Vishay Aika या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. गल्लीतल्या कार्यकर्त्यांपासून दिल्लीतल्या नेत्यांपर्यंत, वेब सिरीज, मालिकांपासून ते चित्रपटांपर्यंत, चिल्लर पासून नोटेपर्यंत, शेतकऱ्यांपासून ते नोकरदारांपर्यंत. का? पासून कसं? इथं पर्यंत राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सर्वच क्षेत्रातील प्रश्नांची उत्तरं, चालू घडामोडींवर चर्चा आणि माहिती आता एकाच चौकटीत.
आता एवढं सगळं एकाच ठिकाणी मिळत असेल तर मग...
#VishayAika


Vishay Aika

भारताने दहशतवादाच्या विरोधात "ऑपरेशन सिंदूर" लाँच केलं असून. "ऑपरेशन सिंदूर"च्या माध्यमातून पाकिस्तानात 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक करण्यात आला आहे.

#operationsindoor #pahalgamterrorattack #indianarmy #pakistan #airstrike #viral #pahalgam #pok #vishayaika

7 months ago | [YT] | 0

Vishay Aika

7 मे ला सायरन वाजल्यानंतर तुम्ही काय करायचं?

#mockdrill #pune #pakistan #viral #vishayaika

7 months ago | [YT] | 1

Vishay Aika

7 मे 2025 ला महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे.

#MockDrill #Maharashtra #CivilDefence

(On May 7, 2025, mock drills will be held in a total of 244 districts in India and 16 locations in Maharashtra.)

7 months ago | [YT] | 1

Vishay Aika

दहशतवादविरोधी कारवायांच्या तीव्रतेदरम्यान सुरक्षा दलांनी गेल्या 24 तासांत काश्मीर खोऱ्यात सक्रिय दहशतवाद्यांची आणखी चार घरे उडवून दिली. तर जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी एका नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, संशयित बंदूकधाऱ्यांनी शनिवारी (26 एप्रिल) रात्री उशिरा 45 वर्षीय गुलाम रसूल मगरे यांची त्यांच्या कांदी खास येथील राहत्या घरी गोळ्या घालून हत्या केली.

#pahalgam #pakistan #viral #vishayaika #jammukashmir

7 months ago | [YT] | 0

Vishay Aika

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालाय. 15 दिवसांनंतर कोरटकर जेलबाहेर येणार आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय. छत्रपतींचा वामान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरची जामीन मिळविण्यासाठी धावाधाव करत होता. कोल्हापूर दिवाणी न्यायालयानंही त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकरच्या वकिलांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

8 months ago | [YT] | 0

Vishay Aika

सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी आहे. पेट्रोल, डिझेल नंतर आता घरगुती गॅस सिलेंडर डायरेक्ट 50 रुपयांनी महागला आहे. आज रात्रीपासून नवी दरवाढ लागू होणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडर म्हागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे.
#gas #middleclass #india #vishayaika #bjp #modi

8 months ago | [YT] | 0

Vishay Aika

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बेगूसरायहून थेट पाटण्याच्या श्रीकृष्ण मेमोरियल हॉलमध्ये पोहोचले. येथे आयोजित संविधान सुरक्षा परिषदेच्या ‘न्यायाचा अधिकार’ या विषयावर बोलताना त्यांनी शेअर बाजारात आलेल्या गडबडीवर प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी शेअर बाजाराची वाट लावली आहे. आज बाजार पूर्णपणे कोसळून गेला आहे.
#sharemarket #stocktrading #india #trump #rahulgandhi #vishayaika

8 months ago | [YT] | 0

Vishay Aika

पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि रामदेव यांनी फसव्या जाहिराती करून लोकांची दिशाभूल केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात बिनशर्त माफी मागितली आहे.

पतंजलीच्या या फसव्या जाहिराती पुन्हा दाखवणार नाही, असा शब्दही या माफीनाम्यात त्यांनी दिला आहे.

#babaramdev #patanjali #india #supremcourt #viral #vishayaika

1 year ago | [YT] | 1

Vishay Aika

1 year ago | [YT] | 1

Vishay Aika

1 year ago | [YT] | 1