Official YouTube channel of the Nationalist Congress Party (NCP) led by Shri Ajit Pawar, current Deputy Chief Minister of Maharashtra.
We are dedicated to empowering women, youth, and marginalized communities through inclusive welfare schemes and policies. Our mission is to foster overall development that takes everyone forward, together. Join us as we share inspiring stories, impactful initiatives, and updates on our efforts to create a more equitable society.
From community outreach programs to policy discussions, we aim to engage and inform our supporters and the public about our pro-people initiatives. Subscribe to stay updated on our journey toward a brighter future for all!
#NationalistCongressParty #NCP #ncpspeaksofficial #ajitpawar #जनसन्मान_यात्रा #ncpjansanmanrally
NCPSpeaks (NCP)
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक ५२ लाडक्या बहिणींना उमेदवारी देऊन मा. अजितदादांनी महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. जिथे सन्मान आहे, तिथेच खरी प्रगती आहे. म्हणून यंदा १५ जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीत साथ फक्त आपल्या अजितदादांना अन् मत ‘घड्याळा’ला!
#AjitPawar #NCP #Maharashtra
1 week ago | [YT] | 19
View 1 reply
NCPSpeaks (NCP)
आपल्या राष्ट्रवादी–महायुती सरकारने राज्यातील शैक्षणिक सहली अधिक सुखद, सुरक्षित आणि पालकांसाठी दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलींसाठी आवश्यक ते प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचा शैक्षणिक अनुभव अधिक समृद्ध होईल.
#NCP #Maharashtra #MahayutiSarkar
1 month ago | [YT] | 1
View 0 replies
NCPSpeaks (NCP)
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील आष्टी–पाटोदा–शिरूर मतदारसंघाचे माजी आमदार श्री. भीमराव धोंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह पक्षात जाहीर प्रवेश केला. याशिवाय जळगाव, बीड, जालना, वाशीम, पालघर जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मा. अजितदादांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने नवप्रेवशितांना आणि उपस्थितांना संबोधित करत मा. अजितदादांनी 'आपला पक्ष हा शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेने पुढे जाणारा आणि जनतेच्या प्रश्नांवर काम करणारा आहे. कार्यकर्ता हाच खरा पक्षाचा कणा असतो. जे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत, त्या सर्वांना सन्मानाने वागवले जाईल, त्यांना बळ दिले जाईल, असा विश्वास दिला.
तसेच आपले राष्ट्रवादी-महायुती सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. ऊस तोड कामगारांसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने महामंडळ स्थापन केले आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच आपल्या मुला-मुलींना दर्जेदार शिक्षणासह कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचे शिक्षण आणि येणाऱ्या काळात वेगवेगळ्या भागात मुलांसाठी वसतिगृह उभारण्यात येणार, असा विश्वास मा. अजितदादांनी दिला.
याप्रसंगी माजी मंत्री आ. श्री. धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व कोषाध्यक्ष मा. आ. श्री. शिवाजीराव गर्जे, संघटन महासचिव श्री. संजय खोडके, आ. विजयसिंह पंडित, आ. बाळासाहेब आजबे, श्री. कल्याण आखाडे, श्री. सुरज चव्हाण, कु. संध्या सोनवणे यांच्यासह पक्षाचे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
NCPSpeaks (NCP)
येत्या २३ नोव्हेंबर व त्यानंतर ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद संचलित टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या तयारीसाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने मोफत ऑनलाईन मार्गदर्शन शिबिर राबवण्यात येत आहे.
यामार्फत परिक्षार्थी उमेदवारांना निःशुल्क स्वरूपात तज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त होणार असून, परीक्षा प्रक्रियेबाबत सजगता व सक्षमता निर्माण होणार आहे. टीईटी परीक्षार्थींनी अवश्य ह्या संधीचा लाभ घ्यावा!
2 months ago | [YT] | 3
View 0 replies
NCPSpeaks (NCP)
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे राज्याचे सहकार मंत्री मा. ना. श्री. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते, आमदार श्री. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान विश्वशांती बुद्धविहार परिसरात शिल्पाकृती व गार्डन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर किडो वंडरलँड आणि पार्क या विकासकामांचे भूमिपूजनही पार पडले.
यावेळी मा. बाबासाहेब पाटील यांनी उपस्थितांना संबोधित करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे स्मारक संघर्षाचे प्रतीक, स्वाभिमानाचा आवाज आणि त्यांच्या विचारांचे जिवंत प्रतीक ठरणार असून समाजाला अधिक प्रगत, जागरूक आणि समतेच्या मार्गावर चालणारे प्रेरणास्थळ बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी राज्यमंत्री मा. श्री. इंद्रनील नाईक, आमदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार श्री. अमोल मिटकरी, आमदार श्री. संजय बनसोडे, माजी आमदार श्री. गोविंदराव अण्णा केंद्रे, श्री. भदंत उपगुप्त महाथेरो, श्री. दयानंद थेरो, श्री. जोगेंद्रजी कवाडे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#NCP #maharashtra #bhimraoambedkar #udgir
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
NCPSpeaks (NCP)
आज यवतमाळ येथील समता मैदानावर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध पक्षातील आणि संघटनांमधील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
या कार्यक्रमात यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रविणभाऊ देशमुख, मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष श्री. साहेबराव जुनघरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. अरुणभाऊ राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस (शप गट) चे कोषाध्यक्ष श्री. सतीश भोयर, जिल्हा स्वयंरोजगार समितीचे अध्यक्ष श्री. सुनील भेले, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सौ. नंदिनीताई दरणे, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे संचालक श्री. आनंदराव जगताप यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, बाबुळगाव, राळेगावसह अनेक भागातील अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले.
याप्रसंगी मा. श्री. अजितदादा पवार यांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत करून त्यांना पक्षाची विचारधारा, कार्यपद्धती आणि सुसंस्कृत समाजकारणाची वाटचाल याबाबत मार्गदर्शन केले तसेच आगामी राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांनी राज्यभर झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे नमूद करत, राष्ट्रवादी-महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांना तातडीने मदत पुरवली जात असल्याचे सांगितले. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शक्य त्या ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेतली जातील, असे जाहीर केले. युवकांना आधुनिक आणि प्रगतशील शेतीच्या दिशेने प्रशिक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या भव्य पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने, पूर्ण ताकदीने कामाला लागावे, असे आवाहनही मा. अजितदादांनी उपस्थितांना केले.
या कार्यक्रमाला राज्याचे राज्यमंत्री मा. ना. श्री. इंद्रनील नाईक, आमदार श्री. अमोल मिटकरी, विधान परिषदेचे आमदार श्री. संजयजी खोडके यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#NCP #Maharashtra #Yavatmal
2 months ago | [YT] | 3
View 0 replies
NCPSpeaks (NCP)
आज नांदेड जिल्ह्यात उमरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. शिरीष देशमुख गोरठेकर आणि कैलास देशमुख गोरठेकर यांच्यासह सुमारे १५०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी मा. श्री. अजितदादा पवार यांनी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत केले. तसेच पक्षाची विचारधारा, कार्यपद्धती आणि सुसंस्कृत समाजकारणाची वाटचाल याबाबत नव्याने पक्षात सामील आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा. अजितदादांनी उपस्थितांशी संवाद साधत, अप्पर पैनगंगा कालव्याचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. तसेच युवकांना आधुनिक व प्रगतशील शेतीसाठी प्रशिक्षण देण्यास आपल सरकार कटिबद्ध असून, आजच्या या पक्षप्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच पक्षात जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल तसेच नवीन कार्यकर्त्यांनाही योग्य सन्मान दिला जाईल याची खात्री देण्यात आली. यावेळी पक्षाचे पक्षाचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक, आमदार श्री. प्रतापराव चिखलीकर यांच्यासह पदाधिकारी, स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2 months ago | [YT] | 7
View 0 replies
NCPSpeaks (NCP)
जनसंवादातून प्राधान्य जनसामान्यांच्या हिताला, सन्मानाला आणि कल्याणाला!
आज चिंचवड विधानसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार यांच्या 'जनसंवाद' कार्यक्रमातून नागरिकांच्या अडी-अडचणी, समस्या आणि प्रलंबित मागण्या जाणून घेण्यात येत आहेत. यासंदर्भात स्वतः मा. उपमुख्यमंत्री महोदय नागरिकांच्या प्रश्नांची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन, त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना करत आहेत.
#जनसंवाद #NCP #Chinchwad
2 months ago | [YT] | 8
View 0 replies
NCPSpeaks (NCP)
जनसामान्यांच्या प्रश्नांना विश्वासार्ह व्यासपीठ देणारा मा. अजितदादांचा जनसंवाद!
📍खडकवासला
@ajitpawarspeaks
#जनसंवाद
3 months ago | [YT] | 3
View 0 replies
NCPSpeaks (NCP)
आजच्या राष्ट्रवादी परिवार मिलन कार्यक्रमाचा श्रीगणेशा मा. दादांच्या आपुलकीपूर्ण स्वागताने!
📍खडकवासला
#राष्ट्रवादी_परिवार_मिलन
3 months ago | [YT] | 3
View 0 replies
Load more