर मोठा आर्थिक भार पडत होता. सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर या खर्चात मोठी बचत होऊन देवस्थानच्या अन्य धार्मिक व सामाजिक कामांसाठी निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

तालुक्यातील विविध धार्मिक आणि
सामाजिक उपक्रमांना सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने यापूर्वीही दुष्काळ, सामाजिक उपक्रम आणि गरजूंसाठी विविध स्वरूपात मदत केली
आहे. याच सामाजिक भूमिकेचा प्रत्यय हैद्रा देवस्थानासाठी देण्यात आलेल्या या
सौरऊर्जा प्रकल्पातून पुन्हा एकदा आला आहे. तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो, नारळ फोडून शुभारंभ करण्याची परंपरा या देवस्थानातून सुरू होते तसेच हैद्रा देवस्थान
हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असल्याने भाविकांकडून मोठ्या प्रमाणात नवस फेडला जात असल्याने या ठिकाणाला विशेष
महत्त्व आहे.

या सौरऊर्जा प्रकल्पासाठी नागनहळळी आश्रमशाळेचे सचिव जावेद पटेल यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेत अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले
यांची भेट घेऊन देवस्थानच्या वाढत्या वीजखर्चाबाबत माहिती दिली होती. त्यांच्या विनंतीनुसार अन्नछत्र मंडळाने हा संपूर्ण खर्च उचलत देवस्थानला मोठी मदत केली आहे.
या कामासाठी उपाध्यक्ष बंदेनवाज मुजावर, सचिव वकील मुजावर यांनीही परिश्रम घेतले असून देवस्थानच्यावतीने अन्नछत्र मंडळाचे विशेष आभार मानण्यात आले. या मदतीमुळे भविष्यातील वीजखर्चाचा मोठा भार कमी होणार असून सर्वधर्मीय सामाजिक सलोखा आणि सेवाभावाचा आदर्श या उपक्रमातून निर्माण झाला आहे.

16 hours ago | [YT] | 1

panaahnews

मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासून 154 मिलिमीटर पावसाची नोंद ! वसई ,विरार परिसरातील मुख्य रस्त्यांवर आलं पाणी.. पुढील तीन तास मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

2 months ago | [YT] | 0

panaahnews

मुंबईसह उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग ! विद्यार्थी व नोकरदारांचे हाल ; सखल भागात साचलं पाणी , किंग्ज सर्कल, अंधेरी सबवे भागात गुडघाभर साचलं पाणी.. हार्बर रेल्वे ठप्प ! पश्चिम आणि मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिरा

2 months ago | [YT] | 0

panaahnews

पहिल्याच मोठ्या पावसात मुंबई वेठीस!
सायन, कुर्ला, दादर पाण्यात; मुसळधार पावसानं दैना उडवली!

2 months ago | [YT] | 0

panaahnews

मान्सूनचा जोर वाढला! पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात सखल भागांत साचलं पाणी

2 months ago | [YT] | 0

panaahnews

#वडाळा_येथे_अप्पर_तहसील_कार्यालय_मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी नागरिकांच्या सोयीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून मौजे वडाळा येथे अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.
या संदर्भात आमदार सुभाष देशमुख यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अधिकृत पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. पत्रामध्ये उत्तर सोलापूर तालुक्यातील सुमारे ३५ गावांतील नागरिकांना शेती, जमीन वाटप, जन्म-मृत्यू नोंद, विविध दाखले तसेच महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी शहरातील तहसील कार्यालयात जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे नमूद करण्यात आले होते.
प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन स्तरावर विचार होऊन राज्यात नव्याने ६९ अप्पर तहसील कार्यालये निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली, त्यामध्ये वडाळा येथील कार्यालयाचाही समावेश करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी, नागरिक आणि ग्रामस्थांची महसूल विभागातील कामे अधिक जलद, सुलभ आणि स्थानिक पातळीवर होणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.आमदार सुभाष देशमुख यांनी नागरिकांना शासनाच्या सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील,असे सांगितले.

2 months ago | [YT] | 3

panaahnews

राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

2 months ago | [YT] | 0

panaahnews

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे १४ जून २०२६ रोजी पिकअप वाहन विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ८ जणांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एकूण ४० लाख रुपयांची मदत सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित वारसांना वितरित करण्यात आली.
माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथे पंढरपूर-सातारा मार्गावर पिकअप वाहन विहिरीत कोसळून अपघात झाला होता. या अपघातात इंदुबाई दशरथ बावचे (वय ६५), पूजा अमोल सातुरे (वय २३), पूजाव बालाजी बावचे (वय २७), अश्विनी संदीप बावचे (वय २७), संस्कार संदीप बावचे (वय १४), संस्कृती संदीप बावचे (वय १४), भारव अमोल सातुरे (वय ८) आणि समर्थ बालाजी बावचे (वय ६ महिने) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांनी आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये, अशी एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आली.

2 months ago | [YT] | 0

panaahnews

शिरखुरम्याचा गोडवा आणि आपुलकीचा ओलावा, या ईदला तुमच्या घरी आनंदाचा सण साजरा होवो. ईद मुबारक !
Eid Mubarak

5 months ago | [YT] | 4

panaahnews

उमेश पाटील
यांचा करुल गटातुन १३०० मतांनी पराभव

#solapurNews #solapur #kurul #sachinjadhav #umeshpatil

7 months ago | [YT] | 6