Official YouTube channel of the Nationalist Congress Party (NCP) led by Shri Ajit Pawar, current Deputy Chief Minister of Maharashtra.
We are dedicated to empowering women, youth, and marginalized communities through inclusive welfare schemes and policies. Our mission is to foster overall development that takes everyone forward, together. Join us as we share inspiring stories, impactful initiatives, and updates on our efforts to create a more equitable society.
From community outreach programs to policy discussions, we aim to engage and inform our supporters and the public about our pro-people initiatives. Subscribe to stay updated on our journey toward a brighter future for all!
#NationalistCongressParty #NCP #ncpspeaksofficial #ajitpawar #जनसन्मान_यात्रा #ncpjansanmanrally
NCPSpeaks (NCP)
मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय कर्मचारी महिलांची गर्दीतील प्रवासाची समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रवादी-महायुती सरकारचे ‘कम अर्ली-गो अर्ली’ धोरण!
#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२६
#BudgetSession2026
1 month ago | [YT] | 539
View 28 replies
NCPSpeaks (NCP)
आज विधान भवन येथे श्री. पार्थदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभा खासदार निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. श्रीम. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. खा. श्री. प्रफुलजी पटेल, प्रदेशाध्यक्ष मा. खा. श्री. सुनीलजी तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री मा. श्री. छगन भुजबळ यांच्यासह पक्षाचे राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा व विधानपरिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. पार्थदादा पवार यांनी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.
1 month ago | [YT] | 624
View 38 replies
NCPSpeaks (NCP)
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी परिवाराचे प्रमुख मा. अजितदादा पवार यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित शोकसभा आज अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडली. सभागृहात प्रत्येकाच्या मनात त्यांच्या कार्याची, त्यांच्या जिव्हाळ्याच्या स्वभावाची आणि राज्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांची आठवण दाटून आली होती.
याप्रसंगी राजकीय, उद्योग, शैक्षणिक, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर, सहकारी, कार्यकर्ते आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजितदादांबरोबरच्या आपल्या वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या नेतृत्वातील कणखरपणा, निर्णयक्षम वृत्ती आणि जनतेप्रती असलेली अपार बांधिलकी यांचा उल्लेख करत अनेकांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. राज्याच्या विकासासाठी दिवस-रात्र झटणारा, बारामतीपासून ते संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीचा ध्यास घेतलेला एक जननेता आपण गमावल्याची जाणीव प्रत्येकाच्या शब्दांतून व्यक्त झाली.
मा. अजितदादांनी घालून दिलेला विकासाचा मार्ग, कामाची शिस्त आणि जनतेशी असलेली नाळ ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठेवा आहे. त्यांच्या स्मृती केवळ आठवणीत नाहीत, तर राज्याच्या प्रत्येक प्रगतीपथावर त्या जिवंत राहतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी संपूर्ण राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने लोकनेते मा. अजितदादा पवार यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहण्यात आली.
📍वरळी, मुंबई
1 month ago | [YT] | 288
View 4 replies
NCPSpeaks (NCP)
रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेस राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीम. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी भेट दिली. यावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या हस्ते स्व. गोविंदराव निकम साहेब यांच्या ‘स्मृतिगंध’ स्मारकाच्या उद्घाटनावेळी संस्थेच्या परिसरात लावण्यात आलेले सुरंगीचे झाड मोठे झालेले पाहून उपस्थितांना आदरणीय अजितदादांच्या कर्तव्यनिष्ठेची आठवण होत अभिमान वाटला. वृक्षारोपणाच्या कृतीतून आदरणीय दादांची समाजसेवेची तळमळ दिसून येते. आदरणीय दादांच्या स्मृतीस्मरणार्थ या झाडाजवळ शिल्प उभारण्यात येणार आहे. यातून पुढील पिढ्यांनाही वृक्षारोपण आणि पर्यावरण जपण्याची प्रेरणा मिळेल.
1 month ago | [YT] | 26
View 0 replies
NCPSpeaks (NCP)
आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला येथे मराठा सेवा संघ आयोजित कार्यक्रमात राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.श्रीम.सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी महाराजांना मनोभावे अभिवादन केले. तसेच, स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या चरणी नतमस्तक झाल्या.
मा.उपमुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी संबोधित करताना, शिवरायांनी कायमच शौर्य, पराक्रम आणि जनकल्याणाची प्रेरणा दिली आहे. ज्यावेळी मी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर आईसाहेब जिजाऊ होत्या. राजमाता जिजाऊ यांनी मावळ्यांना दिलेली शपथ आठवली. आपणही मावळा बनून स्वराज्याचा, सुशासनाचा विचार पुढे नेऊया, असे आवाहन मा.उपमुख्यमंत्र्यांनी केले.
दरवर्षी आदरणीय अजितदादा या सोहळ्यास उपस्थित असायचे. शिवनेरीचा वारसा जपण्यासाठी त्यांनी नेहमी प्रयत्न केले. त्यांच्या उपस्थितीत शिवनेरी आराखडा तयार झाला. आदरणीय अजितदादांनी ज्याप्रमाणे काम केले त्याच प्रमाणे मीदेखील करीन, असा विश्वास यावेळी मा. उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, मंत्री श्री. आशिष शेलार, अभिनेते श्री. रितेश देशमुख, आमदार श्री. शरद सोनवणे तसेच मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व शिवभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते.
1 month ago | [YT] | 1,475
View 5 replies
NCPSpeaks (NCP)
आज मा. श्रीम. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. आदरणीय अजितदादांच्या प्रतिमेस अभिवादन करत त्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मा. सुनेत्रावहिनी पवार यांनी मा. अजितदादांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला होता, तोच मार्गदर्शक दीपस्तंभ मानून कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
तसेच दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच प्राथमिकता राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आदरणीय अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन, असे वचन त्यांनी यावेळी महाराष्ट्राच्या जनतेला दिले.
याप्रसंगी, पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. प्रफुलजी पटेल, प्रदेशाध्यक्ष श्री. सुनीलजी तटकरे, श्री. पार्थदादा पवार, सौ. रुपाली चाकणकर, श्री. छगन भुजबळ, श्री. हसन मुश्रीफ, श्री. नरहरी झिरवाळ, श्री. बाबासाहेब पाटील, कु. आदिती तटकरे यांच्यासह पक्षाचे मान्यवर नेते, विधीमंडळातील सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
1 month ago | [YT] | 60
View 4 replies
NCPSpeaks (NCP)
आज दादर येथे चैत्यभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीम. सुनेत्रावहिनी पवार यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समताधिष्ठित विचारांचे व लोककेंद्रित कार्याचे स्मरण करून, त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. प्रफुलजी पटेल, प्रदेशाध्यक्ष श्री. सुनीलजी तटकरे व श्री. पार्थदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादी परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
1 month ago | [YT] | 7
View 4 replies
NCPSpeaks (NCP)
आज मुंबईतील प्रभादेवी येथे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. श्रीम. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. प्रफुलजी पटेल, प्रदेशाध्यक्ष श्री. सुनीलजी तटकरे व श्री. पार्थदादा पवार यांच्यासह राष्ट्रवादी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
1 month ago | [YT] | 38
View 3 replies
NCPSpeaks (NCP)
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री, विकासपुरुष आदरणीय अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासंदर्भात ज्येष्ठ नेते श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, सौ. प्रतिभा पवार, श्री. श्रीनिवास पवार, श्री. राजेंद्र पवार, कु. पार्थदादा पवार, आमदार श्री. रोहितदादा पवार, श्री. जयदादा पवार व विद्या प्रतिष्ठान संचालक मंडळ यांनी सविस्तर चर्चा केली.
बारामतीचे सुपुत्र, महाराष्ट्राचे विकासपुरुष आदरणीय अजितदादा पवार यांच्या उत्तुंग कार्याला व व्यक्तिमत्त्वाला कृतज्ञतापूर्वक मानवंदना म्हणून त्यांच्या जन्मभूमीत साजेसा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात यावा, अशी दृढ जनभावना होती, त्यातूनच ही कल्पना आकार घेत आहे. हा पूर्णाकृती पुतळा, आगामी काळात सदैव आदरणीय अजितदादांच्या जनसमर्पक कार्याची साक्ष व प्रेरणा येणाऱ्या पिढ्यांना देत राहील, असा ठाम विश्वास आहे.
1 month ago | [YT] | 30
View 3 replies
NCPSpeaks (NCP)
डोळ्यांत अश्रू, मनात वेदना आणि ओठांवर एकच नाव… आदरणीय अजितदादा पवार!
आज पवनानगर येथे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे विधीवत पूजन करून राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ज्यांच्या एका शब्दासाठी मावळचा कार्यकर्ता जीवाचे रान करायचा, अशा लाडक्या लोकनेत्याच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड जनसागर यावेळी उपस्थित राहिला होता.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा दिला. दादांचे जाणे हे केवळ राजकीय नुकसान नसून, सर्वसामान्य जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांचा आधार हरपला आहे. अजितदादा हे विकासाची दूरदृष्टी असलेलं नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने पवना मावळमधील प्रत्येक नागरिक पोरका झाला असल्याची भावना व्यक्त करत अनेकांनी दादांना श्रद्धांजली वाहिली.
आजच्या शोकसभेला जमलेली ही अफाट गर्दी म्हणजे दादांनी आयुष्यभर कमावलेल्या माणसांची संख्या आणि त्यांच्यावर जनतेने ठेवलेल्या अढळ विश्वासाची साक्ष असल्याची भावना यावेळी पक्षाचे मावळ मतदारसंघाचे आमदार श्री. सुनील शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
1 month ago | [YT] | 14
View 2 replies
Load more