Janwarta News , Kopargaon

Sham Gawandi - editor


Janwarta News , Kopargaon

आ.आशुतोष काळेंकडून अवैध वाळू उपशाचा प्रश्न विधिमंडळात

गौण खनिज माफियांवर कारवाई करण्याची केली मागणी

कोपरगाव प्रतिनिधी ---- कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अवैध गौण खनिजाचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. यामुळे मतदारसंघातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून माती, वाळू आणि मुरूमाची अवैध वाहतूक करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आ.आशुतोष काळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चर्चेदरम्यान या ज्वलंत मुद्याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. 

आ.आशुतोष काळे यांनी मतदारसंघातील अवैधपणे गौण खनिजाच्या होत असलेल्या उपशाकडे सभागुहाचे लक्ष वेधतांना सांगितले की, कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरु असून ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे जमिनीचे उत्खनन सुरू आहे. हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही तर यातून मिळणाऱ्या अवैध पैशांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना वावर वाढत आहे. या पैशांच्या बळावर हे माफिया दहशत निर्माण करीत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाळू उपसा थांबवण्यात यावा यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित कार्यालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाला वाळू उपसा बंद करण्यात अपयश येवून महसूल आणि पोलीस प्रशासनाला न जुमानता गौण खनिजाचा उपसा सुरूच आहे.

गौण खनिज सांभाळण्याची जबाबदारी महसूल विभागाची असून त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. केवळ महसूल विभाग या माफियांचा बीमोड करू शकत नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा कारवाई करतांना पोलिसांची मदत लागते. यामुळे महसूल विभागाला पोलीस प्रशासनाच्या भक्कम पाठबळाची गरज आहे. जर पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवली तर ही कारवाई अधिक गतीने आणि प्रभावीपणे होऊ शकेल. जोपर्यंत पोलीस बळ या कारवाईत पूर्ण ताकदीने उतरत नाही तोपर्यंत अवैध गौण खनिज उपसा कायमस्वरूपी थांबणार नाही. त्यामुळे गृह विभाग आणि महसूल विभागाने समन्वयाने काम करून अवैध अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांना कायमचा लगाम घालावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी विधिमंडळात केली आहे

3 months ago | [YT] | 4

Janwarta News , Kopargaon

आधुनिक पशुपालनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी -----

राज्य शासनाच्या माध्यमातून पशु-पक्ष्यांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी गावागावात सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायींच्या प्रजातींची वाढ करून कमी खर्चात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सकारात्मक प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे जिल्हा परिषद अहिल्यानगर, पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समिती कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय पशु-पक्षी प्रदर्शन २०२६ च्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. प्रदर्शनातील उत्कृष्ट पशु-पक्ष्यांच्या ३६ मालकांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी बोलताना आमदार काळे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अहिल्यानगर हा एकमेव असा जिल्हा आहे जिथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग आणि पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरावर अशा भव्य प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनांच्या माध्यमातून परिसरातील पशु-पक्षी पालन करणाऱ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी येत असून त्यांना यातून आधुनिक पशुपालनाची प्रेरणा मिळत आहे.

प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विविध पशुपालकांशी चर्चा केल्यावर नव नवीन माहिती समोर येते. या प्रदर्शनात उच्च जातीच्या गायी, बैल, म्हशी, घोडे, शेळ्या, मेंढ्या यांच्यासह श्वान, मांजर, विविध जातींच्या कोंबड्या आणि बदके असे वैविध्यपूर्ण पशु-पक्षी पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अनेक तरुणांनी या प्रदर्शनाकडे आता केवळ छंद म्हणून न पाहता एक यशस्वी व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली असून या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवत आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचे यावेळी आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

याप्रसंगी राजेशआबा परजणे, सूर्यभान कोळपे, प्रशांत घुले, श्रीराम राजेभोसले, ज्ञानेश्वर हळनोर, सुखदेव कोळपे, किरण कोळपे, सरपंच चंद्रकला कोळपे, उपसरपंच सुनिता कोळपे, वारी गावचे सरपंच बद्रीनाथ जाधव, उपसरपंच विजय गायकवाड, जिल्हा उप आयुक्त पशु संवर्धन अधिकारी डॉ. उमेश पाटील, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. दशरथ दिघे, गट विकास अधिकारी संदीप दळवी, पशु संवर्धन अधिकारी डॉ. दिलीप जामदार, डॉ. दिलीप दहे, डॉ. श्रद्धा काटे, डॉ. श्रीकांत घोरपडे, पशुपालक आणि नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

3 months ago | [YT] | 1

Janwarta News , Kopargaon

  संजीवनी फार्मसीच्या ईरम अन्सारीच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल...
                                   
संजीवनीतील संशोधनात्मक वातावरणाचे फलित


कोपरगाव: प्रतिनिधी ----- संजीवनी एम.फार्मसीची विद्यार्थीनी ईरम तजमुलहक्क अन्सारी हिने ‘संजीवनी  अॅडवर्स ड्रग रिअॅक्शन रिपोर्टिंग सिस्टिम’ संबंधित चॅटबॉट आधारित प्रणाली या विषयावर संशोधनात्मक पोस्टर सादर केले. या पोस्टरच्या माध्यमातून तीला ‘अन्वेशन’ या आंतरराष्ट्रीय संशोधनात्मक पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. तीने तयार केलेल्या या प्रणालीचे कॉपीराईट नोंदणी केली असुन पेटंट प्रकाशन  प्राप्त झाले.  भविष्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या उन्नतीसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. संजीवनी फार्मसी मध्ये संशोधनपूरक वातावरण असल्याने येथील विद्यार्थी संशोधन क्षेत्रात उत्तम कामगीरी करीत आहेत.
      ईरम अन्सारी हिने तयार केलेल्या पोस्टरला यापूर्वी महाविद्यालय, विभागीय, विद्यापीठ आणि राज्यस्तरीय ‘अविष्कार’ पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत यश मिळाले. त्याचा परिणाम म्हणून तीला आता आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर आपले संशोधन मांडण्याची संधी मिळाली. संस्थेच्या दृष्टीने ही भुषणावह बाब आहे.  संजीवनी फार्मसी महाविद्यालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळा कार्यरत आहे.  विद्यार्थी व प्राध्यापकांना त्यामुळे संशोधन करणे सुकर होते. त्यांना संशोधन करण्याची प्रेरणा मिळते.
    संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितीनदादा  कोल्हे यांनी ईरम अन्सारीचे अभिनंदन केले व तिच्या पुढील संशोधन क्षेत्रातील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी  श्री अमित कोल्हे यांच्या हस्ते तीचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी डायरेक्टर डॉ. विपुल पटेल, तसेच या संशोधनासाठी मार्गदर्शन करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रमाणित केलेले प्रा. प्रदिप कराळे व समन्वयक डॉ. स्मिता कुंभार यांचे अभिनंदन केले. यावेळी  हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. रावसाहेब शेंडगे उपस्थित होते.

   संजीवनी एम.फार्मसीची विद्यार्थीनी ईरम अन्सारी हिने ‘संजीवनी अॅडवर्स ड्रग रिअॅक्शन रिपोर्टिंग सिस्टिम’ संबंधित चॅटबॉट आधारित प्रणाली या विषयावर संशोधनात्मक पोस्टर सादर केले. तिने विकसित केलेली हि प्रणाली वैद्यकीय आणि तसेच औषध निर्मीती क्षेत्राला उपयुक्त ठरेल. संजीवनीच्या विद्यार्थीनीच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. ही संस्थेच्या दृष्टीने अभिमान आणि गौरवाची बाब आहे. -श्री अमित कोल्हे, कार्यकारी विश्वस्त , संजीवनी शैक्षणिक  संकुल

3 months ago | [YT] | 1

Janwarta News , Kopargaon

कोपरगावकरांना लवकरच शास्तीमाफी
उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदेंची आ.आशुतोष काळेंना ग्वाही

कोपरगाव :- कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या थकीत मालमत्ता करावरील १००% शास्ती माफी करण्यात यावी याबाबत आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी कोपरगावकरांना लवकरच शास्ती माफी करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली आहे.
मंगळवार (दि.१०) रोजी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांची भेट घेत त्यांना कोपरगाव शहरातील नागरीकांना लवकरात लवकर थकीत मालमत्ता करावरील १००% शास्ती माफी करण्यात यावी याबाबत निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सर्व सामान्य कोपरगावकरांवर कराचा अतिरिक्त बोजा पडू नये व नागरिकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या दुहेरी उद्देशातून महायुती शासनाने थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारा दोन टक्के दंड (शास्ती) माफ करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्या बाबत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला मागील वर्षी त्याबाबत महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना करून सदरचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
त्या प्रस्तावाची आपण गांभीर्याने दखल घेवून या प्रस्तावाला तातडीने मंजुरी देऊन कर वसुली प्रोत्साहनात्मक अभय योजना अंतर्गत कोपरगावकरांचा शास्ती (दंड) माफ करावी अशी मागणी राज्याचे नगरविकासमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून कोपरगावकरांना लवकरच १००% शास्ती माफी करण्यात येईल अशी ग्वाही दिली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.
फोटो ओळ-थकीत मालमत्ता करावरील १००% शास्ती माफी करण्यात यावी याबाबत राज्याचे नगरविकासमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना निवेदन देतांना आमदार आशुतोष काळे.

4 months ago (edited) | [YT] | 6