येत्या काळाची गरज आहे शेती, नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी आवश्यक आहे ट्रॅव्हलिंग,( शेती, बैलगाडा शर्यत, मुलाखत,गडकिल्ले,प्राचीन मंदिरे व ठिकाणे. )
या सर्वांच्या आर्थिक जोडीसाठी महत्वपूर्ण आहे. दूधव्यवसाय.या सर्वांन विषयी ATM vlogs च्या
माध्यमातून तुमच्या समोर थोडक्यात फायदेशीर माहिती मांडणार आहे. किमान 3/4 व्हिडिओ महिन्याला वेळ रात्री 9वाजता
त्यामुळं एका मराठी शेतकरी मुलाला पाठींबा अवश्य द्या धन्यवाद 🙏❤️
ATM Vlogs
उद्याच्या मैदानात नुसता धुराळा😍
नाथसाहेब प्रसन्न पै. मोहिल शेठ धुमाळ याचा घरचा साज बकासुर 6300,महाराज 6300,साम्राज्य 6300,बबन शेठ 6300 पुरंदर केसरी सासवड बैलगाडा मैदाना साठी सज्य💥💪🎇 #bakasur #मोहिलशेठ
1 month ago (edited) | [YT] | 10
View 0 replies
ATM Vlogs
तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल का पाटण तालुका दत्तमंदिर प्रवास भाग 2 आज सकाळी 8:30ला
हा व्हिडिओ पाटण तालुक्यातील एका आई आणि मुलाच्या दत्तभक्तीचा प्रेरणादायी प्रवास दाखवतो.
२५ वर्षांपासून ही आई निस्वार्थपणे दत्तसेवा करत आहे आणि तिच्या या भक्तीमार्गात
तिचा मुलगा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा आहे.
1 month ago | [YT] | 3
View 0 replies
ATM Vlogs
ही पिढ्यानु पिढ्या चालत आलेली परंपरा बघायला तुम्हाला आवडेल का ? ठीक आज रात्री ८:३० ला नक्की बघा 🙏
2 months ago | [YT] | 10
View 0 replies
ATM Vlogs
2 months ago | [YT] | 8
View 0 replies
ATM Vlogs
तुम्हाला ही मित्रानो हें बघायला आवडेल का? पडद्या मागच्या स्टोरी 😍
गावठी मॅटर ही यूटूब वेसिरीज आता पून्हा चालू झाली आहे गावठी मॅटर रिटन्स त्यामुळे त्यांच्या सेटला व टीम ला भेट देऊन त्यांची माहिती घेतली त्यात शूटिंग कुठे चालू आहे गावाकडच्या मुलाचे कष्ट व कलाकार काय काय करू शकतो व या वेबसिरीज मधला पडता काळ याची माहिती घेतली.
3 months ago | [YT] | 7
View 2 replies
ATM Vlogs
हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडेल का?
आज रात्री ठीक 8 वाजता
मोशी पुणे येथे उभारण्यात आलेला १४० फूट उंच हिंदुभूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
या व्हिडिओमध्ये:
Grand Statue of Chhatrapati Shivaji Maharaj
मोशी पुणे ची शान
शिवप्रेमी चा उत्साह आणि अभिमान
व्हिडिओ नक्की बघा
4 months ago | [YT] | 6
View 0 replies
ATM Vlogs
● पाटण तालुक्यातील "धारेश्वर दिवशी" ...
"जर कोणाला, 'काशीला जायला जमले नाही... तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र याच्या मध्यावर सातारा जिल्ह्यात पाटण जवळ एक ठिकाण आहे त्याला, प्रतिकाशी समजले जाते, तेथील दर्शन घेतले तर काशीला गेल्याचे पुण्य लाभते अशी वंदता आहे. त्या ठिकाणचे नाव, "श्री. क्षेत्र धारेश्वर "
धारेश्वर हे आता पर्यटन स्थळ म्हणून बऱ्यापैकी प्रसिद्ध होऊ लागले आहे, कारण आत्ता तिथे थेट देवस्थानापर्यंत रस्ता झाला आहे.
नवीन महाबळेश्वर चा जो सह्याद्रीचा दुर्गम पट्टा आहे त्या भागात हे ठिकाण आहे.
पाटण ते धारेश्वर हा मार्ग अतिशय निसर्गरम्य आहे. निसर्गाच्या कुशीत शिरणे ज्याला म्हणता येईल असा हा मार्ग. तुम्हाला जिथे 'शिव' वावरले अशा सह्याद्रीच्या माथ्यापर्यंत घेऊन जातो. हळू हळू आपण उंच महाबळेश्वर च्या उंचीला येऊन पोहचतो.
तिथून जरासा उतार लागतो, आणि सह्याद्री ला पोखरलेली गुहा लागते, साधारण १०० मीटर लांब आणि ५० मीटर रुंद . तिथे प्राचीन धारेश्वर देवस्थान वसलेले आहे. वरून बारमाही विरळ धबधबा वाहतो आणि आपण धबधब्याच्या आत असतो.
धारेश्वर ची आख्यायिका अशी, रावणाचा वध केल्यावर, रावण ज्याचा भक्त होता तो साक्षात, "शिवशंभू" याची दीक्षा घेण्यासाठी श्रीराम धारेश्वर येथे आले आणि दीक्षा प्राप्त केली. दीक्षा प्राप्त करताना श्री प्रभू रामचंद्रांनी स्वतःचे शीर शिवशंभूना अर्पण केले. श्रीरामाने रावणाचा वध, कपिलाषष्ठीला केला .. योगायोगाने नेहमी कपिलाषष्ठीला येथे जे श्रीरामाचे प्राचीन दगडी शीर आहे त्यातून एअर बबल असलेले पाणी गंगेच्या स्वरूपात बाहेर येते, एअर बबल जास्त असल्याने ते दुधाळ दिसते त्यामुळे त्याला दूध गंगा असे म्हणतात.
कपिलाषष्ठीला केला . योगायोगाने नेहमी कपिलाषष्ठीला येथे जे श्रीरामाचे प्राचीन दगडी शीर आहे त्यातून एअर बबल असलेले पाणी गंगेच्या स्वरूपात बाहेर येते, एअर बबल जास्त असल्याने ते दुधाळ दिसते त्यामुळे त्याला दूध गंगा असे म्हणतात.
येथे पडणारा बारमाही धबधब्याचा धारा जेव्हा कोकणातील राजापूर येथे गंगा येते तेव्हा या धारा कमी होतात असा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो . या धारामुळे त्वचा रोग नष्ट होतात व या पाण्याला शेवाळं धरण्याचे प्रमाण कमी आहे.
येथील शिवलिंग दरवर्षी एक तसू भर वर सरकते, पूर्वीची मूळ जागा व सध्याचे ठिकाण यात पाच फुटाचे अंतर आहे.
हे ठिकाण, जगातील जशी प्राचीन अमरनाथ सारखी श्री. शंकराची ठिकाणे आहेत तेवढेच प्राचीन आहे. याला सर्वप्रथम प्रसिद्धी, वीरशैव पंथाचे आदिगुरू श्री . आदिश्वर शिवाचार्य यांनी जगाला प्रथम करून दिली . सदर जागेचा ईतिहास सहाव्या शतकापर्यंत नोंदीस्वरूपात सापडला आहे. सध्याचे तिथे ३१ वे शैवपंथीय गुरु कार्यभार बघतात. अधून मधून येऊन जाऊन असतात.
पांडव काळात, येथे पांडवांनी अधिष्ठान व वास्तव्य केले असे तेथील सध्या वास्तव्य करून असलेले शिष्य माहिती देतात, त्यांच्याशी अजून थोडी ओळख काढली कि तिथे गुहे मध्ये एक गुहा आहे ती बघायला मिळते . तिथे एक भीम जी पंचारती पूजा करताना वापरायचा ती आहे. ती खरोखरच दोन हातानी धरली तर उचलता येत नाही. पूर्ण पितळी आहे. तेथील कोल्हापूर पर्यंत जाते असे म्हणतात. गुहा
धारेश्वर हे ठिकाण, मूल न होणाऱ्या जोडप्यांसाठी नवसाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. कपिलाषष्ठी आणि रामनवमी येथे मूल न होणारी जोडपी पहाटे ३ वाजता विशिष्ठ पूजा करतात आणि नंतर तिथे एक वाहता पाण्याचा स्रोत आहे त्यात हात घालतात, जर लिबू मिळाले तर मुलगा, बिब्बा मिळाला तर मुलगी आणि कोळसा मिळाला तर मूल होत नाही असे तेथील काही जमलेले ग्रामस्थ सांगतात व लोकांना अनुभव येतात असे सुद्धा म्हणतात.
धारेश्वर मंदिराच्या परिसरात हनुमंतरायाची एक मूर्ती, वीरगळी , सतीशिळा , अनेक देवांच्या मूर्ती, समाध्या.
पाटण तालुक्याला चालुक्यांच्या काळापासून इतिहास आहेत, श्रीमंत सरदार पाटणकर हे यातालुक्याचे शिवकाळापासुनचे देशमुख आहेत. धारेश्वर हे पाटणकरांचे आराध्य दैवत आहे हे आपल्याला धारेश्वर येथील श्रीराम, श्रीलक्ष्मण यांचे शिर तिथे आपल्याला पाटणकर यांच्या घराण्यातील व्यक्तींची नावाची शिलालेख( यशवंतराव बिन हिरोजीराव ) बघायला मिळतात.
5 months ago | [YT] | 5
View 0 replies
ATM Vlogs
आज सायंकाळी भगवान shiv ला समर्पित असे बहुलेश्वर हेमांडपंथी शैलीतील मंदिराचा व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळणार आहे आज 8:30/9:00रात्री व्हिडिओ आपल्या @ATMvlogs03 या चायनल वर येतोय
5 months ago | [YT] | 4
View 0 replies
ATM Vlogs
पाटण तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे हा चित्र शिला मध्ये कोरलेला प्राणी याचे नाव कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा माहिती मिळेना
5 months ago (edited) | [YT] | 10
View 0 replies
ATM Vlogs
पाटण तालुक्यातील मारुल गावामध्ये असलेले हे सिद्धेश्वर मंदिर चा vlog बघायला तुम्हाला आवडेल का? या मंदिरात साधारणता महाराष्ट्रातून 300 गाव सहभागी होऊन 2300 समई प्रजोलीत होत्यात @ATMvlogs03
श्रावण सफर भाग :2 😍 जय महाकाल
5 months ago | [YT] | 14
View 0 replies