राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिन! संवादाचे बंध अधिक दृढ करणाऱ्या सर्व टपाल कर्मचारी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
काळ बदलला, संवादाची साधने बदलली; मात्र विश्वासाने आणि जबाबदारीने सेवा देण्याची टपाल विभागाची परंपरा आजही कायम आहे. या विश्वासाला जपण्यात टपाल कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
रुग्णसेवेतून राष्ट्रसेवेचे पवित्र व्रत जपणाऱ्या तमाम डॉक्टरांच्या समर्पित सेवेला मनःपूर्वक सलाम! राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा!
ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावाच्या बळावर रुग्णांना नवजीवन देणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांचे योगदान समाजासाठी अनमोल आहे. आरोग्यसेवेसाठी त्यांचे समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि मानवतेप्रती असलेली बांधिलकी सदैव प्रेरणादायी आहे.
अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला 'कृषीदिना'च्या हार्दिक शुभेच्छा!
राज्यातील कृषिक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
मातीत घाम गाळून जगाच्या अन्नाची गरज भागविणारा बळीराजा हा देशाच्या प्रगतीचा खरा आधारस्तंभ आहे. शेतकऱ्यांच्या कष्ट, जिद्द आणि समर्पणामुळेच अन्नसुरक्षा अबाधित राहिली आहे. समृद्ध, शाश्वत आणि आधुनिक कृषी व्यवस्थेच्या उभारणीसाठी कृषीदिन हा नवा संकल्प आणि नवी प्रेरणा देणारा दिवस ठरो.
मतदारसंघातील विविध भागांना भेट देत मुलगा जयदत्त यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच विविध सामाजिक उपक्रम व विकासकामांचा आढावा घेत स्थानिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी केल्या.
📍 शिरूर कासार शिरूर कासार येथील नगरसेवक श्री. भीमराव गायकवाड हे आजारी असल्याने त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
📍 आनंदगाव, ता. शिरूर आनंदगाव, ता. शिरूर येथील सरपंच श्री. सोमीनाथ विघ्ने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी गावातील विविध विषयांवर चर्चा करत ग्रामस्थांशी संवाद साधला.
📍 शिरूर कासार शिरूर कासार येथील संपर्क कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेत संबंधित विषयांचा आढावा घेतला. नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
📍 शेरी बु.आष्टी शेरी बु. येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. नवीन अंगणवाडी इमारतीमुळे बालकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री. संदीप साहेब खाकाळ, श्री. दीपक दादा सोनवणे, विद्यार्थी, शिक्षकवृंद, ग्रामस्थ तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍 मोरेश्वर लॉन्स, नगर–बीड हायवे, आष्टी 🗓️ दि. २८ जून २०२६
आज आष्टी तालुका सहकारी दूध संघ व प्रोग्रेसिव्ह ब्रीडर फार्मर्स असोसिएशन (PBFA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'फायदेशीर दूध व्यवसाय' या विषयावरील दूध उत्पादक मार्गदर्शक शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्यास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलो. प्रमुख मार्गदर्शक डॉ. शैलेश मदने (आंतरराष्ट्रीय विक्री व्यवस्थापक, Advance Enzyme Technology Ltd., मुंबई) यांनी आधुनिक दुग्ध व्यवसाय, मुरघास व्यवस्थापन, पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, योग्य आहार, प्रजनन व्यवस्थापन व शास्त्रशुद्ध गोठा व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर आणि शाश्वत करण्यासाठी उच्च उत्पादनक्षम जातिवंत गाई, वैज्ञानिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. उपेंद्र मुंडे (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन तथा तालुका पशुसंवर्धन अधिकारी, आष्टी), श्री. संजय सालुगडे पाटील (अध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह ब्रीडर फार्मर्स असोसिएशन) यांच्यासह राज्यातील विविध भागांतील प्रगतशील दूध उत्पादक श्री. रामनाथ वदक (संगमनेर), श्री. गजानन शेवाळे (धाराशिव), श्री. हरिश येडे (पुणे), श्री. निलेश दहें (कोपरगाव), श्री. बाबासाहेब पवार, श्री. माऊली भिलारे (सातारा), श्री. अशोक हाके (पुणे), श्री. महादेव धुगे (हिंगोली), श्री. वामन गायकवाड (सोलापूर), श्री. रवी हासे (संगमनेर), श्री. संतोष पाटील (चिलेवाडी, सातारा), श्री. जयराम खपके (राहुरी), श्री. जयवंत ताकते (राहुरी), डॉ. चंदन संभेराव (आळेफाटा), श्री. प्रतीक डोखे (कोल्हार), श्री. माणिक पांडे (अकोले) तसेच श्रद्धा ढवण (पारनेर) उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेतीसोबत दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, स्वाभिमान आणि रोजगाराचे प्रभावी माध्यम ठरू शकतो. आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा अवलंब केल्यास दूध व्यवसाय अधिक फायदेशीर व शाश्वत होईल. डॉ. शैलेश मदने यांच्यासारख्या तज्ज्ञांचे अनुभव आणि मार्गदर्शन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नियमित मार्गदर्शन करावे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, प्रगतशील दूध उत्पादक, पदाधिकारी व शेतकरी बांधवांशी संवाद साधत दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ‘मन की बात’ या १३५व्या भागाचे नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत निवासस्थानी श्रवण केले.
या संवादात्मक कार्यक्रमामध्ये देशातील विविध भागांतील प्रेरणादायी उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागातून घडणारे सकारात्मक बदल यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बहादूरपुरा येथील पैठकर कुटुंबाने विवाह सोहळ्याचे औचित्य साधून गावातील नागरिकांना अपघात विमा संरक्षण देत राबविलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
तसेच आत्मनिर्भर भारत, राष्ट्रीय सुरक्षा, ‘मेड इन इंडिया’ उपक्रम, युवकांसाठी नव्या संधी आणि विज्ञाननिष्ठ समाजनिर्मिती यासंबंधी मार्गदर्शनपर विचार मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशवासीयांशी संवादातून मांडले.
Suresh Dhas
विधिमंडळातील सहकारी, औसा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. अभिमन्यूजी पवार यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपणांस निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी जीवन लाभो तसेच समाजसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी अखंड आशीर्वाद लाभोत, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
#अभिमन्यू_पवार #Abhimanyu_Pawar #औसा #BJP
#happybirthday
7 hours ago | [YT] | 4
View 0 replies
Suresh Dhas
राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिन!
संवादाचे बंध अधिक दृढ करणाऱ्या सर्व टपाल कर्मचारी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
काळ बदलला, संवादाची साधने बदलली; मात्र विश्वासाने आणि जबाबदारीने सेवा देण्याची टपाल विभागाची परंपरा आजही कायम आहे. या विश्वासाला जपण्यात टपाल कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
#राष्ट्रीय_टपाल_कर्मचारी_दिन
#NationalPostalWorkerDay #टपाल_कर्मचारी #भारतीय_टपाल #IndiaPost
9 hours ago | [YT] | 4
View 0 replies
Suresh Dhas
रुग्णसेवेतून राष्ट्रसेवेचे पवित्र व्रत जपणाऱ्या तमाम डॉक्टरांच्या समर्पित सेवेला मनःपूर्वक सलाम!
राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा!
ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावाच्या बळावर रुग्णांना नवजीवन देणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांचे योगदान समाजासाठी अनमोल आहे. आरोग्यसेवेसाठी त्यांचे समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि मानवतेप्रती असलेली बांधिलकी सदैव प्रेरणादायी आहे.
#NationalDoctorsDay #राष्ट्रीय_डॉक्टर्स_दिन #DoctorsDay #आरोग्यसेवा #Healthcare #Doctors
9 hours ago | [YT] | 2
View 0 replies
Suresh Dhas
अवघ्या जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाला 'कृषीदिना'च्या हार्दिक शुभेच्छा!
राज्यातील कृषिक्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
मातीत घाम गाळून जगाच्या अन्नाची गरज भागविणारा बळीराजा हा देशाच्या प्रगतीचा खरा आधारस्तंभ आहे. शेतकऱ्यांच्या कष्ट, जिद्द आणि समर्पणामुळेच अन्नसुरक्षा अबाधित राहिली आहे. समृद्ध, शाश्वत आणि आधुनिक कृषी व्यवस्थेच्या उभारणीसाठी कृषीदिन हा नवा संकल्प आणि नवी प्रेरणा देणारा दिवस ठरो.
#कृषीदिन #महाराष्ट्र_कृषीदिन #बळीराजा #शेतकरी
#वसंतराव_नाईक #जयंती
9 hours ago | [YT] | 3
View 0 replies
Suresh Dhas
संघर्षशील नेते, शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्व. विनायकरावजी मेटे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
मराठा समाजाच्या उन्नतीसाठी आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे स्व. विनायकरावजी मेटे यांचे कार्य व योगदान सदैव स्मरणात राहील.
#जयंती #विनम्रअभिवादन #विनायकरावजीमेटे
1 day ago | [YT] | 18
View 1 reply
Suresh Dhas
मतदारसंघातील विविध भागांना भेट देत मुलगा जयदत्त यांनी नागरिकांशी संवाद साधला तसेच विविध सामाजिक उपक्रम व विकासकामांचा आढावा घेत स्थानिकांशी प्रत्यक्ष भेटीगाठी केल्या.
📍 शिरूर कासार
शिरूर कासार येथील नगरसेवक श्री. भीमराव गायकवाड हे आजारी असल्याने त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
📍 आनंदगाव, ता. शिरूर
आनंदगाव, ता. शिरूर येथील सरपंच श्री. सोमीनाथ विघ्ने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी गावातील विविध विषयांवर चर्चा करत ग्रामस्थांशी संवाद साधला.
📍 शिरूर कासार
शिरूर कासार येथील संपर्क कार्यालयात आलेल्या नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी जाणून घेत संबंधित विषयांचा आढावा घेतला. नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
📍 शेरी बु.आष्टी
शेरी बु. येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले. नवीन अंगणवाडी इमारतीमुळे बालकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री. संदीप साहेब खाकाळ, श्री. दीपक दादा सोनवणे, विद्यार्थी, शिक्षकवृंद, ग्रामस्थ तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#जनसंवाद #जनसेवा #लोकहित #विकास #विकासकामे #नागरिकसंवाद #SureshDhas
1 day ago | [YT] | 14
View 0 replies
Suresh Dhas
जाति न पुछो साधू की, पुछ लिजीये ज्ञान |
मोल करो तलवार का, पडा रहन दो म्यान ||
संत कबीर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन.
समता, मानवता आणि विवेकाची शिकवण देणारे संत कबीर यांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देतात.
#संतकबीर #jayanti #विनम्रअभिवादन
2 days ago | [YT] | 5
View 0 replies
Suresh Dhas
सावित्रीच्या अढळ निष्ठेचा आणि वटवृक्षाच्या पवित्रतेचा संदेश देणारा हा मंगल सण.
वटपौर्णिमेनिमित्त सर्व माता-भगिनींना मंगलमय शुभेच्छा!
सर्वांना अखंड सौभाग्य, कौटुंबिक ऐक्य आणि सुख-समृद्धी लाभो!
#वटपौर्णिमा #vatpornima #शुभेच्छा
2 days ago | [YT] | 11
View 0 replies
Suresh Dhas
📍 मोरेश्वर लॉन्स, नगर–बीड हायवे, आष्टी
🗓️ दि. २८ जून २०२६
आज आष्टी तालुका सहकारी दूध संघ व प्रोग्रेसिव्ह ब्रीडर फार्मर्स असोसिएशन (PBFA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'फायदेशीर दूध व्यवसाय' या विषयावरील दूध उत्पादक मार्गदर्शक शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्यास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलो. प्रमुख मार्गदर्शक डॉ. शैलेश मदने (आंतरराष्ट्रीय विक्री व्यवस्थापक, Advance Enzyme Technology Ltd., मुंबई) यांनी आधुनिक दुग्ध व्यवसाय, मुरघास व्यवस्थापन, पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, योग्य आहार, प्रजनन व्यवस्थापन व शास्त्रशुद्ध गोठा व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर आणि शाश्वत करण्यासाठी उच्च उत्पादनक्षम जातिवंत गाई, वैज्ञानिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. उपेंद्र मुंडे (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन तथा तालुका पशुसंवर्धन अधिकारी, आष्टी), श्री. संजय सालुगडे पाटील (अध्यक्ष, प्रोग्रेसिव्ह ब्रीडर फार्मर्स असोसिएशन) यांच्यासह राज्यातील विविध भागांतील प्रगतशील दूध उत्पादक श्री. रामनाथ वदक (संगमनेर), श्री. गजानन शेवाळे (धाराशिव), श्री. हरिश येडे (पुणे), श्री. निलेश दहें (कोपरगाव), श्री. बाबासाहेब पवार, श्री. माऊली भिलारे (सातारा), श्री. अशोक हाके (पुणे), श्री. महादेव धुगे (हिंगोली), श्री. वामन गायकवाड (सोलापूर), श्री. रवी हासे (संगमनेर), श्री. संतोष पाटील (चिलेवाडी, सातारा), श्री. जयराम खपके (राहुरी), श्री. जयवंत ताकते (राहुरी), डॉ. चंदन संभेराव (आळेफाटा), श्री. प्रतीक डोखे (कोल्हार), श्री. माणिक पांडे (अकोले) तसेच श्रद्धा ढवण (पारनेर) उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शेतीसोबत दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, स्वाभिमान आणि रोजगाराचे प्रभावी माध्यम ठरू शकतो. आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रशुद्ध व्यवस्थापन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा अवलंब केल्यास दूध व्यवसाय अधिक फायदेशीर व शाश्वत होईल. डॉ. शैलेश मदने यांच्यासारख्या तज्ज्ञांचे अनुभव आणि मार्गदर्शन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज असून त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नियमित मार्गदर्शन करावे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, प्रगतशील दूध उत्पादक, पदाधिकारी व शेतकरी बांधवांशी संवाद साधत दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी अशा मार्गदर्शनपर उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली.
#DairyFarmersMeet #ProfitableDairyFarming #DairyDevelopment #LivestockManagement
#शेतकरी_हित #ग्रामीण_विकास
3 days ago | [YT] | 24
View 0 replies
Suresh Dhas
📍 अद्वैतचंद्र निवासस्थान, आष्टी
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ‘मन की बात’ या १३५व्या भागाचे नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत निवासस्थानी श्रवण केले.
या संवादात्मक कार्यक्रमामध्ये देशातील विविध भागांतील प्रेरणादायी उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि लोकसहभागातून घडणारे सकारात्मक बदल यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील बहादूरपुरा येथील पैठकर कुटुंबाने विवाह सोहळ्याचे औचित्य साधून गावातील नागरिकांना अपघात विमा संरक्षण देत राबविलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
तसेच आत्मनिर्भर भारत, राष्ट्रीय सुरक्षा, ‘मेड इन इंडिया’ उपक्रम, युवकांसाठी नव्या संधी आणि विज्ञाननिष्ठ समाजनिर्मिती यासंबंधी मार्गदर्शनपर विचार मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशवासीयांशी संवादातून मांडले.
#MannKiBaat #मनकीबात #NarendraModiji
#आष्टी #SureshDhas #BJP4Maharashtra
3 days ago | [YT] | 6
View 0 replies
Load more