Wrestlingis my life

Hello, welcome to kusti hech jivan youtube channel. Wrestling is the lifeblood of a digital media company that is always on the lookout for important news and developments in the field of wrestling. Our entire team is working to grow our soil games and promote these games on digital media platforms.

mail id- kustihechjivan@gmail.com


कुस्ती हेच जीवन kusti hech jivan

लाल मातीची मशागत... गंगावेश तालमीच्या मल्लांनी खासबाग आखाड्याच्या मातीत लिंबू, हळद, तेल, कापूर, काव ई साहित्य वापरून लाल मातीची मशागत केल.


#कुस्ती #खासबाग #maulijamadade

1 month ago | [YT] | 139

कुस्ती हेच जीवन kusti hech jivan

*अखेर लाल मातीच्या लढ्याला यश...*

*जानेवारी महिन्यात गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धेचा रंगणार थरार..i*

अनेक वर्षापासून खंडित असलेली गोकुळ केसरी व मानधनधारक कुस्ती स्पर्धा सुरू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त पैलवान, वस्ताद मंडळीनी 25 ऑक्टबर 2025 रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जाहीर केले होते. मात्र गोकुळच्या संचालक मंडळाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ साहेब यांनी आज कागल येथे समस्त पैलवान मंडळींना कुस्ती स्पर्धेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. यावेळी नाविद मुश्रीफ यांनी बोलताना सांगितले की गोकुळ संघ नेहमीच कुस्तीच्या पाठीशी असेल व खंडित असलेली गोकुळ केसरी व मानधन धारक कुस्ती स्पर्धेला माझ्या कार्यकाळात पुन्हा सुरुवात झाली तर या गोष्टीचा मला जास्त आनंद होईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व नगर पालिकेच्या निवडणूकीमुळे स्पर्धा जानेवारी महीन्यात घेवू असे सांगण्यात आले. यावेळी पैलवान नंदू आबदार, समीर देसाई, मारुती पवार (वस्ताद), तानाजी कुराडे, वैभव तेली, सागर शिंदे, जितेंद्र सावंत, अभी पाटील, अक्षय पाटील इ. उपस्थीत होते.

*पैलवान रवींद्र पाटील यांची यशस्वी मध्यस्थी.*
गोकुळ केसरी' ही कोल्हापूर येथील जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने आयोजित केली जाणारी एक प्रतिष्ठेची कुस्ती स्पर्धा आहे. अनेक वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन न झाल्यामुळे कुस्तीप्रेमी आणि पैलवान नाराज आहेत आणि ही स्पर्धा पुन्हा सुरू करण्याच्या मागणी साठी जिल्ह्यातील तमाम कुस्ती शौकिन व पैलवान मंडळीनी उपोषणाचे अस्त्र हाती घेतले होते. त्यामुळें गोकुळ संघा बरोबरचा संघर्ष अटळ होता पण आशियाई सुवर्ण पदक विजेते व उप महाराष्ट्र केसरी पैलवान रवींद्र पाटील व श्री. अशोक सातुसे यांनी सदर माहिती नविद मुश्रीफ साहेबांना सांगितली व त्यांनी देखील वेळ न घालवता सर्व पैलवान मंडळींना चर्चेचे निमंत्रण देण्यास सांगितले व चर्चेतून तोडगा काढत स्पर्धा जानेवारी महीन्यात घेणार असल्याचे जाहीर केले.

कुस्ती हेच जीवनची *लढा लाल मातीच्या हक्कासाठीची चळवळ* कुस्ती पंढरीसाठी ठरतेय वरदान...
कोल्हापूर जिल्ह्यातील बंद पडलेले अनेक कुस्ती मैदाने, स्पर्धा सुरू करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम कुस्तीप्रेमी, पैलवान व वस्ताद मंडळींना हाताशी धरून कुस्ती हेच जीवन समूहाने सोशल मीडिया व्दारे *लढा लाल मातीच्या हक्कासाठी* या टॅग लाईनखाली मोठी चळवळ उभी करत कुंभी, शाहू, बिद्री सारख्या ठिकाणी लढा यशस्वी केला आहे. यापुढेही हा लढा असाच चालू राहणार असुन गोकुळ नंतर आता लवकरच जवाहर साखर कारखान्याच्या कुस्ती स्पर्धा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

धन्यवाद.
*पैलवान रामदास देसाई*
संकल्पक: कुस्ती हेच जीवन महासंघ
Mob no- 9594995065

2 months ago | [YT] | 17

कुस्ती हेच जीवन kusti hech jivan

उप महाराष्ट्र केसरी पैलवान शैलेश शेलके

Jamadade vs Shelake #backthrow
#photographychallenge #photographyeveryday #photochallenge2025 #aiphotography
#pictoftheday
#birdlovers
#PHOT0

3 months ago | [YT] | 62

कुस्ती हेच जीवन kusti hech jivan

महाराष्ट्र केसरी Sikandar Shaikh AI photo

3 months ago | [YT] | 71

कुस्ती हेच जीवन kusti hech jivan

पैलवान भारत मदने.. #AIPHOTO

3 months ago | [YT] | 106

कुस्ती हेच जीवन kusti hech jivan

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने झालेल्या ६६ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सोलापूरचा वेताळ शेळके ठरला विजेता.
अंतिम लढतीत पृथ्वीराज पाटीलचा पराभव करत जिंकली मानाची महाराष्ट्र केसरीची गदा... #अभिनंदन

#maharashatrakesari #vetalshelake

9 months ago | [YT] | 173

कुस्ती हेच जीवन kusti hech jivan

अभिनंदन....I
पै. पृथ्वीराज मोहोळ ठरला २०२४-२५ चा महाराष्ट्र केसरी..i

11 months ago | [YT] | 134

कुस्ती हेच जीवन kusti hech jivan

क्रीडा क्षेत्रातील अजरामर असणारे दोन युवराज..!

नमस्कार मंडळी,
क्रिकेट खेळात देशाला दोन वर्ल्डकप मिळवून देणारा युवराज सिग यांचा आज वाढदिवस. युवीने क्रिकेट विश्वात आपल्या चौफेर फटकेबाजीने अनेक वर्षे धुमाकूळ घालत अनेक विश्वविक्रम आपल्या नावी केले. पण या महान खेळाडूंच्या नावा पाठीमागे कुस्ती क्षेत्राचा खुप मोठा संबंध दडला आहे.
1980 च्या दशकामध्ये कुस्तीतील युवराज पाटील नावाचं वादळ संपूर्ण देशभर पसरलं होत. त्यावेळी त्यांच्या नावाचा डंका एवढा वाजला होता की एखाद्या सिनेमातल्या हिरोपेक्षाही युवराज पाटील यांचं ग्लॅमर, नाव मोठं होत. या गोष्टीला कारणही तसंच मोठं होत, 1978,82 व 1984 साली तीन वेळा महाबली सातपाल या मल्लास धूळ चारली. सातपालचा संपूर्ण हिंदुस्थानात दबदबा होता व या नावाजलेल्या मल्लास कोल्हापूरच्या युवराज पाटीलने पाणी पाजले.
यामुळे युवराज पाटील यांना देशभरात मोठी प्रसिद्धी मिळाली. कुस्तीतील युवराज प्रत्येक घरा घरात पोहचला.
१९८० ते १९९० च्या दशकात युवराज पाटील यांच्या नावा वरून लहान मुलांची नावे देखील 'युवराज' ठेवण्याची क्रेझ सुरू झाली. त्या काळात अनेक लोकांनी आपल्या मुलाचे नाव युवराज ठेवले आणि त्यामधीलच एका युवराजने क्रिकेट मध्ये देशाला २००७ व २०११ सालाचा विश्वकप मिळवून दिला.
बीबीसीवर एकदा युवराज सिग चे वडील योगराज सिंग यांची मुलाखत सुरू होती. त्यावेळी त्यांना युवराजच्या नामकरणाबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले होते की, ‘महाराष्ट्र में कोई ‘युवराज’ करके मल्ल है. उसने सतपाल को हराया था. उसका इतना नाम हुवा की, उसका नामही मैने अपने बेटे को दिया.’

आपल्याला ही बातमी आवडली असेल तर नक्की शेर करा.

धन्यवाद.
पैलवान रामदास देसाई.
संकल्पक- कुस्ती हेच जीवन
Mob no-8308845872
Whatsaap-8530858371

Yuvraj Singh Yuvraj Singh Fans Yuvraj Singh - The Stalwart Yuvraj Singh - The True Fighter Yuvraj Singh - The Fighter Yuvraj Singh FC Yuvraj Singh - The Champion Yuvraj Singh World Yuvraj Singh Fans Club Kerala

1 year ago | [YT] | 32

कुस्ती हेच जीवन kusti hech jivan

लाल मातीतील वाघ हरपला.

उदयमुख पैलवान विक्रम पारखी यांचे आकस्मित निधन..

Bhavpurn Shradhanjali

1 year ago | [YT] | 343