Vaishali Deshpande

नमस्कार !
मी वैशाली.

आपलं हे चॅनल कुठल्याही एकाच विषयावर नसेल.
प्राणी-पक्षी, निसर्ग, प्रवास, घराचं व्यवस्थापन, साहित्य-कला, संगीत, नृत्य, माणसं, खाद्यपदार्थ असं सुचेल तसं आणि जे भावेल, आवडेल असं काहीही वेगवेगळं!

मी अजिबात टेक्नोसॅव्ही नाही. त्यामुळे माझ्याकडून चुका झाल्या तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये दुरुस्त करण्याचा मी प्रयत्न करीत राहीन.

चॅनल नक्की बघा. शेअर करा आणि हो... चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका...कारण यातूनच मला प्रोत्साहन मिळणार आहे.

धन्यवाद

Channel started on 22nd March 2020



Vaishali Deshpande

नमस्कार मी वैशाली,
खूपदा आपल्या फ्रीज मध्ये खूप सामान असते. बाजारात गेलो तर समोर खूप छान छान ताज्या भाज्या डोळ्यांना दिसतात. त्या ताज्या भाज्या लगेच घ्यायचा विचार मनात येतो आणि आठवतो आपला फ्रीज. लगेच त्यातल्या थोड्या थोड्या शिल्लक राहिलेल्या भाज्या डोळ्यासमोर येतात. मग कितीही इच्छा झाली तरी त्या ताज्या भाज्या न घेता घरी येतो. पण आज आपण अशा थोड्या भाज्या जेव्हा शिल्लक राहतात तेव्हा काय करायचे, त्या भाज्या वापरून आपण पौष्टिक पदार्थ कसा बनवू शकतो ते बघणार आहोत.

https://youtu.be/X3qxCECTyoc

1 year ago (edited) | [YT] | 28

Vaishali Deshpande

नमस्कार मी वैशाली,
मुलं छोटी असतात तेव्हा प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलांनी भाज्या खाल्ल्या पाहिजेत. त्यासाठी अनेकदा घरोघरी आई, बाबा वेगवेगळे प्रयोग करून पदार्थ बनवत असतात. कधी ते मुलांना आवडतात तर कधी मुलं नाक मुरडतात. आमची मुलं लहान असताना आमच्याही घरात असे हे प्रयोग सतत सुरू असायचे. त्यासाठी माझी जाऊ मेधा हिने एक भन्नाट आयडिया काढली होती. मुलांचा आवडता पिझ्झा आम्ही अशा वेगवेगळ्या भाज्यांनी करायचो. आश्चर्य म्हणजे मुलंही असा हा पिझ्झा आवडीने खायची आणि आता मुलं मोठी झाली तरीही तितक्याच आवडीने अशाच भाज्यांचा पिझ्झा आजही आमच्या घरी आवडीने खाल्ला जातो. तर असा हा भरपूर भाज्या घातलेला पिझ्झा कसा बनवायचा ते सांगणारा हा व्हिडिओ.

https://youtu.be/XNe7BXfCmkI

1 year ago | [YT] | 10

Vaishali Deshpande

स्वयंपाक करताना काही प्रयोग आपण करतो आणि ते प्रयोग घरात सर्वांना आवडतात तेव्हा हुरूप येतो. आजचा प्रयोग पण असाच ...

मखाणा बदाम हलवा

एकदम साधी सोपी कुणालाही करता येईल अशी रेसिपी.

https://youtu.be/ZNAgMNo-RmU

2 years ago | [YT] | 47

Vaishali Deshpande

https://youtu.be/sNsjMf8veDs

पालक पुलाव :
कमीत कमी मसाल्यात, झट की पट होणारा, नेहमीच्या पुलाव, बिर्याणी यांना एक वेगळा पर्याय देणारा भाताचा हा एक वेगळा प्रकार म्हणजे पालक पुलाव.

https://youtu.be/sNsjMf8veDs

2 years ago | [YT] | 88

Vaishali Deshpande

https://youtu.be/9lrfNfvcLXo

अळूवडी, कोबी वडी, पालक वडी अशा विविध प्रकारच्या वड्या आपण नेहमीच करतो. पण आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या वड्या बनवणार आहोत. या आहेत लाल माठाच्या वड्या. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीच्या, वेगळ्या पिठाच्या, कमीत कमी तेलात होणाऱ्या आणि वेगळ्या भाजीच्या वड्या.

2 years ago | [YT] | 42

Vaishali Deshpande

नको गूळ, नको साखर, ३ चमचे तुपात गव्हाच्या पिठाचे लाडू

https://youtu.be/EOxGoUPM1-U

2 years ago | [YT] | 75

Vaishali Deshpande

सध्या मला कमेंट्स मध्ये एक प्रश्न सतत विचारला जातोय. दोन्ही आज्या म्हणजे माझी आई आणि माझ्या सासूबाई कशा आहेत ? तुम्ही दाखवत असलेल्या या आपुलकीबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
दोघीही मस्त मजेत आहेत. दोघींच्या सोबत लवकरच व्हिडिओज अपलोड होणार आहेत.
सुमन आजीच्या दिवसाची सुरूवात नियमित व्यायामाने होत आहे. घराजवळ असलेल्या टेकडीवर नातवंडं आणि आजी अधेमधे फिरायला जात आहे. तुमच्या सर्वांचे आजी आजोबा कसे आहेत ?

https://youtu.be/d48xrj-u_d0

2 years ago | [YT] | 204

Vaishali Deshpande

नमस्कार मी वैशाली
आपले यूट्युब व्हिडिओज आता आपण अजून एका नवीन प्लॅटफॉर्मवर अपलोड करणार आहोत. हा नवीन प्लॅटफॉर्म आहे फेसबुक पेज आणि आपल्या या फेसबुक पेज चे नाव असणार आहे ...

Vaishali Deshpande Recipes

तुम्ही फेसबुक वापरत असाल तर कृपया आपल्या या नवीन पेजला फॉलो करा. Vaishali Deshpande Recipes या पेज ची लिंक खाली देत आहे.

www.facebook.com/VaishaliDeshpandeRecipes?mibextid…

2 years ago | [YT] | 72

Vaishali Deshpande

नमस्कार मी वैशाली
माझी आई कोकणातली तर सासूबाई विदर्भातल्या.
८८ वर्षांच्या माझ्या आईसोबत 'भाजणीची मोकळ' या पदार्थाचा व्हिडिओ तयार केला होता तर ८२ वर्षांच्या माझ्या सासूबाई यांच्यासोबत 'उकडपेंडी' हा एक पदार्थ तयार केला होता. हे दोन्हीही व्हिडिओ आपल्या चॅनल वर आपण अपलोड केले होते. या दोन्हीही पदार्थां मधून मी एक नवीन पदार्थ तयार केलेला आहे. म्हणजेच सासर आणि माहेर यांच्या संगमातून हा पदार्थ तयार झालेला आहे. हा पदार्थ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर कृपया क्लिक करा.

https://youtu.be/7Wo52E-5RpI

2 years ago (edited) | [YT] | 45