आदर्श कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात शिकणारी आपल्या संस्थेतील विद्यार्थीनी कु. मनीषा शर्मा ही ०५/०३/२०२५ रोजी महाविद्यालयातर्फे नाशिक येथे नेण्यात आलेल्या शैक्षणिक सहली मध्ये सहभागी झाली होती.
इतिहास, पर्यावरण व औद्योगिक प्रशिक्षण विषयक या सहली अंतर्गत विद्यार्थ्यांनी शांति-कृष्ण म्युझियम ऑफ मनी अँड हिस्टरी व सुला वाईन यार्ड्स यांना भेट दिली. ही अभ्यासपूर्ण सहल विद्यार्थ्यांना अतिशय ज्ञानवर्धक ठरली.
कै. शुभांगी सत्यवान घाडी यांच्या स्मृती प्रित्यर्थ घाडी कुटुंबीयांनी ८/०२/२०२५ रोजी आपल्या ‘माई बाल सदन’ येथील मुलांबरोबर केक कापून कै. शुभांगी ताईंचा जन्मदिवस साजरा केला व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी त्यांनी मुलांना लेखन साहित्याच्या ३० संचांचे वाटप केले त्याबरोबरच संस्थेला ५२ किलो तांदूळ, पाच किलो खाद्यतेल व चार किलो डाळ भेटस्वरूपात दिले. संस्था घाडी परिवाराची आभारी आहे.
८ मार्च २०२५ रोजी असलेला जागतिक महिला दिन सौ. वर्षा अभिजीत पाटील व त्यांची चिमुकली कन्या आरुषी यांनी आपल्या संस्थेतील 18 प्लस उड्डाण आश्रमातील मुलींबरोबर केक कापून अत्यंत आनंदाने साजरा केला. तसेच श्रीमती अपूर्वा भोसले, श्रीमती नेहा खामकर व सोनाली घाडी यांनी देखील आश्रमातील मुलींबरोबर जागतिक महिला दिन साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
Miss Shruti Acharya, a student of our trust is pursuing Bachelor of Business Administration from ‘Maharashtra Knowledge Corporation Limited’ under a work based learning program.
She successfully offered IT assistance to Gurukul School. To appreciate this achievement and her work efficiency and sincerity in general, she Is bestowed with ‘Excellent Performance Award’. Our Trust congratulates her for this achievement.
स्वराज्यरक्षणार्थ सतत नऊ वर्षे जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी आणि मुंबईचे टोपीकर, अफाट सेनेसह मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी चालून आलेला औरंगजेब आणि सगळ्यात महत्त्वाची व धोकादायक अशी विश्वासघातकी स्वजनांची फळी या पाच आघाड्यांवर लढणारा; स्वधर्म रक्षणार्थ अनन्वित अत्याचार सहन करूनही न बधणारा; तसेच संस्कृत भाषेतील बुधभूषण आणि ब्रज भाषेतील नायिकाभेद, नखशीख व सातसतक हे ग्रंथ लिहिणारे प्रतिभावंत कविराज असे कोमल कवीमन आणि सेना धुरंधरत्व हे गुण एका ठाई एकवटलेले व्यक्तिमत्व म्हणजेच हिंदुहृदय सिंहासनाधीश्वर - छत्रपती शेर शिवराज यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज. यांचा जाज्वल्य झुंजार पराक्रम आपल्यापुढे मांडण्याचा मनस्वी प्रयत्न करणारा छावा हा चित्रपट.
आपल्या या दैदीप्यमान इतिहासाचा परिचय मुलांना व्हावा या हेतूने संस्थेच्या सल्लागार समितीचे सदस्य श्री अभिजीत पाटील हे 'माई बाल सदन' मधील सर्व बाळगोपाळ व त्यांच्या काळजीवाहकांना छावा हा चित्रपट दाखविण्यास घेऊन गेले. सर्व मुलांतर्फे व संस्थेतर्फे श्री अभिजीत पाटील यांचे मनःपूर्वक आभार.
२२/०२/२०२५ रोजी ‘श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट’ या आपल्या संस्थेस ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’, नवी मुंबई केंद्र यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व द्रष्टे नेते माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावे दिला जाणारा ‘कृतज्ञता पुरस्कार’ बहाल करण्यात आला.
आज आपल्या हृदयस्थ लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे जयंती आहे. संस्थेतील मुलांनी अगदी प्रेमभरे शिरसावंद्य प्रजापती शिवरायांची पूजा केली. स्वधर्म रक्षणार्थ संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या राजनीतिधुरंधर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
११ जानेवारी २०२५ रोजी पार पडलेल्या ‘आयुष्य असं ही जगावं ’ या आपल्या तरुणाईच्या कलागुणांना वाव देणाऱ्या, रंगारंग मनोरंजनाने भरपूर अश्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. आपल्या संस्थेच्या यंग ब्रिगेडचे कार्यक्रमाचे नियोजन देखील वाखाणण्याजोगे होते.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव श्री जगदीश जाधव यांनी प्रेक्षकांशी साधलेला मर्मस्पर्शी संवाद आज आपण पाहूयात. कार्यक्रमास उपस्थित न राहू शकलेला ‘श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट’ चा परिवार या कार्यक्रमाची झलक पाहण्यास आतुर असेलच. लवकरच यासंबंधीचा व्हिडिओ घेऊन आपल्यापुढे सादर होऊ.
‘रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया’ तर्फे 09/01/2025 रोजी ‘ श्री गजानन चॅरिटेबल ट्रस्ट’ या आपल्या संस्थेच्या समाज उद्धारक कार्याचा गौरव करण्याकरिता संस्थेचे संस्थापक सचिव श्री जगदीश जाधव व संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री प्रशांत बडेकर यांचा रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन दिनेश मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
*श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट*
*नववर्षात मनोरंजनाची मैफिल*
आपणां सर्वांना कळविण्यास आनंद होत आहे की नववर्षानिमित्त आम्ही आपल्या सर्वांसाठी मनोरंजनाची मैफिल घेऊन येत आहोत. आपल्या बदलापूर मधील स्थानिकांच्या कलागुणाला व्यासपीठ मिळावे व आपल्या संस्थेचे कार्य अधिक लोकांपर्यंत पोहचावे या प्राथमिक उद्देशाने आपण शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी 'आयुष्य असं ही जगावं' हा कौटुंबिक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करीत आहोत. कार्यक्रमात संगीत, नृत्य, काव्य, मुकाभिनय, स्टॅन्ड अप कॉमिडी, कव्वाली, गझल यांसारख्या दर्जेदार मनोरंजनाची मैफिल रंगणार आहे तरी आपण सहकुटुंब कार्यक्रमांस उपस्थित रहावे ही विनंती. या कार्यक्रमाद्वारे उभ्या राहिलेल्या निधीमुळे आमच्या संस्थेने हाती घेतलेले सामाजिक कार्य अधिक हिरीरीने करण्यास आम्हांला मोलाचे सहाय्य होईल. मनोरंजना सहित काही निष्पाप जीवांच्या जीवन उद्धारक कार्यात सहभागी होण्याचे पुण्य आपल्या पदरी खचितच पडेल तेव्हा या कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती.
*'आयुष्य असं ही जगावं'*
*दि. ११ जानेवारी २०२५, दुसरा शनिवार.*
वेळ : संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत.
ठिकाण : पेंडुलकर सभागृह, कात्रप, बदलापूर पूर्व
Shree Gajanan Leela Charitable Trust

1 year ago | [YT] | 17
View 0 replies

1 year ago | [YT] | 19
View 2 replies
Shree Gajanan Leela Charitable Trust
८ मार्च २०२५ रोजी असलेला जागतिक महिला दिन सौ. वर्षा अभिजीत पाटील व त्यांची चिमुकली कन्या आरुषी यांनी आपल्या संस्थेतील 18 प्लस उड्डाण आश्रमातील मुलींबरोबर केक कापून अत्यंत आनंदाने साजरा केला. तसेच श्रीमती अपूर्वा भोसले, श्रीमती नेहा खामकर व सोनाली घाडी यांनी देखील आश्रमातील मुलींबरोबर जागतिक महिला दिन साजरा करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
1 year ago (edited) | [YT] | 21
View 1 reply
Shree Gajanan Leela Charitable Trust
Miss Shruti Acharya, a student of our trust is pursuing Bachelor of Business Administration from ‘Maharashtra Knowledge Corporation Limited’ under a work based learning program.
She successfully offered IT assistance to Gurukul School. To appreciate this achievement and her work efficiency and sincerity in general, she Is bestowed with ‘Excellent Performance Award’. Our Trust congratulates her for this achievement.
1 year ago | [YT] | 38
View 13 replies
Shree Gajanan Leela Charitable Trust
स्वराज्यरक्षणार्थ सतत नऊ वर्षे जंजिरेकर सिद्दी, गोव्याचे फिरंगी आणि मुंबईचे टोपीकर, अफाट सेनेसह मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी चालून आलेला औरंगजेब आणि सगळ्यात महत्त्वाची व धोकादायक अशी विश्वासघातकी स्वजनांची फळी या पाच आघाड्यांवर लढणारा; स्वधर्म रक्षणार्थ अनन्वित अत्याचार सहन करूनही न बधणारा; तसेच संस्कृत भाषेतील बुधभूषण आणि ब्रज भाषेतील नायिकाभेद, नखशीख व सातसतक हे ग्रंथ लिहिणारे प्रतिभावंत कविराज असे कोमल कवीमन आणि सेना धुरंधरत्व हे गुण एका ठाई एकवटलेले व्यक्तिमत्व म्हणजेच हिंदुहृदय सिंहासनाधीश्वर - छत्रपती शेर शिवराज यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज. यांचा जाज्वल्य झुंजार पराक्रम आपल्यापुढे मांडण्याचा मनस्वी प्रयत्न करणारा छावा हा चित्रपट.
आपल्या या दैदीप्यमान इतिहासाचा परिचय मुलांना व्हावा या हेतूने संस्थेच्या सल्लागार समितीचे सदस्य श्री अभिजीत पाटील हे 'माई बाल सदन' मधील सर्व बाळगोपाळ व त्यांच्या काळजीवाहकांना छावा हा चित्रपट दाखविण्यास घेऊन गेले. सर्व मुलांतर्फे व संस्थेतर्फे श्री अभिजीत पाटील यांचे मनःपूर्वक आभार.
1 year ago (edited) | [YT] | 15
View 2 replies
Shree Gajanan Leela Charitable Trust
२२/०२/२०२५ रोजी ‘श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट’ या आपल्या संस्थेस ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’, नवी मुंबई केंद्र यांच्यातर्फे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व द्रष्टे नेते माननीय श्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावे दिला जाणारा ‘कृतज्ञता पुरस्कार’ बहाल करण्यात आला.
1 year ago | [YT] | 18
View 3 replies
Shree Gajanan Leela Charitable Trust
आज आपल्या हृदयस्थ लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे जयंती आहे. संस्थेतील मुलांनी अगदी प्रेमभरे शिरसावंद्य प्रजापती शिवरायांची पूजा केली. स्वधर्म रक्षणार्थ संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या राजनीतिधुरंधर, महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
1 year ago | [YT] | 18
View 1 reply
Shree Gajanan Leela Charitable Trust
११ जानेवारी २०२५ रोजी पार पडलेल्या ‘आयुष्य असं ही जगावं ’ या आपल्या तरुणाईच्या कलागुणांना वाव देणाऱ्या, रंगारंग मनोरंजनाने भरपूर अश्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. आपल्या संस्थेच्या यंग ब्रिगेडचे कार्यक्रमाचे नियोजन देखील वाखाणण्याजोगे होते.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव श्री जगदीश जाधव यांनी प्रेक्षकांशी साधलेला मर्मस्पर्शी संवाद आज आपण पाहूयात. कार्यक्रमास उपस्थित न राहू शकलेला ‘श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट’ चा परिवार या कार्यक्रमाची झलक पाहण्यास आतुर असेलच. लवकरच यासंबंधीचा व्हिडिओ घेऊन आपल्यापुढे सादर होऊ.
1 year ago (edited) | [YT] | 7
View 0 replies
Shree Gajanan Leela Charitable Trust
‘रोटरी क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रियल एरिया’ तर्फे 09/01/2025 रोजी ‘ श्री गजानन चॅरिटेबल ट्रस्ट’ या आपल्या संस्थेच्या समाज उद्धारक कार्याचा गौरव करण्याकरिता संस्थेचे संस्थापक सचिव श्री जगदीश जाधव व संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री प्रशांत बडेकर यांचा रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन दिनेश मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
1 year ago (edited) | [YT] | 16
View 3 replies
Shree Gajanan Leela Charitable Trust
*श्री गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्ट*
*नववर्षात मनोरंजनाची मैफिल*
आपणां सर्वांना कळविण्यास आनंद होत आहे की नववर्षानिमित्त आम्ही आपल्या सर्वांसाठी मनोरंजनाची मैफिल घेऊन येत आहोत. आपल्या बदलापूर मधील स्थानिकांच्या कलागुणाला व्यासपीठ मिळावे व आपल्या संस्थेचे कार्य अधिक लोकांपर्यंत पोहचावे या प्राथमिक उद्देशाने आपण शनिवार दि. ११ जानेवारी २०२५ रोजी 'आयुष्य असं ही जगावं' हा कौटुंबिक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करीत आहोत. कार्यक्रमात संगीत, नृत्य, काव्य, मुकाभिनय, स्टॅन्ड अप कॉमिडी, कव्वाली, गझल यांसारख्या दर्जेदार मनोरंजनाची मैफिल रंगणार आहे तरी आपण सहकुटुंब कार्यक्रमांस उपस्थित रहावे ही विनंती. या कार्यक्रमाद्वारे उभ्या राहिलेल्या निधीमुळे आमच्या संस्थेने हाती घेतलेले सामाजिक कार्य अधिक हिरीरीने करण्यास आम्हांला मोलाचे सहाय्य होईल. मनोरंजना सहित काही निष्पाप जीवांच्या जीवन उद्धारक कार्यात सहभागी होण्याचे पुण्य आपल्या पदरी खचितच पडेल तेव्हा या कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती.
*'आयुष्य असं ही जगावं'*
*दि. ११ जानेवारी २०२५, दुसरा शनिवार.*
वेळ : संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत.
ठिकाण : पेंडुलकर सभागृह, कात्रप, बदलापूर पूर्व
*देणगी मूल्य प्रति व्यक्ती रु. 200/-*
संपर्क :
श्री विवेक दाभोळकर 9892522661
माई बाल सदन, बदलापूर ट्रान्सपोर्ट, बदलापूर पूर्व.
श्री प्रशांत बडेकर 9527873949
18+ उड्डाणं मुलींचे केंद्र, आपटे वाडी,
बदलापूर पूर्व
1 year ago (edited) | [YT] | 14
View 2 replies
Load more