Sangola Politics

थिंक टँक मीडिया ग्रुप संचलित "सांगोला पॉलिटिक्स" हे सांगोला तालुक्यातील राजकीय तसेच खास घडामोडींना समर्पित नवे युट्यूब चॅनल आहे. सांगोला तालुक्यातील ताज्या घडामोडी तात्काळ जाणून घेण्यासाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.
----------------------------
थिंक टँकचे लोकप्रिय डिजिटल प्लॅटफॉर्म्स
थिंक टँक न्यूज पोर्टल : thinktanklive.in/
थिंक टँक यूट्यूब चॅनल : youtube.com/@thinktanklive3626
"सांगोला पॉलिटिक्स" : youtube.com/@SangolaPolitics-e8t

आम्ही सोशल मीडियावरही आहोत
www.facebook.com/share/15qmxwcuw5/
www.instagram.com/thinktanklive2020
आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा chat.whatsapp.com/L8ZvZ0YDJcUFXFIiu3o45G

संपादक
डॉ. बाळासाहेब मागाडे
(Mob. 7972643230)


Sangola Politics

व्यक्त व्हा!

1 week ago | [YT] | 75

Sangola Politics

धन्यवाद तुषार शिवशरण l....

1 week ago | [YT] | 125

Sangola Politics

सांगोल्याचा नगराध्यक्ष कोण होणार? क्लिक करून आपले मत नोंदवा.

4 weeks ago | [YT] | 188

Sangola Politics

Live निकाल पाहण्यासाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा

4 weeks ago | [YT] | 145

Sangola Politics

नागपूर विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात दीपकआबांचा लूक

1 month ago | [YT] | 120

Sangola Politics

नागपुरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील चारा छावणी चालकांच्या प्रलंबित बिलांसंदर्भातील महत्त्वपूर्ण प्रश्न आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहात उपस्थित केला. या प्रश्नाला मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वस्त केले.
यानंतर सभागृहातून बाहेर पडताना सांगोल्याचे आमदार श्बाबासाहेब देशमुख यांच्यासह आ. समाधान आवताडे यांनी मंत्री महोदयांची भेट घेऊन संवाद साधला व आभार व्यक्त केले.

1 month ago | [YT] | 61

Sangola Politics

नागपूर विधिमंडळ हिवाळी अधिवेशन | तिसरा दिवस | आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख सभागृहात जाताना. (11/12/2025)

1 month ago | [YT] | 122

Sangola Politics

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सांगोला येथील धावत्या दौऱ्यादरम्यान मंत्री महोदयांचे स्वागत करताना सांगोला तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप देवकते.

1 month ago | [YT] | 54

Sangola Politics

*डिकसळचे पांडुरंग पाटील गुरुजी यांचे निधन*
आदर्श "गुरुजींना "अखेरचा निरोप"
(श्रध्दांजली लेख)

सर्वांचे लाडके गुरुजी अर्थात " "बापू " आज शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी आकस्मित देवाघरी गेले,काळाच्या पडद्याआड विसावले गुरुजींच्या डोळ्यातील माया,धारदार आवाजातील तो कणखर बाणा, आम्हा गावकऱ्यांना,समाजाला, प्रेरित करणारा आत्मविश्वास आणि त्यांच्या शिकवणुकीतील जीवनमूल्ये आजही मनाला नवी दिशा देतात.गुरुजींनी दिलेली शिकवण ही फक्त पुस्तकातली नव्हती, ती होती जगणं शिकवणारी. “प्रामाणिकपणा म्हणजे शक्ती”, “मेहनत म्हणजे यशाचा मार्ग”, आणि “माणुसकी हीच खरी संपत्ती”— अशा अनेक मूल्यांनी त्यांनी सर्वांच्या मनात उजेड पेटवला.
शाळेच्या त्या छोट्याशा वर्गात उभे राहून त्यांनी शेकडो मुलांच्या भविष्याची पायाभरणी केली.
शिक्षणाप्रतीची प्रचंड सकारात्मकता आणि ग्रामीण भागातील शोषित,वंचित, बहुजन, मागासवर्गीय मुलांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार मिळावा,ग्रामीण भागात शिक्षित आणि अशिक्षितपणाची जी मोठी दरी निर्माण झाली आहे ती कमी होऊन त्याचा समतोल साधावा या दूर दृष्टीकोनातून त्यांनी "विधानसभा सदस्य तथा माजी मंत्री,विश्वविक्रमवीर गणपतराव देशमुख अर्थात आबासाहेब" यांच्याकडे इतर सहकाऱ्यांच्या साथीने माझ्या गावात एक शैक्षणिक संकुल उभे करावं, ही महत्वाकांक्षा मांडली.
सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर, अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वसलेल्या डिकसळ गावात एक "शिक्षणवेडा मास्तर" गुरुकुलाची मागणी करतोय, ही प्रचंड मोठी महत्वाकांक्षा स्वर्गीय आबासाहेबांच्या मनावर प्रभाव टाकून गेली. अन याच मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून बाबासाहेबांच्या विशेष प्रयत्नांतून "आश्रम" नावाचं रोपट 1991 साली उभे केलं गेलं अन त्याच रोपट्याच आज वटवृक्ष होऊन हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्ज्वलमय झालं.... खरंच ,गुरुजी आपल्या या दूरदृष्टीकोनास सलाम.....*
तसे पाहता, गुरुजींची बहुतांशी सेवा इतर ठिकाणी झाल्याने आम्हाला त्यांच्यासोबत त्यांच्या वर्गात अध्ययन करता आले नाही. ते म्हणतात ना, "चंदन कापल्यानंतरही त्याचा सुगंध कायम राहतो, कारण ते त्याचे नैसर्गिक गुणधर्म आहेत. हे चंदनाच्या वृक्षाच्या मूळ स्वभावाचे प्रतीक आहे, जे कधीही नष्ट होत नाही, अगदी कापल्यानंतरही.चाणक्य नीतीनुसार, चंदनवृक्ष कापूनही आपला सुगंध सोडत नाही, "अगदी तसेच आमचे पाटील "गुरुजी"...वस्तीवरील आम्हा सर्व भावंडांना, लहान थोरांना त्यांच्या प्रभावी आणि आधुनिक विचारांनी सकारात्मक जीवन जगण्याची एक आशावादी दिशा दिली. परिस्थितीवर मात करून पुढे पाऊल टाकायचे सामर्थ्य त्यांच्याकडून शिकलो...*
गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा अजून एक पैलू म्हणजे ते एक उत्कृष्ट "कलाकार" होते. त्यांच्यातील कलाकारिकेतून सामाजिक प्रश्न, जुन्या रूढी ,प्रथा ,परंपरा अगदीच काय तर अंध भावनेने समाजात रुजलेली अंधश्रद्धा या अनेक गंभीर विषयांवर त्यांनी शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पथनाट्य, नाटके याद्वारे जनजागृती करण्याचे अनमोल कार्य घडले.आपल्या समाजव्यवस्थेत "हुंडाबळी" नावाच्या राक्षसाने अनेक माय माऊलींच्या आयुष्याची राख रांगोळी व्हायची, अगदी आजही काही प्रमाणात ही विचित्र पद्धत आजच्या सुशिक्षित समाजव्यवस्थेत पाहायला मिळत आहे...अगदी हाच धागा पकडून , गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली "हुंडाबळी" , आणि "दारुड्या "हे नाटक आश्रम शाळेत सादर केले होते. त्यास ग्रामस्थांचा मिळालेला उत्तम प्रतिसाद आजही प्रशाळेला अगदी पात्र ना पात्र आठवतो.विशेष म्हणजे या नाटकाची तालीम गुरुजींच्या घरातच व्हायची.गुरुंजीचे घर अगदीच रस्त्याला लागून असल्यामुळे ही तालीम आमच्या वस्तीसोबत जाणा येणाऱ्यांना मोफत पाहायला मिळायची..या एक ना अनेक सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारे अभिमानास्पद कार्य त्यांच्या हातून झाले, आणि त्याचे भागीदार / साक्षीदार सारा गाव आहे. याचा आजही आम्हाला अभिमान वाटतो.गुरुजींचा स्वभाव म्हणजे तसा अगदी शिस्तबद्ध.वडील स्वातंत्र्यसैनिक, वडिलबंधू शिक्षक, तिसरा भाऊ शासकीय सेवेत तर चौथे बंधू शेती व्यवसायात आपल्या भारतमातेला इंग्रजांच्या अमानुष गुलामगिरीतून मुक्तिसंग्राम देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाचे बाळकडू प्यायलेल्या गुरुजींनी आम्हा मुलांच्या मनात देशाभिमानाची बीजे अगदी खोलवर रुजविली.
आज त्यांच्या जाण्याने एक आदर्शवादी, महत्त्वाकांक्षी आणि थोर विचारसरणी असलेल एक प्रभावी व्यक्तिमत्व हरपलं आहे . पण त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण आणि त्यांनी घडवलेल्या असंख्य जीवनांमध्ये ते आजही जिवंत आहेत.
गुरुजींच्या संस्कृतीवृत्तीचे आदर करावे,अशी एक गोष्ट आठवते ती म्हणजे,आमच्या वस्तीवरील एकही माता भगिनी गुरुंजीसमोर असताना किंवा नसतानाही डोक्यावरील पदर खाली पडू द्यायची नाही.आपली संस्कृती ही जगातील सर्वोत्कृष्ट संस्कृती आहे, आपण सर्वांनी त्याच्या अभिमान बाळगून तिची जपणूक करावी हा मराठी संस्कृती बाणा त्यांनी मनी रुजवला.यावरून त्यांचा स्त्रियांप्रतीचा आदर पूर्वक दृष्टिकोन आणि मायबोलीचे प्रेम प्रकर्षाने दिसून आला.
अगदीच काय तर त्यावेळच्या काळात गावात कोणताही कार्यक्रम असूद्या, मग तो सामाजिक असो, सांस्कृतिक असो किंवा गावच्या यात्रेतील कार्यक्रम असो गुरुजींचा तो वक्तृत्वशैलीचा करारीपणा,कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि समालोचक अगदी वाखाणण्याजोगा असायचा त्यांच्या वैकुंठवासी गमनाने जी एक पोकळी निर्माण झाली आहे ती आता कधीच भरून येणार नाही ,या विवंचनेने मन आज व्याकुळ झालं.गुरुजी म्हणून त्यांनी केलेली सेवाच त्यांना खऱ्या अर्थाने अमरत्व देते.
असे आमचे गुरुजी अर्थात "बापू" आज रोजी काळाच्या पडद्याआड झाले.बापूंची प्राणज्योत मावळली तो वार म्हणजे शुक्रवार २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११:३० वाजता मावळली.या दिवशी लक्ष्मीदेवीची पूजा महत्त्वाची मानली जाते. घरात स्वच्छता, शांतता आणि शुभकार्यांसाठी हा दिवस उत्तम मानला जातो अन् हाच दिवस आमच्या डिकसळवासियांसाठी अतिशय आध्यात्मिक मानला जातो कारण आमची ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी असून याच आईच्या शुभ दिनी गुरुजींना देवाज्ञा झाली. अस वाटत की गुरुजी वैकुंठास जातानाही आमचं काहीच देणं शिल्लक ठेवून गेले नाहीत.अश्रुमय नयनांनी भावपूर्ण निरोप गुरुजी
अखेरीस
*कोट* _काळाच्या झाले दीप जीवनप्रवासाचे
अंधार वाटेवर होता जेव्हा
प्रकाश बनूनच उभे राहत होता
मनातील काळोख दूर करून
मार्ग सत्याचा दाखविला
पावलोपावली शिकवून आम्हा
जगण्या देहाची किंमत सांगितलीत
शिस्त, संस्कार, प्रेम अशी,
त्रिवेणी आपली अमर राहिली
आठवणींच्या या मंद दीपात
गुरुजी, आपलीच किरणे दाटली.
आज नसूनही सोबत तुमची,
उराशी आम्ही जपून ठेवली
ज्ञानरूपी ही अमाप संपत्ती,
आपलीच देण—सदैव अमर झाली
आपल्या कार्याला, व्यक्तिमत्त्वाला,
कोटी कोटी प्रणाम आम्ही करतो
शांत झोपू द्या त्या महान आत्म्यास,
हेच आमुचे श्रद्धांजलीचे शब्द अर्पण करत
_*आपलाच पुतण्या घनश्याम अर्थात श्री.गणेश पाटील*

तिसऱ्या दिवसाचा विधी रविवारी
असंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत पाटील गुरुजी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला.त्यावेळी विविध क्षेत्रातील जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली.तिसऱ्या दिवसाचा विधी कार्यक्रम रविवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

1 month ago | [YT] | 24

Sangola Politics

सांगोला नगरपरिषदेसाठी पहिला अर्ज दाखल
सांगोला नगरपरिषदेसाठी अखेर पहिला अर्ज दाखल झाला आहे. मोहन गणपत बाबर यांनी अपक्ष म्हणून प्रभाग 1 मधून आपला अर्ज दाखल केला आहे.

2 months ago (edited) | [YT] | 20