महाराष्ट्राच्या राजकीय, सहकार क्षेत्रातील जेष्ठ व्यक्तिमत्व तथा राज्याचे माजी शिक्षणमंत्री आदरणीय स्व.अनंतराव थोपटे साहेब यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
त्यांच्या जाण्याने पुणे जिल्ह्यातील एक मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. राज्याच्या सहकार चळवळीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि थोपटे परिवाराला या कठीण प्रसंगातून सावरण्याची शक्ती देवो ही प्रार्थना.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) पुणे ग्रामीण मंडल अधीक्षक अभियंता पदी श्री. सुरेश सवाईराम यांची नुकतीच नियुक्ती झाली. आज माझ्या जनसंपर्क कार्यालयात त्यांची भेट झाली असता त्यांचे या नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.
माझ्या भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीज ग्राहकांचे प्रश्न, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा आणि पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या विषयांवर त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैंकर, उपअभियंता आनंद घुले आणि राजगड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत आदी उपस्थित होते.
पुणे विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.विक्रम काकडे यांचा उमेदवारी अर्ज पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या सन्माननीय नेत्यांच्या उपस्थितीत आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला.
माजी खासदार श्री.संजयजी काकडे आणि श्री.विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पुणे शहरातील पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली आहे. याप्रसंगी त्यांचे पक्षामध्ये मनःपूर्वक स्वागत केले.
उमेदवारीबद्दल श्री.विक्रम काकडे यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
मुळशी तालुक्यातील कोंढूर येथील अमृतेश्वर मंदिर परिसरात आयोजित ३०१ व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.
अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कुशल प्रशासनातून, न्यायप्रियतेतून आणि जनकल्याणाच्या कार्यातून आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक जय मल्हार तरुण मंडळ, कोंढुर यांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागतपर सत्काराचा स्वीकार केला. याप्रसंगी तालुक्यातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुळशी आदत चॅम्पियन २०२६ या बैलगाडा शर्यतील मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे उपस्थित राहून बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला.
या प्रकारच्या स्पर्धांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि क्रीडा संस्कृतीला एक नवी ऊर्जा मिळते. अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात या शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनापासून कौतुक करतो.
या प्रसंगी मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके, मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुखदेव मांडेकर, यांच्यासह परिसरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि बैलगाडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काल मध्यरात्री १ च्या सुमारास नांदे चौक (ता.मुळशी) येथे सुरू असलेल्या रस्ते डांबरीकरण कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
नागरिकांच्या करातून उभे राहणारे हे रस्ते दीर्घकाळ टिकणारे असावेत, यासाठी कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी ठाम भूमिका आहे.
📍व्ही. जे. हॅपीनेस स्ट्रीट, हिंजवडी फेज २ इन्फोटेक पार्क
हिंजवडी फेज २ येथील व्ही. जे. हॅपीनेस स्ट्रीट येथे रशईट (RushEat) या नूतन हॉटेलचा शानदार उद्घाटन सोहळा आज माझ्या हस्ते संपन्न झाला.
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात ऋषिकेश किशोर झगडे या तरुणाने सुरू केलेला हा व्यवसाय कौतुकास्पद आहे. आजचा तरुण केवळ नोकरीच्या मागे न धावता, स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांना रोजगार देत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.
युवा उद्योजक ऋषिकेश झगडे आणि त्याच्या संपूर्ण टीमला या नवीन व्यवसायाच्या प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
आज शितोळेबाग, कासारसाई येथे शितोळे पेट्रोलियम या नूतन CNG पंपाचे उद्घाटन माझ्या आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या नवीन CNG पंपामुळे कासारसाई, हिंजवडी परिसरातील वाहनधारकांची मोठी सोय होणार असून, पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे एक चांगले पाऊल ठरेल. या व्यवसायाच्या भरभराटीसाठी शितोळे परिवाराला मनस्वी शुभेच्छा प्रदान केल्या.
या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, संपूर्ण शितोळे परिवार, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक आणि कासारसाईचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
आज नसरापूर (ता. भोर) येथे विविध विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी गावातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या कामाचा आढावा घेतला. सदर इमारतीचे काम अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावे, जेणेकरून रुग्णांना उत्तम सुविधा मिळतील, असे कडक निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
तसेच, नसरापूर येथील कातकरी वस्तीतील आपल्या बांधवांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कातकरी वस्तीच्या घरकुलासाठी वन विभागाकडून १२ गुंठे जागा उपलब्ध झाली आहे. आज या जागेची पाहणी करून वनविभाग व प्रांत कार्यालयाकडून लवकरात लवकर संयुक्त मोजणी पूर्ण करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मोजणी पूर्ण होताच घरकुलाचे काम तातडीने सुरू केले जाईल.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर पंचायत समितीचे उपसभापती विशाल कोंडे, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, नसरापूरच्या सरपंच उषा कदम, माजी उपसरपंच संदिप कदम यांच्यासह विविध पक्ष पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आज कापूरहोळ ते भोर-मांढरदेवी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.
सद्यस्थितीत या रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने मार्गी लावण्याच्या सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, भोर पंचायत समितीच्या सभापती मनिषाताई संतोष कंक, उपसभापती विशाल कोंडे, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेसाहेब आगळे उपस्थित होते. तसेच खानापूर, भोलावडे, आणि संगमनेर गावातील स्थानिक नागरिकांसह इतर आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
Shankar Hiraman Mandekar

भावपूर्ण श्रद्धांजली..💐
#भावपूर्ण_श्रद्धांजली #अनंतरावजी_थोपटे #restinpeace #anantraothopate #demise
2 days ago | [YT] | 20
View 0 replies
Shankar Hiraman Mandekar
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) पुणे ग्रामीण मंडल अधीक्षक अभियंता पदी श्री. सुरेश सवाईराम यांची नुकतीच नियुक्ती झाली. आज माझ्या जनसंपर्क कार्यालयात त्यांची भेट झाली असता त्यांचे या नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.
माझ्या भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील वीज ग्राहकांचे प्रश्न, शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा आणि पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या विषयांवर त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे, मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैंकर, उपअभियंता आनंद घुले आणि राजगड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत आदी उपस्थित होते.
#congratulations #अभिनंदन #पदनियुक्ती #महावितरण #shankarmandekar
3 days ago | [YT] | 10
View 0 replies
Shankar Hiraman Mandekar
पुणे विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री.विक्रम काकडे यांचा उमेदवारी अर्ज पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या सन्माननीय नेत्यांच्या उपस्थितीत आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आला.
माजी खासदार श्री.संजयजी काकडे आणि श्री.विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पुणे शहरातील पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली आहे. याप्रसंगी त्यांचे पक्षामध्ये मनःपूर्वक स्वागत केले.
उमेदवारीबद्दल श्री.विक्रम काकडे यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
#vikramkakade #ncp #sunetrapawar #पक्षप्रवेश #shankarmandekar
6 days ago | [YT] | 9
View 0 replies
Shankar Hiraman Mandekar
मुळशी तालुक्यातील कोंढूर येथील अमृतेश्वर मंदिर परिसरात आयोजित ३०१ व्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहून राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.
अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कुशल प्रशासनातून, न्यायप्रियतेतून आणि जनकल्याणाच्या कार्यातून आदर्श राज्यकारभाराचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक जय मल्हार तरुण मंडळ, कोंढुर यांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागतपर सत्काराचा स्वीकार केला. याप्रसंगी तालुक्यातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #अहिल्यादेवी_होळकर_जयंती #ahilyadeviholkar #shankarmandekar #ncp
6 days ago | [YT] | 6
View 1 reply
Shankar Hiraman Mandekar
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मुळशी आदत चॅम्पियन २०२६ या बैलगाडा शर्यतील मुळशी तालुक्यातील मुलखेड येथे उपस्थित राहून बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवला.
या प्रकारच्या स्पर्धांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि क्रीडा संस्कृतीला एक नवी ऊर्जा मिळते. अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूपात या शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनापासून कौतुक करतो.
या प्रसंगी मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदाताई बाबाजी शेळके, मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुखदेव मांडेकर, यांच्यासह परिसरातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी, सहकार क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि बैलगाडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#बैलगाडा_शर्यत #मुळशी #बैलगाडा #bailgada #shankarmandekar
1 week ago | [YT] | 19
View 0 replies
Shankar Hiraman Mandekar
काल मध्यरात्री १ च्या सुमारास नांदे चौक (ता.मुळशी) येथे सुरू असलेल्या रस्ते डांबरीकरण कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.
नागरिकांच्या करातून उभे राहणारे हे रस्ते दीर्घकाळ टिकणारे असावेत, यासाठी कामाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी ठाम भूमिका आहे.
#workinprogress #roaddevelopment #shankarmandekar #ncp #development
1 week ago | [YT] | 20
View 0 replies
Shankar Hiraman Mandekar
📍व्ही. जे. हॅपीनेस स्ट्रीट, हिंजवडी फेज २ इन्फोटेक पार्क
हिंजवडी फेज २ येथील व्ही. जे. हॅपीनेस स्ट्रीट येथे रशईट (RushEat) या नूतन हॉटेलचा शानदार उद्घाटन सोहळा आज माझ्या हस्ते संपन्न झाला.
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात ऋषिकेश किशोर झगडे या तरुणाने सुरू केलेला हा व्यवसाय कौतुकास्पद आहे. आजचा तरुण केवळ नोकरीच्या मागे न धावता, स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांना रोजगार देत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.
युवा उद्योजक ऋषिकेश झगडे आणि त्याच्या संपूर्ण टीमला या नवीन व्यवसायाच्या प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
#newbusiness #hotelindustry #inaugurationceremony #shankarmandekar #hinjawadi
1 week ago | [YT] | 12
View 0 replies
Shankar Hiraman Mandekar
📍शितोळे पेट्रोलियम उद्घाटन सोहळा, कासारसाई (ता.मुळशी)
आज शितोळेबाग, कासारसाई येथे शितोळे पेट्रोलियम या नूतन CNG पंपाचे उद्घाटन माझ्या आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या नवीन CNG पंपामुळे कासारसाई, हिंजवडी परिसरातील वाहनधारकांची मोठी सोय होणार असून, पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे एक चांगले पाऊल ठरेल. या व्यवसायाच्या भरभराटीसाठी शितोळे परिवाराला मनस्वी शुभेच्छा प्रदान केल्या.
या उद्घाटन सोहळ्यास परिसरातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, संपूर्ण शितोळे परिवार, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक आणि कासारसाईचे ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
#उद्घाटन #cngpump #कासारसाई #inauguration #shankarmandekar
1 week ago | [YT] | 7
View 0 replies
Shankar Hiraman Mandekar
आज नसरापूर (ता. भोर) येथे विविध विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी गावातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या कामाचा आढावा घेतला. सदर इमारतीचे काम अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावे, जेणेकरून रुग्णांना उत्तम सुविधा मिळतील, असे कडक निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.
तसेच, नसरापूर येथील कातकरी वस्तीतील आपल्या बांधवांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कातकरी वस्तीच्या घरकुलासाठी वन विभागाकडून १२ गुंठे जागा उपलब्ध झाली आहे. आज या जागेची पाहणी करून वनविभाग व प्रांत कार्यालयाकडून लवकरात लवकर संयुक्त मोजणी पूर्ण करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मोजणी पूर्ण होताच घरकुलाचे काम तातडीने सुरू केले जाईल.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर पंचायत समितीचे उपसभापती विशाल कोंडे, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, नसरापूरच्या सरपंच उषा कदम, माजी उपसरपंच संदिप कदम यांच्यासह विविध पक्ष पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
#nasrapur #developmentwork #healthcare #gharkulyojana #shankarmandekar
1 week ago | [YT] | 13
View 0 replies
Shankar Hiraman Mandekar
आज कापूरहोळ ते भोर-मांढरदेवी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.
सद्यस्थितीत या रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने मार्गी लावण्याच्या सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, भोर पंचायत समितीच्या सभापती मनिषाताई संतोष कंक, उपसभापती विशाल कोंडे, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राजेसाहेब आगळे उपस्थित होते. तसेच खानापूर, भोलावडे, आणि संगमनेर गावातील स्थानिक नागरिकांसह इतर आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
#भोर_राजगड_मुळशी #bhor_rajgad_mulshi #development #shankarmandekar #पाहणी_दौरा
1 week ago | [YT] | 25
View 1 reply
Load more