नमस्कार 🙏ℹ️nfo Marathi या यूट्यूब चॅनल वर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आपले हे चॅनेल जगातील विविध माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी मधून पुरवणारे Educational चॅनेल असून येथे तुम्हाला अगदी Cricket पासून ते राजकारणा पर्यंत सर्वच गोष्टी मनापासून शिकायला आणि बघायला मिळतील 🙏 तर वाट कशाची बघताय लवकर Subscribe करताय ना ! धन्यवाद !


Info Marathi

थेट निवडणूक आयुक्तांवर आरोप!

खरंच आपण अशा देशात राहतो का, ज्याने लोकशाही रुजवण्यासाठी असंख्य शहिदांचे बलिदान दिले आहे?
आजचा प्रश्न राहुल गांधी किंवा काँग्रेस काय म्हणते याचा नाही. प्रश्न हा आहे की लोकशाहीत “मतचोरी” सारखा गंभीर मुद्दा निघतो तरी कसा? आणि जर निघतो, तो थेट संपूर्ण राष्ट्रव्यापी पातळीवर, प्रसारमाध्यमांसमोर मांडला जातो, तर त्यात किमान एक टक्का तरी तथ्य आहे का नाही, हा विचार करायला नको का?
जर यात खरंच काही तथ्य असेल, तर आपल्या लोकशाही देशात किती भीषण परिस्थिती निर्माण झाली असेल! काही जण राहुल गांधींना त्यांच्या पक्षनिष्ठेमुळे दोष देतील, पण खरा प्रश्न आहे देश पहिले की पक्ष आणि व्यक्ती?
ज्या देशाची आत्मा लोकशाही आहे, त्या देशावर मतचोरीचा डाग लागला असेल, तर तो पुसायची जबाबदारी कोणाची? न्यायालयाची, निवडणूक आयोगाची, की सरकारची? आणि जर राहुल गांधींना वाटत असेल की यात एक टक्का तरी सत्य दडलं आहे, म्हणूनच त्यांनी हे थेट जनतेसमोर बोलायचं धाडस केलं असेल, तर मग त्यांनी न्यायालयाची दारं का ठोठावू नयेत?
तथापि, आज त्यांनी सरळ मुख्य निवडणूक आयुक्तांवरच सरकारचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे. हा आरोप अत्यंत गंभीर आहे. कारण ज्या संस्थेच्या हाती देशातील सत्तेचं भविष्य ठरवण्याची जबाबदारी असते, त्यांच्यावरच असे आरोप होणे हे लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे.
पूर्वी निवडणूक आयोगावर आरोप झाले की, ते स्वतः पुराव्यानिशी खंडन करायचे. त्यामुळे जनतेच्या मनात शंका राहत नव्हती आणि लोकशाहीची पाळेमुळे अधिक घट्ट होत गेली. आणीबाणीच्या काळात स्वर्गीय इंदिरा गांधींनी केलेल्या निर्णयांचे उत्तर जनतेने पुढील निवडणुकीत दिलं. तेव्हाही लोकशाही जिवंत होती. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज थेट निवडणूक आयोगावरच प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. असा प्रकार इतिहासात क्वचितच घडला आहे.
मित्रांनो, आपण कोणत्याही विचारसरणीचे समर्थक असलो तरी खरी भीती हीच आहे: उद्या परिस्थिती काय असेल? कारण जेव्हा सेवकच मालक बनतात, तेव्हा सर्वांत जास्त गरीब माणूसच भरडला जातो.

म्हणून लोकशाही वाचवा !
संदीप

3 months ago | [YT] | 0

Info Marathi

महाराष्ट्रावरील 9 लाख कोटींची चर्चा तर करावीच लागेल;
9 लाख कोटी मध्ये 12 शून्ये असतात. 9,00,00,00,00,000
9 लाख कोटी रुपये जर महाराष्ट्राच्या अंदाजे 12.5 कोटी लोकांमध्ये वाटले, तर प्रत्येक व्यक्तीला सुमारे ₹72,000 मिळतील. प्रत्येक घरात किमान 5 लोक जरी राहत असतील तर ₹72,000 गुणिले 5 म्हणजे एक कुटुंबाला 360,000 रुपये मिळतील ज्यात ते योग्य प्रशिक्षण घेऊन एक लघूउद्योग चालू करू शकतो… तुमचे काय मत आहे Comment मध्ये नक्की कळवा

3 months ago | [YT] | 1

Info Marathi

भीम जयंती च्या हार्दिक शुभेच्छा…

8 months ago | [YT] | 2

Info Marathi

रोखठोक पणे आपले मत नोंदवा …

10 months ago | [YT] | 10

Info Marathi

आज मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे तुम्हाला काय वाटते कोणत्या पक्षाला मंत्रिपदासाठी सर्वाधिक जागा मिळतील…

1 year ago | [YT] | 13

Info Marathi

तुमचा आवडता Indian🇮🇳 Cricket Captain कोण आहे ?

1 year ago | [YT] | 31

Info Marathi

महाराष्ट्राची राजधानी काय आहे ?

1 year ago | [YT] | 13

Info Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या गडावर झाला ?

1 year ago | [YT] | 21

Info Marathi

🇮🇳महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री कोण आहेत ?

1 year ago | [YT] | 21

Info Marathi

मा. एकनाथ शिंदे यांनी आता कोणती भूमिका घ्यावी ?

1 year ago | [YT] | 8